नियतकालिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज जुलै – सप्टें.
“आजच्या ह्या जगात मुलांना वाढवणं खरोखरच खूप कठीण होऊन बसलयं. पण निर्माणकर्त्याच्या सल्ल्याचं पालन केल्यानं पालक आपल्या संगोपनाच्या पद्धतीत सुधारणा करू शकतील, असं तुम्हाला वाटतं का? [घरमालकाने होकारार्थी उत्तर दिले व त्याची अनुमती असेल तर नीतिसूत्रे २२:६ वाचा. पान १३ वरील लेख दाखवा] या लेखातील व्यवहारी सूचना तुम्हाला नक्कीच आवडतील.”
टेहळणी बुरूज ऑक्टो. – डिसें.
“तुम्हाला काय वाटतं, क्षुद्र मानव महान निर्माणकर्त्याशी दोस्ती करू शकतात का?” [घरमालकाचे मत ऐकून घ्या. एखादे शास्त्रवचन वाचून दाखवले तर चालेल का असे विचारा आणि होकारार्थी उत्तर आल्यास प्रेषितांची कृत्ये १७:२७ वचन वाचून दाखवा.] आपण त्याच्याशी दोस्ती करावी अशी देवाचीच इच्छा आहे असे आपण खात्रीने कसे म्हणू शकतो, याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.” पान २७ वरील लेख दाखवा.