यहोवाकडून शिकून घेण्याच्या संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेत आहात का?
१. शिक्षणाबद्दल यहोवाला काय वाटते?
१ यहोवा महान शिक्षक असल्याकारणाने तो आपल्याला शिक्षण देऊ इच्छितो. (यश. ३०:२०) त्याने त्याची सर्वात पहिली सृष्टी म्हणजेच त्याच्या पुत्राला निर्माण केले तेव्हापासून शिकवण्यास सुरुवात केली. (योहा. ८:२८) आदामाच्या बंडाळीनंतर, यहोवाने शिकवणे थांबवले नाही, तर तो आपल्यासारख्या अपरिपूर्ण मानवांना आजही प्रेमळपणे मार्गदर्शन पुरवत आहे.—यश. ४८:१७, १८; २ तीम. ३:१४, १५.
२. आज कोणती शैक्षणिक मोहीम राबवली जात आहे?
२ आज, यहोवा इतिहासातील सर्वात महान शैक्षणिक मोहिमेचे मार्गदर्शन करत आहे. यशया संदेष्ट्याद्वारे भाकीत केल्याप्रमाणे, आज जगातील लाखो लोक यहोवाच्या मंदिराच्या लाक्षणिक ‘पर्वतावर’ जात आहेत. (यश. २:२) ते देवाच्या पर्वतावर का जात आहेत? देवाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी, होय यहोवाकडून शिकण्यासाठी! (यश. २:३) २०१० च्या सेवा वर्षादरम्यान, यहोवाच्या साक्षीदारांनी लोकांना सुवार्ता सांगण्यात आणि त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास करण्यात १६० कोटींहून अधिक तास घालवले. त्याचबरोबर, जगभरात असणाऱ्या १,०५,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये प्रत्येक आठवडी आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवले जाते, व विश्वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे ५०० हून अधिक भाषांमध्ये बायबल आधारित शैक्षणिक साहित्य प्रकाशित केले जाते.
३. यहोवा पुरवत असलेल्या शिक्षणातून तुम्हाला व्यक्तिगत रीत्या कसा फायदा झाला आहे?
३ पुरेपूर फायदा घ्या: देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे आतापर्यंत आपल्याला बराच फायदा झाला आहे! देवाला नाव आहे आणि तो आपली काळजी घेतो हे आपण शिकलो आहोत. (स्तो. ८३:१८; १ पेत्र ५:६, ७) आपल्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली आहेत: लोकांना दुःख का सहन करावे लागते आणि ते का मरतात? मला खरा आनंद कसा मिळू शकतो? जीवनाचा उद्देश काय आहे? यहोवाने आपल्याला नैतिक मार्गदर्शनही दिले आहे जेणेकरून आपला “मार्ग सुखाचा” होऊ शकेल.—यहो. १:८.
४. देवाच्या सेवकांना उपलब्ध असलेल्या काही शैक्षणिक संधी कोणत्या आहेत, आणि यहोवाकडून शिकून घेण्याच्या संधीचा आपण पुरेपूर फायदा का घेतला पाहिजे?
४ याशिवाय, यहोवा त्याच्या बऱ्याच सेवकांना खास प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे जेणेकरून त्याची सेवा वाढवण्यासाठी त्यांना मदत मिळू शकेल. काहींना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची यादी पृष्ठे ४ ते ६ मध्ये देण्यात आली आहे. आपली परिस्थिती आपल्याला, या यादीत दिलेले प्रशिक्षण घेण्यापासून रोखत असली, तरीसुद्धा देवाकडील जे शिक्षण मिळवणे आपल्याला शक्य आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा घेत आहोत का? तरुणांचे शिक्षक आणि इतर जण सहसा त्यांना जगातील उच्च शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन देतात; पण आपण अशा तरुणांना आध्यात्मिक ध्येये ठेवण्याचे आणि सर्वात उच्च प्रतीचे म्हणजेच देवाकडील शिक्षण मिळवण्याचे प्रोत्साहन देतो का? यहोवाकडून शिकून घेण्याच्या संधीचा पुरेपूर फायदा घेतल्यामुळे आपल्याला आता आनंदी जीवन जगणे आणि भविष्यात सार्वकालिक जीवन मिळवणे शक्य होईल.—स्तो. ११९:१०५; योहा. १७:३.
यहोवाच्या संघटनेद्वारे उपलब्ध असणाऱ्या काही शैक्षणिक संधी
साक्षरतेचे वर्ग
• उद्दिष्ट: वैयक्तिक बायबल अभ्यास करण्यासाठी आणि इतरांना सत्याबद्दल सांगण्यासाठी लोकांना लिहिण्यास व वाचण्यास शिकवणे.
• कालावधी: गरजेनुसार.
• ठिकाण: स्थानीय राज्य सभागृह.
• कोण सहभाग घेऊ शकतात? सर्व प्रचारक आणि सत्याविषयी आवड दाखवणारे.
• प्रवेश कसा मिळवावा? मंडळीतील वडील स्थानीय गरजेनुसार साक्षरतेचे वर्ग आयोजित करतात, आणि ज्यांना यामुळे फायदा होऊ शकतो अशा सर्वांना ते उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन देतात.
ईश्वरशासित सेवा प्रशाला
• उद्दिष्ट: प्रचारकांना प्रभावीपणे सुवार्ता सांगण्यासाठी आणि शिकवण्यासाठी प्रशिक्षित करणे.—सेवा प्रशाला पुस्तक, पृष्ठ ५.
• कालावधी: सतत चालणारी प्रशाला.
• ठिकाण: स्थानीय राज्य सभागृह.
• कोण सहभाग घेऊ शकतात? सर्व प्रचारक. आणि इतरही जे नियमितपणे सभांना उपस्थित राहतात, बायबल शिकवणी मान्य करतात आणि ख्रिस्ती तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब करतात.
• प्रवेश कसा मिळवावा? ईश्वरशासित सेवा प्रशाला पर्यवेक्षकाशी बोला.
परकीय भाषा वर्ग
• उद्दिष्ट: इतर भाषेत सुवार्ता कशी सांगावी हे प्रचारकांना शिकवणे.
• कालावधी: चार किंवा पाच महिने. सहसा हे वर्ग शनिवारी सकाळी एक किंवा दोन तासांसाठी घेतले जातात.
• ठिकाण: सहसा जवळच्या राज्य सभागृहात.
• कोण सहभाग घेऊ शकतात? मंडळीत चांगले उदाहरण असणारे आणि इतरांना परकीय भाषेत सुवार्ता सांगू इच्छिणारे प्रचारक.
• प्रवेश कसा मिळवावा? गरजेनुसार शाखा कार्यालयाद्वारे वर्ग आयोजित केले जातात.
राज्य सभागृह बांधकाम
• उद्दिष्ट: राज्य सभागृहांचे बांधकाम करणे व नविनीकरण करणे. ही प्रशाला नाही, पण या व्यवस्थेअंतर्गत, बांधकाम प्रकल्पांत लागणारी कौशल्ये स्वयंसेवकांना शिकवली जातात.
• कालावधी: स्वयंसेवकाच्या परिस्थितीनुसार.
• ठिकाण: प्रादेशिक बांधकाम समितीच्या देखरेखीखाली येणाऱ्या क्षेत्रात कोठेही. काही स्वयंसेवकांना विपत्तीग्रस्त भागात मदतकार्यात हातभार लावण्यासाठी दूरच्या ठिकाणीही बोलावले जाऊ शकते.
• पात्रता: बाप्तिस्माप्राप्त आणि वडील वर्गाची संमती असलेले. औपचारिक प्रशिक्षण असणे सक्तीचे नाही.
• प्रवेश कसा मिळवावा? स्थानीय वडिलांकडून मिळणारा राज्य सभागृह बांधकाम स्वयंसेवक कार्यक्रमाकरता अर्ज (A-25) हा फॉर्म भरा.
पायनियर सेवा प्रशाला
• उद्दिष्ट: पायनियरांना “सेवा पूर्ण” करण्यास मदत करणे.—२ तीम. ४:५.
• कालावधी: दोन आठवडे.
• ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा जवळच्या राज्य सभागृहात ही प्रशाला चालवली जाते.
• पात्रता: निदान एका वर्षापासून सामान्य पायनियर असायला हवेत.
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या पायनियरांचा आपोआप समावेश केला जातो आणि याबाबतीत त्यांचे विभागीय पर्यवेक्षक माहिती देतात.
बेथेल नवोदितांची प्रशाला
• उद्दिष्ट: ही प्रशाला बेथेल नवोदितांना त्यांच्या बेथेल सेवेत यशस्वी होण्यास साहाय्य करण्यासाठी तयार केली आहे.
• कालावधी: दर आठवड्यात एक तास याप्रमाणे सोळा आठवडे.
• ठिकाण: बेथेल.
• पात्रता: बेथेल कुटुंबाचे स्थायी सदस्य किंवा तात्पुरते स्वयंसेवक या नात्याने दीर्घकाळापासून सेवा करत असलेले (एक वर्ष किंवा त्याहून अधिक).
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या बेथेल कुटुंबातील सदस्यांचा आपोआप समावेश केला जातो.
राज्य सेवा प्रशाला
• उद्दिष्ट: वडिलांना आणि सेवा सेवकांना मंडळीत देखरेख करण्याच्या व संघटनेतील इतर जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे. (प्रे. कृत्ये २०:२८) ही प्रशाला नियमन मंडळाने ठरवल्याप्रमाणे दर दोन-चार वर्षांनी आयोजित केली जाते.
• कालावधी: अलीकडील वर्षांत ही प्रशाला वडिलांसाठी दीड दिवसाकरता तर सेवा सेवकांसाठी एक दिवसाकरता चालवली गेली.
• ठिकाण: सहसा जवळचे राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
• पात्रता: वडील किंवा सेवा सेवक असले पाहिजेत.
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या वडिलांना आणि सेवा सेवकांना विभागीय पर्यवेक्षकाद्वारे आमंत्रित केले जाते.
मंडळीतील वडिलांकरता प्रशालाa
• उद्दिष्ट: वडिलांना मंडळीतील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी मदत करणे.
• कालावधी: पाच दिवस.
• ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा जवळचे राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
• पात्रता: वडील असले पाहिजेत.
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या वडिलांना शाखा कार्यालयातर्फे आमंत्रित केले जाते.
प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशालाb
• उद्दिष्ट: विभागीय व प्रांतीय पर्यवेक्षकांना अधिक प्रभावीपणे मंडळ्यांची सेवा करण्यास, ‘उपदेश व शिक्षण ह्या बाबतीत श्रम घेण्यास’ आणि त्यांच्या देखरेखीखाली असलेल्यांचे आध्यात्मिक रीत्या पालनपोषण करण्यास मदत करणे.—१ तीम. ५:१७; १ पेत्र ५:२, ३.
• कालावधी: दोन महिने.
• ठिकाण: शाखा कार्यालयाद्वारे ठरवले जाते.
• पात्रता: विभागीय किंवा प्रांतीय पर्यवेक्षक असले पाहिजेत.
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या पर्यवेक्षकांना आणि त्यांच्या पत्नींना शाखा कार्यालयातर्फे आमंत्रित केले जाते.
अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशालाc
• उद्दिष्ट: अविवाहित वडील आणि सेवा सेवक यांना अधिक जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी प्रशिक्षित करणे. पदवीधर झालेल्यांपैकी बहुतेकांना त्यांच्याच देशात जेथे गरज आहे तेथे पाठवले जाईल. तर काहींना, त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केल्यास दुसऱ्या देशात नियुक्त केले जाऊ शकते.
• कालावधी: दोन महिने.
• ठिकाण: शाखा कार्यालय ठरवते; सहसा जवळचे राज्य सभागृह किंवा संमेलन गृह.
• पात्रता: अविवाहित बांधव २३ ते ६२ या वयोगटातील असावेत. त्यांचे चांगले स्वास्थ्य असावे आणि ख्रिस्ती बांधवांची सेवा करण्याची आणि जेथे जास्त गरज आहे तेथे प्रचार कार्याला हातभार लावण्याची त्यांची इच्छा असली पाहिजे. (मार्क १०:२९, ३०) त्यांनी वडील किंवा सेवा सेवक म्हणून कमीतकमी दोन वर्षे सलग सेवा केलेली असावी.
• प्रवेश कसा मिळवावा? जर ही प्रशाला तुमच्या शाखेच्या क्षेत्रात उपलब्ध असेल तर इच्छुक असणाऱ्यांसाठी विभागीय संमेलनात सभा घेतली जाईल आणि अधिक माहिती या सभेत पुरवली जाईल.
ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशालाd
• उद्दिष्ट: यहोवा आणि त्याच्या संघटनेसाठी अधिकाधिक कार्य करण्यासाठी विवाहित जोडप्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. पदवीधर झालेल्यांपैकी बहुतेकांना त्यांच्याच देशात जेथे गरज आहे तेथे पाठवले जाईल. तर काहींना, त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केल्यास दुसऱ्या देशात नियुक्त केले जाऊ शकते.
• कालावधी: दोन महिने.
• ठिकाण: सुरुवातीचे काही वर्ग अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील पॅटरसनच्या वॉचटावर शैक्षणिक केंद्रात घेण्यात येत आहेत. कालांतराने ही प्रशाला शाखा कार्यालय ठरवेल त्या ठिकाणी चालवली जाईल, सहसा संमेलन गृहात किंवा राज्य सभागृहात.
