देवाचा पाठिंबा असलेले कार्य
१ देवाच्या सेवकांपैकी आज, फार कमी असे आहेत ज्यांच्याकडे सध्याच्या युगात उल्लेखनीय शिक्षण, अमाप संपत्ती किंवा प्रतिष्ठा आहे. म्हणूनच, काही लोक आपल्या सेवेला कमी लेखतात. (यश. ५३:३) परंतु, आपण करत असलेल्या बायबल आधारित शैक्षणिक कार्यामुळे संपूर्ण जगभरातील लाखो लोकांना सांत्वन व आशा मिळाली आहे. या साध्यासुध्या लोकांना इतके मोठे यश कसे मिळाले आहे? केवळ देवाच्या पाठिंब्यामुळे. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १:८) प्रेषित पौलाने म्हटले: “जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले.”—१ करिंथ. १:२६-२९.
२ प्रेषित आणि पहिल्या शतकातील इतर ख्रिस्ती बहुत प्रमाणात “निरक्षर व अज्ञानी” होते. (प्रे. कृत्ये ४:१३) तरीपण, त्यांनी धाडसीपणे सुवार्तेचा प्रचार करण्याची कामगिरी पूर्ण केली आणि यहोवाने त्यांच्या परिश्रमांवर आशीर्वाद दिला. अडथळे आणि विरोध होत असताही “प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.” कोणीही हे कार्य थांबवू शकत नव्हते कारण या कार्याला देवाचा पाठिंबा होता. (प्रे. कृत्ये ५:३८, ३९; १९:२०) आधुनिक काळांतही असेच घडले आहे. शक्तिशाली शासकांनी विरोध करण्याचे ठरवले असतानाही ते सुवार्तेची वाढ थांबवू शकले नाहीत.—यश. ५४:१७.
३ सर्व श्रेय देवाला जाते: देवाचे सेवक होण्याचा आपल्याला खास लाभ मिळाला आहे, तेव्हा आपण फुशारकी मारावी का? नाही, मुळीच नाही. ख्रिस्ती सेवेविषयी पौलाने लिहिले: “ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही.” (२ करिंथ. ४:७) आपण आपली सेवा केवळ देवाकडील शक्तीनेच पूर्ण करू शकतो हे पौलाने ओळखले होते.—इफिस. ६:१९, २०; फिलिप्पै. ४:१३.
४ तसेच आपणही हे ओळखतो, की ‘देवापासून साहाय्य प्राप्त झाल्यामुळेच’ प्रचाराचे कार्य साध्य होत आहे. (प्रे. कृत्ये २६:२२) संपूर्ण जगभरात होणाऱ्या या घोषणेद्वारे यहोवा, राष्ट्रांमध्ये भीती पसरवण्याकरता एका शक्तिशाली मार्गाने आपला उपयोग करून घेत आहे; लवकरच येणाऱ्या विनाशकारक न्यायदंडाला हे पूर्वसूचित करते. (हाग्ग. २:७) एका महान आध्यात्मिक कापणीच्या कार्यात “देवाचे सहकारी” होण्याचा आपल्याला केवढा बहुमान मिळाला आहे.—१ करिंथ. ३:६-९.