वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०३ पृ. ८
  • सत्य आपल्याला बंधमुक्‍त कसे करते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्य आपल्याला बंधमुक्‍त कसे करते
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मुक्‍त पण जबाबदार लोक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “स्वातंत्र्याचे चाहते” प्रांतिय अधिवेशनांना तुमचे स्वागत असो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • खऱ्‍या स्वातंत्र्याकडे नेणारा मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ३/०३ पृ. ८

सत्य आपल्याला बंधमुक्‍त कसे करते

१ एकदा येशूने त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या यहुद्यांना म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहा. ८:३२) तो, निव्वळ नागरी स्वातंत्र्यापेक्षा वरचढ असलेल्या एका मुक्‍ततेविषयी बोलत होता; हे स्वातंत्र्य सर्वांना—श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित अशा सर्वांना मिळू शकते. पाप आणि मृत्यू यांच्या बंधनातून मुक्‍ती देणारे सत्य येशूने शिकवले. येशूने म्हटले: “जो कोणी पाप करितो तो पापाचा दास आहे.” (योहा. ८:३४) सर्व आज्ञाधारक मानवजातीला ‘नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल’ त्या समयाची आपण सर्व जण किती आतुरतेने वाट पाहत आहोत!—रोम. ८:२१.

२ येशूविषयीच्या आणि देवाचा उद्देश पूर्ण होण्यामध्ये येशूच्या भूमिकेविषयीच्या सत्यामुळे हे स्वातंत्र्य मिळते. या सत्यात, येशूने आपल्यासाठी दिलेल्या खंडणी बलिदानाच्या ज्ञानाचा समावेश होतो. (रोम. ३:२४) आता देखील, बायबल सत्य स्वीकारून आज्ञाधारकपणे त्याच्या अधीन झाल्याने आपल्याला भय, निराशा आणि सर्व प्रकारच्या हानीकारक प्रथांपासून काही प्रमाणात मुक्‍ती मिळते.

३ भय आणि निराशा यांपासून मुक्‍ती: जगाची परिस्थिती पाहून आपण निराश होण्याची गरज नाही कारण, दुष्टाई अस्तित्वात का आहे व लवकरच पृथ्वीवरून तिचे उच्चाटन केले जाणार आहे हे आपल्याला माहीत आहे. (स्तो. ३७:१०, ११; २ तीम. ३:१; प्रकटी. १२:१२) शिवाय, मृतांच्या स्थितीविषयीच्या खोट्या शिकवणींपासून सत्य आपली सुटका करते. मेलेले लोक आपल्याला इजा करू शकत नाहीत, त्यांना चिरकाल यातना दिल्या जात नाहीत आणि देव त्यांना आत्मिक वातावरणात राहण्याकरता मृत्यू देऊन स्वतःकडे घेत नाही, या सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत.—उप. ९:५; प्रे. कृत्ये २४:१५.

४ एका जोडप्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा त्यांना या सत्यानेच सावरले. त्या मुलाच्या आईने म्हटले: “आमच्या जीवनात जणू एक पोकळी निर्माण झाली आहे जी आम्ही जोवर आमच्या मुलाला पुनरुत्थानात पाहणार नाही तोवर भरून निघणार नाही. सध्या आम्हाला होत असलेले दुःख हे तात्पुरते आहे हे आम्हाला माहीत आहे.”

५ हानीकारक प्रथांपासून सुटका: बायबलमधील सत्य, एखाद्या व्यक्‍तीच्या विचारशैलीचे व व्यक्‍तिमत्त्वाचे रूपांतर करू शकते; यामुळे टाळता येण्याजोग्या समस्यांपासून त्या व्यक्‍तीची सुटका होते. (इफिस. ४:२०-२४) प्रामाणिकपणा व उद्योगीपणा यांमुळे दारिद्र्‌य कमी होऊ शकते. (नीति. १३:४) आत्म-त्यागी प्रेम दाखवल्याने इतरांबरोबरचे नातेसंबंध सुधारतात. (कलस्सै. ३:१३, १४) ख्रिस्ती मस्तकपदाचा आदर केल्याने कौटुंबिक समस्यांचे प्रमाण कमी होते. (इफिस. ५:३३–६:१) दारूबाजी, लैंगिक अनैतिकता, तंबाखू आणि मादक पदार्थांचे सेवन टाळल्याने आरोग्य सुदृढ राहते.—नीति. ७:२१-२३; २३:२९, ३०; २ करिंथ. ७:१.

६ एक तरुण मनुष्य नऊ वर्षांपासून त्याला असलेले मादक पदार्थांचे व्यसन सोडू शकला. एके दिवशी तो रस्त्यावर साक्षकार्य करणाऱ्‍या एका प्रचारकाला भेटला. त्याने साहित्य स्वीकारले आणि त्याच्या घरी भेट देण्याची योजना करण्यात आली. त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला. दोन महिन्यांनंतर, या मनुष्याने मादक पदार्थ घेण्याचे पूर्णपणे थांबवले आणि अभ्यासाच्या आठ महिन्यांनंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. त्याचे हे व्यसन सुटलेले पाहून त्याच्या मोठ्या भावाने आणि वहिनीने बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली.

७ इतरांनाही स्वातंत्र्य मिळवण्यास मदत करा: खोट्या शिकवणींच्या दास्यत्वात बऱ्‍याच वर्षांपासून असलेल्यांना, देवाच्या वचनातून मिळणारे स्वातंत्र्य समजायला कठीण जाईल. त्यांच्या हृदयापर्यंत पोहंचण्याकरता शिक्षकाला खास मेहनत व चांगली तयारी करणे आवश्‍यक आहे. (२ तीम. ४:२, ५) “धरून नेलेल्यांस मुक्‍तता . . . विदित” करण्याच्या आपल्या कार्यात मंद होण्याची ही वेळ नव्हे. (यश. ६१:१) ख्रिस्ती स्वातंत्र्य बहूमुल्य आहे. ते प्राप्त करणे म्हणजे सार्वकालिक जीवन होय.—१ तीम. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा