सतत बदलत असलेल्या जगात प्रचार करणे
१ जगातील घडामोडींत किती लवकर बदल होऊ शकतो! एका रात्रीत, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक परिस्थिती कोलमडणे, राजनैतिक उलथापालथ किंवा एखादा भीषण अपघात ज्याच्या बातम्या सर्वदूर पसरतात, संभाषणाचा विषय बनू शकतात. अशाचप्रकारे लोक देखील आपले लक्ष लगेच बदलतात. (प्रे. कृत्ये १७:२१; १ करिंथ. ७:३१) तेव्हा, या सतत बदलत चाललेल्या जगात आपण, लोकांना राज्याचा संदेश सांगण्याकरता त्यांचे लक्ष काबीज कसे करू शकतो?
२ इतरांच्या चिंता ओळखा: लोकांचे लक्ष काबीज करण्याचा एका मार्ग म्हणजे चालू घडामोडींचा उल्लेख करणे. एके प्रसंगी येशूने आपल्या श्रोत्यांना, देवासमोर ते कोणत्या स्थितीत आहेत याचा गंभीर विचार करण्याचे आर्जवताना, त्यांना ठाऊक असलेल्या अलीकडच्या एका अपघाताचा उल्लेख केला. (लूक १३:१-५) अशाचप्रकारे, आपणही सुवार्ता सादर करतो तेव्हा, बातम्यांमधील एखाद्या चालू विषयाचा किंवा आपल्या क्षेत्रांतील लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या एखाद्या स्थानीय वादविषयाचा उल्लेख करू शकतो. परंतु असे करताना आपण राजकीय किंवा सामाजिक वादविषयांवर कोणा एका पक्षाची बाजू घेणार नाही याची खबरदारी बाळगावी.—योहा. १७:१६.
३ लोक सध्या कशाचा विचार करत आहेत हे आपण कसे समजू शकतो? सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, एखादा प्रश्न विचारा, मग त्यावर त्यांचे मत ऐकून घ्या. (मत्त. १२:३४) लोकांमध्ये आपल्याला आस्था असेल तर आपण इतरांच्या मतांची नोंद घेऊन व्यवहारचातुर्याचा उपयोग करून पुढे विचारपूस करण्यास प्रवृत्त होऊ. घरमालकाने लगेच मारलेल्या शेऱ्यावरून आपल्याला, त्या क्षेत्रातील पुष्कळांना कोणत्या गोष्टीची काळजी आहे हे कदाचित समजू शकेल व यामुळे आपल्याला साक्ष देण्याची संधी मिळेल.
४ सादरता तयार करणे: सतत बदलत असलेल्या जगात क्षेत्र सेवेची तयारी करताना आपण युक्तीवाद (इंग्रजी) पुस्तकाचा उपयोग करू शकतो. चालू घडामोडींचा आपल्या सादरतांमध्ये कसा उल्लेख करायचा त्याबाबतच्या उपयुक्त सूचना पृष्ठे १०-११ वर “गुन्हेगारी/सुरक्षा” व “चालू घडामोडी” या पोटमथळ्याखाली दिलेल्या आहेत. अशीच माहिती आमची राज्य सेवा ऑक्टोबर २०००, पृष्ठ ७ वर देखील मिळू शकते. सादरता तयार करताना एखादे उचित वचन त्यात समाविष्ट करण्यास विसरू नका.
५ आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या बदलत्या चिंतांची आपण दखल घेतो तेव्हा, सुवार्तेची सादरता आपण त्यानुसार बदलली पाहिजे. याद्वारे आपण लोकांना सर्वात जास्त ज्याची चिंता लागलेली असते त्यावर त्यांच्याशी चर्चा करू शकतो. आपण अधिकाधिक लोकांना, ज्याचे गुण व दर्जे कधीही बदलत नाहीत अशा देवाला ओळखण्यास मदत करू शकतो.—याको. १:१७.