वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०८ पृ. ६
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाचे प्रेम” या पुस्तकाचा बायबल अभ्यासासाठी उपयोग
    आमची राज्य सेवा—२०१०
  • बायबल काय शिकवते पुस्तक —बायबल अभ्यासाचे आपले मुख्य साधन
    आमची राज्य सेवा—२००६
  • बायबल जे शिकवते ते पाळण्यास इतरांना मदत करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km १/०८ पृ. ६

प्रश्‍न पेटी

▪ आपल्या बायबल विद्यार्थ्यांबरोबर आपण कोणत्या दोन प्रकाशनांचा अभ्यास केला पाहिजे?

बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी व तो पुढे चालू ठेवण्यासाठी बायबल काय शिकवते हे पुस्तक आपले मुख्य साधन आहे. अभ्यास सुरू करण्याकरता आपण एखाद्या उचित पत्रिकेचा उपयोग करण्यास काहीही हरकत नसली तरीसुद्धा आपण, होता होईल तितके लवकर बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अभ्यास सुरू करण्याकरता बायबल काय शिकवते पुस्तकाचा उपयोग केल्यामुळे अनेक प्रचारकांना अतिशय चांगले परिणाम लाभलेले आहेत.

बायबल काय शिकवते पुस्तकातून अभ्यास संपल्यानंतर व विद्यार्थी प्रगती करत असेल तर देवाची उपासना करा (इंग्रजी) पुस्तकाचा अभ्यासाकरता उपयोग करता येऊ शकतो. (कलस्सै. २:७) या पुस्तकाच्या पृष्ठ २ वर पुस्तकाच्या उद्देशाविषयी अशी माहिती देण्यात आली आहे: “देवावर प्रेम करणाऱ्‍यांनी त्याच्या अमूल्य सत्यांची ‘लांबी व रुंदी समजून’ घ्यावी असे बायबल सर्वांना आर्जवते. (इफिस. ३:१८) या हेतूने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक तुम्हाला आध्यात्मिकरीत्या वाढ करण्यास मदत करेल व देवाच्या धार्मिक नवीन जगाकडे जाणाऱ्‍या अरुंद मार्गावर चालण्यास तुम्हाला सज्ज करेल अशी आम्ही आशा करतो.”

दोन्ही पुस्तकांचा अभ्यास संपण्याआधीच जर विद्यार्थी बाप्तिस्मा घेण्यास पात्र ठरत असला तरीसुद्धा दुसऱ्‍या पुस्तकातून अभ्यास संपत नाही तोपर्यंत अभ्यास चालू ठेवावा. विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला तरी, संचालक अभ्यासाचा वेळ, पुनर्भेट आणि बायबल अभ्यास यांचा रिपोर्टमध्ये समावेश करू शकतो. संचालकाबरोबर गेलेला प्रचारक देखील हा वेळ रिपोर्टमध्ये लिहू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा