नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
सन २००९ सेवा वर्षाच्या नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रमाचा विषय कलस्सैकर ४:१७ या वचनावर आधारित आहे. त्यात असे म्हटले आहे: ‘सेवा पूर्ण करण्याकडे लक्ष दे.’ ख्रिस्ती या नात्याने आपण हा सल्ला गांभीर्याने घेतो. आपल्यावर सुपूर्त केलेली सेवा पूर्ण करण्याचे आपलेही येशूप्रमाणे ध्येय आहे. (योहा. १७:४) प्रेषित पौलाने देखील याबाबतीत आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडले. आपली सेवा शेवटास नेण्याचा त्याने मनात दृढनिश्चय केला होता.—प्रे. कृत्ये २०:२४.
अनेक प्रचारकांना सेवेमध्ये कोणकोणत्या अडचणींवर मात करावी लागते, हे विभागीय पर्यवेक्षकांच्या भाषणातून आपल्याला कळेल. त्यानंतर, “तुम्ही जे पेरले आहे त्याची मशागत करा” असे शीर्षक असलेल्या भाषणात, “सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती” असलेल्या लोकांना आपण कशी मदत करू शकतो ते सांगण्यात येईल. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) पाहुणा वक्ता आधी “देवाचे सेवक म्हणून आपण आपली लायकी कशी पटवून देतो” या भाषणात २ करिंथकर ६:१-१० वचनांची एकएक करून चर्चा करील. आणि मग दुपारी, “तुम्हाला मिळालेल्या सेवेला बहुमोल समजा” या विषयावर आणखी एक भाषण तो सादर करील. “आबालवृद्ध सेवेचा आनंद लुटतात” आणि “आपली सेवा पूर्ण करणारे तरुण” या दोन भाषणांतूनही तुम्हाला बरेचसे उत्तेजन मिळू शकेल. विभागीय अथवा खास संमेलन दिवशी, पाण्याने बाप्तिस्मा घेऊन आपले समर्पण जाहीर करू इच्छिणाऱ्यांनी, होता होईल तितक्या लवकर आपापल्या मंडळ्यांच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांना याबाबत कळवावे. आपल्या सर्व संमेलनांचे व अधिवेशनांचे एक ठळक वैशिष्ट्य असते व ते म्हणजे टेहळणी बुरूज मासिकातील अभ्यास लेखाची चर्चा. तेव्हा, खास संमेलन दिवस ज्या आठवड्यात येतो त्या आठवड्याच्या अभ्यास लेखाची टेहळणी बुरूज मासिकाची तुमची व्यक्तिगत प्रत संमेलनाला न विसरता आणा.
आपली सेवा पूर्ण करण्यास दक्ष असताना, यहोवाने आपल्यावर सुपूर्त केलेली सेवा करण्यास जो वेळ असतो तो इतर कामांत आपण खर्चणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. या खास संमेलन दिवशी मिळणारे शास्त्रवचनीय उत्तेजन आपल्याला, योग्य दृष्टिकोन टिकवून ठेवण्याकरता कशाची गरज आहे हे समजण्यास व सेवा पूर्ण करण्याकरता आपण काय करत आहोत यावर विचार करण्यास मदत करेल.