प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने आपल्याला देवाचे गौरव करण्यास उत्तेजित करतात!
आतापर्यंत संपन्न झालेल्या “देवाचे गौरव करा,” या प्रांतीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांनी एक मोठी साक्ष दिली आहे. या महत्त्वपूर्ण ईश्वरशासित कार्यक्रमांमुळे यहोवाच्या नावाची महिमा झाली आहे आणि ‘परमेश्वराच्या नावाची थोरवी गाण्यासाठी’ आपल्याला आणखी तयार करण्यात आले आहे. (स्तो. ९६:८) खरेच, यहोवाची अद्भुत सृष्टी आणि त्यांतून प्रकट होणारे त्याचे सर्वोत्तम गुण यांमुळे तो गौरवास पात्र ठरतो.—ईयो. ३७:१४; प्रकटी. ४:११.
खालील प्रश्ने आणि तुम्ही घेतलेल्या टिपण्या यांचा उपयोग करून, जानेवारी १९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहादरम्यान अधिवेशनाच्या उजळणीची तयारी करा आणि त्यात सहभाग घ्या.
१. निर्जीव सृष्टी देवाचे गौरव कशी करते आणि हे, मानव करत असलेल्या स्तुतीपेक्षा वेगळे कसे आहे? (स्तो. १९:१-३; “निर्मिती देवाचे गौरव वर्णिते”)
२. रूपांतर कोणत्या सद्य वास्तविकतेची पूर्वझलक देते आणि कोणत्या प्रकारे आज ख्रिश्चनांना या वास्तविकतेमुळे प्रोत्साहन मिळते? (मुख्य भाषण, “प्रोत्साहक असलेले वैभवी भविष्यसूचक दृष्टान्त”)
३. संदेष्टा दानीएलाप्रमाणे आपणही नम्रता हा गुण कसा काय विकसित करू शकतो, आणि असे केल्याने आपला फायदा कसा होऊ शकतो? (दानी. ९:२, ५; १०:११, १२; “यहोवाचे गौरव नम्र लोकांना प्रकट केले जाते”)
४. (अ) आमोसच्या भविष्यवाणीतून आपण यहोवाच्या न्यायदंडाविषयी कोणत्या तीन गोष्टी शिकू शकतो? (आमो. १:३, ११, १३; ९:२-४, ८, १४) (ब) आमोस २:१२ मधील इशारेवजा उदाहरणातून कोणता व्यावहारिक धडा आज यहोवाचे साक्षीदार शिकू शकतात? (“आमोसची भविष्यवाणी—आपल्या दिवसाकरता त्याचा संदेश”)
५. (अ) एखाद्या व्यक्तीला मद्य घेतल्यानंतर नशा चढली नसली तरी मद्याच्या अतिसेवनाचे कोणते धोके आहेत? (ब) मद्याचा अमर्यादित वापर करण्याची सवय कशी काय सुधारता येऊ शकेल? (मार्क ९:४३; इफिस. ५:१८; “मद्याचा गैरवापर करण्याचा पाश टाळा”)
६. “उत्तम देश पाहा” (इंग्रजी) या नवीन प्रकाशनातून तुम्हाला कसा फायदा मिळत आहे? (“‘उत्तम देश’—परादीसची पूर्वझलक”)
७. कोणत्या तीन मार्गांनी आपण “आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब” पाडू शकतो? (२ करिंथ. ३:१८; “आरशांप्रमाणे यहोवाचे गौरव प्रतिबिंबित करा”)
८. विनाकारण होत असलेल्या द्वेषाचा उगम कोण आहे आणि असा द्वेष होत असतानाही एकनिष्ठ राहण्यास आपल्याला कशाप्रकारे मदत मिळू शकेल? (स्तो. १०९:१-३; “विनाकारण द्वेषाचे बळी”)
९. महानतेविषयी ख्रिस्तासारखा दृष्टिकोन कोणता आहे आणि आपल्याला असा दृष्टिकोन आणखी चांगल्याप्रकारे विकसित करण्याची गरज आहे हे एखादी व्यक्ती कसे ठरवू शकेल? (मत्त. २०:२०-२६; “महानतेविषयी ख्रिस्तासमान दृष्टिकोन विकसित करणे”)
१०. आपण शारीरिकरीत्या थकलेलो असलो तरी कोणती गोष्ट आपल्याला आध्यात्मिकरीत्या उत्साही राहण्यास मदत करू शकेल? (“थकलेले पण पूर्णपणे खचलेले नाही”)
११. कोणकोणत्या माध्यमांतर्फे सैतान लबाडी पसरवत आहे आणि विश्वासापासून आपल्याला बहकवण्याकरता केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना हाणून पाडण्याकरता शास्त्रवचनावर आधारित उचित प्रतिसाद कोणता आहे? (योहा. १०:५; “‘परक्यांच्या वाणीपासून’ सावधान”)
१२. (अ) पालक मार्क १०:१४, १६ मध्ये लिहिलेल्या येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतील? (ब) थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) या नवीन पुस्तकाविषयी तुम्हाला काय आवडते? (“आपली मुले—एक मौल्यवान देणगी”)
१३. युवक यहोवाची स्तुती कशी करत आहेत? (१ तीम. ४:१२; “युवक यहोवाची स्तुती कशी करत आहेत”)
१४. “विरोध असतानाही धैर्याने साक्ष देणे” या नाटकातील कोणती दृश्ये तुमच्या मनात अजूनही ताजी राहिली आहेत?
१५. पुढील व्यक्तींच्या उदाहरणाचे आपण अनुकरण कसे करू शकतो: (अ) पेत्र आणि योहान? (प्रे.कृत्ये ४:१०) (ब) स्तेफन? (प्रे.कृत्ये ७:२, ५२, ५३) (क) पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीतील बंधूभगिनी? (प्रे.कृत्ये ९:३१; “‘हार न मानता’ सुवार्तेची घोषणा करा”)
१६. (अ) कोणकोणत्या मार्गांनी आपण देवाचे गौरव करण्याचा दृढनिश्चय केला? (ब) “देवाचे गौरव करा” या अधिवेशनांत आपण जे काही शिकलो त्याचा अवलंब करताना आपण कशाची खात्री बाळगू शकतो? (योहा. १५:९, १०, १६; “‘अधिक फळ देऊन’ यहोवाचे गौरव करा”)
[१ पानांवरील चौकट]
अधिवेशनाद्वारे मिळालेल्या उत्तम आध्यात्मिक सूचनांवर मनन केल्याने आपण शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित होऊ. (फिलिप्पै. ४:८, ९) यामुळे, ‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करण्याचा’ आपला दृढनिश्चय आणखी पक्का होईल.—१ करिंथ. १०:३१.