तुम्ही घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवले आहे का?
आपण जेव्हा घरमालकांना बायबल अभ्यास करायला आवडेल का, असे विचारतो तेव्हा आमची इच्छा नाही किंवा आमच्या चर्चमध्येही बायबल अभ्यास होतो असे काही जण उत्तर देतात. बायबल अभ्यासाविषयीचे त्यांचे मत त्यांच्या आधीच्या अनुभवावर आधारित असते. खरेतर बायबल अभ्यास करणे हा किती ज्ञानवर्धक व आनंददायी अनुभव असू शकतो याची त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे बायबल अभ्यास करण्याविषयी फक्त विचारण्याऐवजी, तो कसा केला जातो याचे दोन-तीन मिनिटांत एक प्रात्यक्षिक का बरे दाखवू नये? उदाहरणार्थ, तुम्हाला खूप चांगला स्वयंपाक करता येतो व पुढच्या वेळी तुम्ही बनवलेला एखादा पदार्थ तुम्ही त्यांच्यासाठी आणाल असे सांगण्याऐवजी तिथल्या तिथे त्यांना तुमच्या हातच्या पदार्थाची चव दिली तर! अगदी याच प्रकारे आमची राज्य सेवा जानेवारी २००६, पृष्ठ ६ वरील एखाद्या सूचनेवर आधारित बायबल अभ्यास कसा करायचा हे तुम्ही दाखवू शकता.
ती व्यक्ती खरोखरच आस्थेवाईक आहे हे ठरवल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “हे शब्द कधी पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं का? [यशया ३३:२४ वाचा आणि उत्तरासाठी थांबा.] या विषयाबद्दल मी तुम्हाला आणखी काही माहिती दाखवू इच्छितो, जी जाणून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.” घरमालकाला बायबल काय शिकवते हे पुस्तक द्या व त्यातील पृष्ठ ३६, परिच्छेद २२ दाखवा. परिच्छेदाचा प्रश्न वाचून दाखवा व तुम्ही परिच्छेद वाचत असताना त्याचे उत्तर शोधायला घरमालकाला सांगा. मग परत प्रश्न विचारा व घरमालकाचे उत्तर ऐका. परिच्छेदातील आणखी एखादे शास्त्रवचन सोबत मिळून वाचा. एखादा प्रश्न विचारा व त्याचे उत्तर तुम्ही पुढच्या भेटीत द्याल असे सांगा आणि पुनर्भेटीची निश्चित वेळ ठरवा. पाहिलत, तुम्ही बायबल अभ्यास सुरू देखील केला!