वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०४ पृ. ६
  • सुशील, वाखाणण्याजोगा पेहराव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुशील, वाखाणण्याजोगा पेहराव
  • आमची राज्य सेवा—२००४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रशंसास्पद पेहरावाकरता साहाय्यक
  • ◼ देवाचे वचन
  • आपल्या पेहरावाकडे लक्ष देणं महत्त्वाचं का आहे?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • साजेल असा वेष देवाबद्दल आदर व्यक्‍त करतो
    आमची राज्य सेवा—२००३
  • मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • यहोवाच्या नावाचा गौरव होईल असा तुमचा पेहराव आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ८/०४ पृ. ६

सुशील, वाखाणण्याजोगा पेहराव

१. प्रांतीय अधिवेशनाची तयारी करत असताना आपण आपल्या पेहरावाकडे लक्ष का द्यावे?

१ “यहोवाचे साक्षीदार अतिशय चांगले लोक आहेत! तुमचे सदस्य प्रेमळ आहेत, ते उत्तम पेहराव करतात आणि इतरांशी अतिशय आदरपूर्वक वागतात,” असे मागच्या वर्षी प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या बंधू भगिनींचे निरीक्षण केल्यानंतर एका हॉटेलच्या कर्मचाऱ्‍याने म्हटले. दुसऱ्‍या अधिवेशनाच्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्‍या स्त्रीने म्हटले: “आपल्या पेहरावाने तुम्ही लोक देवाला संतुष्ट करू इच्छिता हे अगदी स्पष्ट दिसून येते.” या विधानांवरून हेच दिसून येते की अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्‍यांकडे इतरांचे लक्ष असते. म्हणूनच आपण अशा पद्धतीने पेहराव करू इच्छितो की जो “सुवार्तेस शोभेल;” शिवाय, यामुळे बऱ्‍याचदा साक्षीदार नसलेले लोक आपली प्रशंसा करण्यास प्रवृत्त होतात आणि आपण देवाचे सेवक आहोत हे स्पष्टपणे दिसून येते. (फिलिप्पै. १:२७) येत्या प्रांतीय अधिवेशनाची तयार करताना आपल्या पेहरावाबद्दल आधीपासूनच विचार करणे योग्य आहे.

२. सुशीलतेने पेहराव व श्रृंगार करणे सोपे का नाही?

२ शिष्य याकोबाने लिहिले, “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते.” (याको. ३:१७) पण पेहरावातून शुद्धता अथवा सुशीलता हे गुण दाखवणे नेहमीच इतके सोपे नसते. सैतानाचे अनैतिक जग लोकांना अविनयशील, कामोत्तेजक आणि विचित्र व अनुचित स्टाईल्सचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करते. (१ योहा. २:१५-१७) म्हणून, पेहराव व श्रृंगार याविषयी निर्णय घेताना “अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, . . . वागावे” या बायबलमधील सल्ल्याचे आपण पालन केले पाहिजे. (तीत २:१२, १३) इतरांना, मग ते आपले बंधूभगिनी असोत, हॉटेल किंवा उपाहार गृहांतील कर्मचारी असोत किंवा इतर पाहणारे असोत, त्यांना आपल्याकडे पाहून कसेसे वाटेल अशाप्रकारची वेषभूषा आपण कधीही करू इच्छित नाही.—१ करिंथ. १०:३२, ३३.

३. कोणते प्रश्‍न आपल्याला वैयक्‍तिक पेहरावाचे परीक्षण करण्यास मदत करतील?

३ साजेल असा, मर्यादशील पेहराव: अधिवेशनाची तयारी करताना, स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘माझे कपडे मर्यादशील आहेत का, की ते माझ्याकडे अनावश्‍यक लक्ष आकर्षित करतात? इतरांच्या भावनांबद्दल आदर असल्याचे माझ्या कपड्यांवरून दिसून येते का? माझ्या ब्लाऊजचा गळा खूप खोल तर नाही, किंवा ते खूप आखूड तर नाही? माझ्या ड्रेसच्या स्टाईलमुळे अनावश्‍यक अंगप्रदर्शन तर होत नाही, किंवा ते फार घट्ट तर नाहीत? माझे कपडे स्वच्छ आहेत का, त्यांतून दुर्गंध तर येत नाही? हॉटेलमध्ये वावरताना किंवा संध्याकाळच्या वेळी हॉटेलच्या परिसरात विश्रांती घेताना माझे कपडे देवाच्या सेवकाला शोभतील असे स्वच्छ व नीटनेटके असतील का; की ते गबाळे, जगिक फॅड्‌सचे अनुकरण करणारे, अगदीच अनौपचारिक आणि बॅज कार्ड लावलेल्या, अधिवेशनाच्या प्रतिनिधीला न शोभणारे असतील? कार्यक्रमानंतर इतरवेळी, अनौपरचारिक साक्ष देण्याची संधी आल्यास, माझ्या पेहरावामुळे तर मला लोकांशी संभाषण सुरू करण्यास मागेपुढे पाहावे लागणार नाही ना?’—रोम. १५:२, ३; १ तीम. २:९.

४. सुशील पेहराव करण्यास इतरजण आपल्याला कशी मदत करू शकतात?

४ अनुभवी, परिपक्व ख्रिस्ती बांधवांनी व्यक्‍त केलेल्या मतांमुळे आपल्याला बरीच मदत होऊ शकते. आपल्या पेहरावाकडे इतरजण कशा दृष्टीने पाहण्याची शक्यता आहे, याविषयी पत्नींनी आपल्या आपल्या पतीला विचारावे. देवभीरू पालक, यासंदर्भात आपल्या किशोरवयीन मुलांना मदत करू शकतात. शिवाय, आदरणीय मनोवृत्तीच्या वृद्ध स्त्रियांनी खासकरून पेहरावाच्या बाबतीत “तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, . . . त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी असावे,” जेणेकरून, “देवाच्या वचनांची निंदा होणार नाही.” (तीत २:३-५) आपल्या विविध प्रकाशनांत, साजेल असा, मर्यादशील पेहराव दाखवणारी अनेक चित्रे देखील साहाय्यक ठरू शकतात.

५. अधिवेशनादरम्यान आपण सर्वजण यहोवाचे गौरव कसे करू शकतो?

५ यहोवाचे गौरव होईल अशाप्रकारे पेहराव करा: प्रांतीय अधिवेशने, केवळ कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्‍यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच यहोवाचे गौरव करण्याची अत्युत्तम संधी देतात. अर्थात, आपले ख्रिस्ती आचरण व संभाषण यांमुळे तर त्याचे गौरव होईलच. पण आपल्याकडे पाहणारे सहसा सर्वप्रथम आपल्या पेहरावाकडे, आपल्या वेषभूषेकडे पाहतात. तेव्हा, आपल्या सुशील, प्रशंसास्पद वैयक्‍तिक पेहरावाने आपण यहोवाचे गौरव करू या.—स्तो. १४८:१२, १३.

[६ पानांवरील चौकट]

प्रशंसास्पद पेहरावाकरता साहाय्यक

◼ देवाचे वचन

◼ आत्मपरीक्षण

◼ इतरांची मते

◼ ख्रिस्ती प्रकाशने

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा