यहोवावर प्रेम करायला इतरांना शिकवा
१. कोणत्या गोष्टीमुळे काही जण यहोवाकडे आकर्षित होतात?
१ तुम्ही जेव्हा पहिल्यांदा, यहोवा हे नाव ऐकले तेव्हा तुम्हाला कसे वाटले होते? कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही यहोवाकडे आकर्षित झाला होता? प्रामाणिक मनाचे पुष्कळ लोक तुम्हाला सांगतील, की ते आपल्या प्रेमळ निर्माणकर्त्याच्या अतुलनीय गुणांविषयी, खासकरून त्याचा कनवाळूपणा व प्रेम या गुणांविषयी शिकल्यामुळे त्याच्याकडे आकर्षित झाले होते.—१ योहा. ४:८.
२, ३. बायबल विद्यार्थ्यांना आपण यहोवावरील प्रेम वाढवण्यास बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग कसा करू शकतो?
२ “हा आमचा देव”: बायबल काय शिकवते हे पुस्तक आपले लक्ष यहोवाच्या प्रेमावर आणि त्याच्याबरोबर व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्यावर भर देते. इतरांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्यासाठी आपण या प्रकाशनाचा उपयोग कसा करू शकतो? एखाद्या नवीन मुद्द्यावर चर्चा करताना आपण विद्यार्थ्याला, विचार करायला प्रवृत्त करेल असा प्रश्न विचारू शकतो. जसे की, “या सत्यावरून यहोवाविषयी तुम्हाला काय समजते?” किंवा, “यहोवा हा, कोणालाही हवाहवासा वाटेल असा सर्वोत्कृष्ट पिता आहे, हे या मुद्द्यावरून कसे कळते?” अशा प्रकारे शिकवल्यामुळे, विद्यार्थ्याला यहोवाबरोबर कायमचा नातेसंबंध जोडावासा वाटेल.
३ एकमात्र खऱ्या व जिवंत देवाचे ज्ञान घेणे किती मोठी सुसंधी आहे हे समजायला जेव्हा आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना मदत करू तेव्हा तेही यशयाने म्हटल्याप्रमाणे “हा आमचा देव” आहे असे कबूल करतील. (यश. २५:९) देवाचे वचन समजावून सांगताना आपण, ख्रिस्त येशू ज्याचा राजा आहे त्या शाही सरकाराद्वारे यहोवाचे उद्देश पूर्ण होत असताना मानवजातीला कशा प्रकारे आशीर्वाद मिळतील यावर जोर दिला पाहिजे.—यश. ९:६, ७.
४, ५. यहोवावर प्रेम करण्याचा काय अर्थ होतो?
४ यहोवावरील प्रेमाचा पुरावा: आपल्या संपूर्ण मनाने, हृदयाने व जिवाने यहोवावर प्रेम करण्याचा अर्थ, मनात देवाबद्दल गाढ श्रद्धा बाळगणे इतकाच नव्हे तर, देवाची विचारसरणी स्वीकारणे आणि त्यानुसार वागणे असा होतो. (स्तो. ९७:१०) आपण जर देवावर प्रेम करत असू तर, आपल्यावर कितीही परीक्षा आल्या किंवा आपला कितीही विरोध होत असला, तरी आपण त्याच्या आज्ञांचे काटेकोरपणे पालन करू आणि “पवित्र वर्तणुकीत व सुभक्त्तीत” टिकून राहू.—२ पेत्र ३:११; २ योहा. ६.
५ देवावरील प्रेमापोटी त्याची इच्छा पूर्ण करायला आपल्याला मनापासून आनंद होतो. (स्तो. ४०:८) देवाने घालून दिलेल्या सर्व आज्ञा त्याच्या सेवकांच्या सार्वकालिक भल्यासाठीच आहेत हे बायबल विद्यार्थ्यांना समजले पाहिजे. (अनु. १०:१२, १३) यहोवाच्या मार्गदर्शनानुसार चालून आपण त्याच्या अद्भुत कार्यांबद्दल मनःपूर्वक कदर दाखवतो. यहोवाच्या धार्मिक मार्गांनुसार चालल्यास आपण पुष्कळ त्रासांपासून वाचू शकतो, हे समजायला विद्यार्थ्यांना मदत करा.
६. यहोवावर प्रेम केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
६ देवावर प्रेम करणाऱ्यांना आशीर्वाद: यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या नम्र लोकांची खूप काळजी करतो आणि तो त्यांना ‘त्याच्या गहन गोष्टी’ प्रकट करतो. (१ करिंथ. २:९, १०) यहोवाच्या उद्देशांबद्दलच्या या ज्ञानामुळे भविष्याविषयी त्यांना चांगली माहिती आहे आणि निश्चित आशाही आहे. (यिर्म. २९:११) यहोवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांवर विशेष दया करतो. (निर्ग. २०:६) देवाचे त्यांच्यावर खूप प्रेम असल्यामुळे ते सार्वकालिक जीवनाची आशा बाळगतात.—योहा. ३:१६.
७. इतरांना यहोवावर प्रेम करण्याचे शिकवताना तुम्हाला कसे वाटते?
७ आपल्या स्वर्गातील पित्याविषयी आपली समज जसजशी वाढते, तसतसे त्याच्याविषयी इतरांना सांगण्याकरता आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात. (मत्त. १३:५२) इतरांना, विशेषकरून आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करण्याचे शिकवण्याचा केवढा सुहक्क आपल्याला लाभला आहे! (अनु. ६:५-७) ‘यहोवाची परमदया’ अनुभवत असताना आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांसोबत सातत्याने त्याच्या स्तुतीचा गजर करत राहू या.—स्तो. १४५:७.