घोषणा
▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करा. डिसेंबर: सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करा. आपल्याला मुले आहेत, असे घरमालक म्हणत असतील तर बायबल कथांचं माझं पुस्तक सादर करा. जानेवारी: बायबल नेमके काय शिकवते? घरमालकाकडे हे पुस्तक आधीच असेल तर प्रचारक, पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापण्यात आलेले किंवा १९९२ सालाआधी छापण्यात आलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: उपलब्ध असल्यास पुढीलपैकी कोणतेही एक प्रकाशन सादर करता येईल. तुमची काळजी करणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी), कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य किंवा बायबल देवाचे वचन की मनुष्याचे (इंग्रजी)
▪ जानेवारी १, २००९ पासून, “अध्यक्षीय पर्यवेक्षक” याऐवजी ही जबाबदारी सांभाळणाऱ्या बांधवाला “वडील वर्गाचा संयोजक” म्हटले जाईल.