• पात्रता: २५ ते ५० या वयोगटातील व चांगले स्वास्थ्य असणारी विवाहित जोडपी. जेथे गरज आहे तेथे सेवा करण्यास जाण्यासाठी त्यांची परिस्थिती अनुकूल असावी आणि “हा मी आहे, मला पाठीव” अशी मनोवृत्ती असावी. (यश. ६:८) त्यांच्या विवाहाला कमीतकमी दोन वर्षे पूर्ण झालेली असावीत आणि पूर्ण-वेळेच्या सेवेत निदान दोन वर्षे सलग पूर्ण केलेली असावीत.
• प्रवेश कसा मिळवावा? जर ही प्रशाला तुमच्या शाखेच्या क्षेत्रात उपलब्ध असेल तर इच्छुक असणाऱ्यांसाठी खास संमेलनात सभा घेतली जाईल आणि अधिक माहिती या सभेत पुरवली जाईल.
वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला
• उद्दिष्ट: पायनियर आणि इतर पूर्ण-वेळेच्या सेवकांना मिशनरी सेवेसाठी प्रशिक्षित करणे.
• कालावधी: पाच महिने.
• ठिकाण: वॉचटावर शैक्षणिक केंद्र, पॅटरसन, न्यूयॉर्क, अमेरिका.
• पात्रता: विवाहित जोडपी ज्यांचा बाप्तिस्मा होऊन तीन वर्षे पूर्ण झालेली आहेत. पहिला अर्ज भरत असताना त्यांचे वय २१ ते ३८ यादरम्यान असावे. त्यांना इंग्रजी बोलता आली पाहिजे. त्यांच्या विवाहाला कमीतकमी दोन वर्षे पूर्ण झालेली असावीत आणि पूर्ण-वेळेच्या सेवेत निदान दोन वर्षे सलग पूर्ण केलेली असावीत. त्यांचे चांगले स्वास्थ्य असावे. दुसऱ्या देशात सेवा करत असणारे पायनियर (मिशनरी दर्जा असणारेही); प्रवासी पर्यवेक्षक; बेथेल कुटुंबातील सदस्य; आणि सेवा प्रशिक्षण प्रशाला, अविवाहित बांधवांकरता बायबल प्रशाला, ख्रिस्ती जोडप्यांकरता बायबल प्रशाला यांतील पूर्वी पदवीधर झालेले जर पात्रता पूर्ण करत असतील तर तेही या प्रशालेसाठी अर्ज भरू शकतात.
• प्रवेश कसा मिळवावा? काही निवडक शाखांतून, इच्छुक असणाऱ्यांसाठी प्रांतीय अधिवेशनात सभा घेतली जाईल. जास्त माहिती या सभेत देण्यात येईल. जर तुमच्या देशात असणाऱ्या अधिवेशनात ही सभा घेतली जात नसेल आणि तुम्ही इच्छुक असाल तर जास्त माहितीसाठी तुम्ही शाखा कार्यालयाला लिहून विचारू शकता.
शाखा समिती सदस्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला
• उद्दिष्ट: शाखा समित्यांतील सदस्यांना बेथेल गृहात चालणाऱ्या कार्यांवर देखरेख करण्यासाठी प्रशिक्षित करणे. मंडळी संदर्भात असणाऱ्या कार्यांकडे लक्ष देण्यास, त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या विभागांची व प्रांतांची देखरेख करण्यास, त्याचबरोबर साहित्याचे भाषांतर, छपाई करून ते मंडळ्यांना पाठवण्याच्या कार्याची आणि विविध विभागांची देखरेख करण्यास प्रशिक्षित करणे.—लूक १२:४८ख.
• कालावधी: दोन महिने.
• ठिकाण: वॉचटावर शैक्षणिक केंद्र, पॅटरसन, न्यूयॉर्क, अमेरिका.
• पात्रता: शाखा समितीचे सदस्य किंवा राष्ट्र समितीचे (कंट्री कमिटी) सदस्य किंवा ज्यांना प्रशालेनंतर या समित्यांमध्ये सेवा करण्यासाठी नियुक्त करण्यात येईल.
• प्रवेश कसा मिळवावा? पात्रता पूर्ण करणाऱ्या बांधवांना आणि त्यांच्या पत्नींना नियमन मंडळातर्फे आमंत्रित केले जाते.
[तळटीपा]
a सध्या सर्वच देशांमध्ये ही प्रशाला चालवली जात नाही.
b सध्या सर्वच देशांमध्ये ही प्रशाला चालवली जात नाही.
c सध्या सर्वच देशांमध्ये ही प्रशाला चालवली जात नाही.
d सध्या सर्वच देशांमध्ये ही प्रशाला चालवली जात नाही.