वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०८ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे लग्नाची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाच्या नावाला गौरव आणणारे आनंदी विवाहसोहळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवाला सन्मानित करणारे विवाह
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ११/०८ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ एखादे जोपडे त्यांच्या विवाहाकरता राज्य सभागृहाचा वापर करू इच्छित असल्यास, त्यांनी वडिलांबरोबर कोणकोणत्या बाबींची चर्चा केली पाहिजे?

बायबल तत्त्वांनुसार आयोजित केलेल्या विवाहामुळे यहोवाचा सन्मान होतो. राज्य सभागृहात होणाऱ्‍या विवाहांच्या बाबतीत खासकरून हे खरे आहे; कारण राज्य सभागृहात होणारा कार्यक्रम आपल्या संघटनेचाच एखादा कार्यक्रम आहे, असा लोक विचार करतात. त्यामुळे, विवाहाकरता राज्य सभागृहाचा वापर करण्याविषयी विचारले जाते तेव्हा “सर्व काही शिस्तवार व व्यवस्थितपणे” होण्याकरता वडिलांनी, नवरा मुलगा व मुलगी यांच्यासोबत याची चर्चा करणे उचित आहे.—१ करिंथ. १४:४०.

आपला विवाह राज्य सभागृहात करण्याची एखाद्या जोडप्याची इच्छा असल्यास त्यांनी तेथील मंडळीच्या सेवा समितीला लेखी विनंती केली पाहिजे. हे पत्र त्यांनी बरेच दिवस आधी द्यावे व त्यात राज्य सभागृह वापरणार असलेल्या दिवसाची तारीख आणि वेळ नमूद केली पाहिजे. विवाहाकरता राज्य सभागृह मिळावे म्हणून वडील जन सभेच्या वेळांमध्ये कुठलीही तडजोड करणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. याव्यतिरिक्‍त, नवरा आणि नवरीची वर्तणूक बायबल तत्त्वांनुसार आणि यहोवाच्या धार्मिक स्तरांनुसार असावी.

विवाहाच्या कोणत्याही योजना पक्क्या करण्याआधी, नवऱ्‍या मुलाने व मुलीने सेवा समितीशी त्यांविषयी चर्चा करावी. असे केल्याने त्यांच्या विवाहसोहळ्यामुळे आपल्या आदरणीय देवाचे गौरव होईल. वडील जन जोडप्यावर आपले मत लादणार नाहीत. पण आक्षेपार्ह योजनांत बदल करण्याविषयी वडील जन जोडप्याला काही सुचवत असतील तर त्यांनी त्यांच्या सूचना मान्य कराव्यात. किंगडम मेलडीज किंवा आपल्या गीत पुस्तकातील संगीतच राज्य सभागृहात वाजवावे. राज्य सभागृह सजवण्याविषयी किंवा खूर्च्या वेगळ्या पद्धतीत लावण्याविषयी देखील परवानगी घेतली पाहिजे. फोटो घेताना किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना या प्रसंगाची प्रतिष्ठा कमी होता कामा नये. मंडळीच्या सभांमध्ये काही अडथळा येत नसल्यास, वडील जन राज्य सभागृहात विवाहसोहळ्याचा सराव करण्याची अनुमती देतील. राज्य सभागृहाच्या माहिती फलकावर विवाहाची नोटीस लावण्यात यावी कारण ही कायद्याची एक अट आहे. पण लग्नपत्रिका लावू नयेत. राज्य सभागृहात होणाऱ्‍या विवाहाबद्दलची कल्पना देण्यासाठी वडील जन, सेवा सभेत कदाचित लहानशी घोषणा करतील. विवाहाचे भाषण ऐकण्यासाठी राज्य सभागृहात सर्वांना निमंत्रण असले तरी, भाषणानंतर होणाऱ्‍या रिसेप्शनला ओघाओघाने आपल्याला आमंत्रण आहेच, असे आमंत्रितांनी समजू नये. (योहा २:२) इतर मंडळ्या जर हे राज्य सभागृह वापरत असतील तर या वेळी त्यांना त्यांच्या इतर कार्यक्रमासाठी त्याचा वापर करता येणार नाही, याची कल्पना त्यांना द्यावी.

विवाहाचे आमंत्रण मिळालेले सर्वच जण बाप्तिस्मा घेतलेले असावेत, असा नियम नसला तरी, ज्यांची जीवनशैली बायबल तत्त्वांच्या अगदीच विपरीत आहे किंवा ज्यांच्या वर्तनाविषयी उपस्थितांच्या मनात प्रश्‍न उभे राहू शकतात अशा लोकांना आमंत्रण न देणेच योग्य ठरेल. शक्यतो, मंडळीतल्याच एखाद्या नियुक्‍त वडिलांनी विवाहाचे भाषण द्यावे. वडील जन देवाच्या वचनाचे अनुभवी शिक्षक आहेत. म्हणून या महत्त्वपूर्ण प्रसंगी लागू होणाऱ्‍या बायबलमधील तत्त्वांवर जोर देण्याकरता ते अधिक पात्र आहेत.—१ तीम. ३:२.

विवाहाचे भाषण देणाऱ्‍या वडिलांचाही विवाह योजनेत भाग असल्यामुळे, विवाह व्यवस्थेच्या बारीकसारिक माहितीची त्यांनाही आगाऊ कल्पना दिली पाहिजे. ते जोडप्याला भेटीगाठी दरम्यानच्या त्यांच्या नैतिक वर्तनाविषयी विचारतील; आणि वडील विचारतात तेव्हा जोडप्याने मोकळ्या मनाने आणि प्रामाणिकपणे सर्वकाही सांगावे. समजा, पूर्वी वधूचा किंवा वराचा विवाह झाला होता, तर ते पुन्हा विवाह करण्यास शास्त्रवचनानुसार व कायद्यानुसार मुक्‍त आहेत हे त्यांनी शाबीत करावे. (मत्त. १९:९) त्यांनी वडिलांना, घटस्फोटाचे कागदपत्र दाखवावेत.

वडिलांशी खुल्या मनाने संवाद साधल्यास व त्यांना पूर्ण सहयोग दिल्यास विवाहाचा प्रसंग सर्वांकरता आनंदाचा सोहळा ठरू शकतो.—नीति. १५:२२; इब्री १३:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा