मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जाने.-मार्च
“एड्स रोग हा सध्या जगातील संसर्गजन्य जीवघेण्या रोगांपैकी प्रथम क्रमांकावर आहे. या रोगाला बळी पडणाऱ्यांसाठी काही आशा आहे का? [उत्तर ऐका.] आपला निर्माणकर्ता असे अभिवचन देतो, की ‘मी रोगी आहे,’ असे कोणीही म्हणणार नाही असा एक काळ लवकरच येणार आहे. [यशया ३३:२४ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात एड्सचे थैमान कोठवर चालणार? या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.”
टेहळणी बुरूज मार्च१५
“येशूच्या शिकवणी आपल्या काळासाठी लागू होतात असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] येशूने आपल्या जीवनाच्या शेवटल्या दिवशी दिलेल्या या आज्ञेशी तुम्ही निश्चित सहमत व्हाल. [योहान १५:१२ वाचा.] याच दिवशी येशूने इतरही अनेक मौल्यवान धडे शिकवले. त्यांपासून आपण लाभ कसा मिळवू शकतो ते या टेहळणी बुरूज अंकात सांगितले आहे.”
सावध राहा! जाने.-मार्च
“आपल्यातील बहुतेकांना काही वाईट सवयी असतात. या सवयींवर मात करणे शक्य आहे, असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा आणि रोमकर ७:१८, १९ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात [पृष्ठ २६ काढा] वाईट सवयींबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे ते सांगण्यात आले आहे आणि या सवयींविरुद्ध यशस्वीरीत्या लढा देण्यास हा अंक आपली मदत करू शकतो.”
टेहळणी बुरूज एप्रिल१
“येथे दाखवण्यात आलेल्या या भोजनाचे परंपरागत नाव शेवटले भोजन असे आहे. [मासिकाचे मुखपृष्ठ आणि शेवटले पान दाखवा.] केवळ हाच प्रसंग ख्रिश्चनांना साजरा करण्याची आज्ञा देण्यात आली होती हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तरासाठी थांबा. मग लूक २२:१९ वाचा.] हा सण इतका महत्त्वपूर्ण का आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होतो, हे या मासिकात सांगण्यात आले आहे.”