एखाद्या नातेवाईकाला बहिष्कृत केले जाते तेव्हा ख्रिस्ती एकनिष्ठा दाखवा
१. कोणत्या परिस्थितीमुळे एखाद्या ख्रिश्चन व्यक्तीच्या एकनिष्ठेची परीक्षा होऊ शकते?
१ कौटुंबिक सदस्यांमधील बंधन हे अतूट असते. त्यामुळे, एखादा विवाह सोबती, एखादे मूल, एक पालक, किंवा कोणी जवळचा नातेवाईक बहिष्कृत होतो किंवा स्वतःहून मंडळीशी संबंध तोडून अलिप्त होतो तेव्हा सत्यात असलेल्या त्याच्या ख्रिश्चन नातेवाईकाची जणू परीक्षाच असते. (मत्त. १०:३७) एकनिष्ठ ख्रिश्चनांनी अशा नातेवाईकाला कशाप्रकारे वागवले पाहिजे? बहिष्कृत झालेली व्यक्ती तुमच्या घरात राहत असेल तर तुम्ही तिच्याबरोबर वेगळ्या प्रकारे वागले पाहिजे का? पहिल्यांदा आपण, बायबल या विषयावर काय म्हणते याविषयी पाहू या; यातील तत्त्वे बहिष्कृत झालेल्यांना व स्वतःहून मंडळीपासून विभक्त होणाऱ्यांना सारखीच लागू होतात.
२. बायबलनुसार, ख्रिश्चनांनी मंडळीमधून बहिष्कृत झालेल्यांना कसे वागवले पाहिजे?
२ बहिष्कृत केलेल्यांशी कसे वागायचे: मंडळीमधून बहिष्कृत केलेल्या व्यक्तीशी सहवास राखू नये किंवा संगती करू नये असे देवाचे वचन ख्रिस्ती जनांना आज्ञा देते: “बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसहि बसू नये. . . . त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथ. ५:११, १३) मत्तय १८:१७ मधील येशूचे शब्द देखील याजशी संबंधित आहेत: “[बहिष्कृत केलेला] तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.” येशूच्या श्रोत्यांना चांगल्याप्रकारे माहीत होते, की त्यांच्या दिवसांतील यहुदी लोक विदेश्यांबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवत नसत व जकातदारांना तर ते वाळीत टाकलेल्यांप्रमाणे वागवत असत. अशाप्रकारे येशू आपल्या अनुयायांना, बहिष्कृत झालेल्यांबरोबर संगती न ठेवण्याचा सल्ला देत होता.—टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९८१ (इंग्रजी), पृष्ठे १८-२० पाहा.
३, ४. बहिष्कृत केलेल्यांबरोबर व स्वतःहून मंडळीपासून विभक्त झालेल्यांबरोबर कोणत्या प्रकारचा सहवास निषिद्ध आहे?
३ याचा अर्थ, एकनिष्ठ ख्रिश्चन मंडळीमधून बहिष्कृत झालेल्यांबरोबर कसलाही आध्यात्मिक सहवास ठेवत नाहीत. परंतु इतकेच पुरेसे नाही. देवाचे वचन म्हणते की आपण “अशा लोकांच्या पंक्तीसहि बसू नये.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथ. ५:११) तेव्हा, बहिष्कृत झालेल्या व्यक्तीबरोबर आपण सामाजिक स्तरावरही संगती टाळतो. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर, सहल, पार्टी, खेळ, बाजारहाट करणे किंवा सिनेमा पाहायला जाणे, घरात किंवा रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी एकत्र बसणे देखील योग्य नाही.
४ बहिष्कृत व्यक्तीबरोबर बोलण्याबाबतीत काय? बायबलमध्ये हरएक प्रसंगाची सविस्तर माहिती दिलेली नसली तरी, २ योहान १० आपल्याला याबाबतीत यहोवाचा काय दृष्टिकोन आहे ते समजण्यास मदत करते: “हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हांकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका.” यावर अधिक विवेचन मांडताना, टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९८१ (इंग्रजी), पृष्ठ २५ वर असे म्हटले आहे: “बहिष्कृत व्यक्तीला केवळ ‘नमस्ते’ म्हणणे देखील संभाषण पुढे वाढवण्यासाठी आणि कदाचित मैत्रीसाठी देखील उचललेले पहिले पाऊल ठरू शकते. एका बहिष्कृत व्यक्तीसाठी आपल्याला हे पहिले पाऊलही उचलावेसे वाटेल का?”
५. बहिष्कृत झाल्यावर एक व्यक्ती कोणकोणत्या गोष्टी गमावते?
५ होय, त्याच टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या पृष्ठ ३१ वर म्हटले आहे: “एक ख्रिस्ती व्यक्ती पाप करते व तिला बहिष्कृत करावे लागते तेव्हा ती पुष्कळ काही गमावते: देवासमोर तिची स्वीकृत भूमिका; . . . बंधूभगिनींबरोबरील गोड सहवास आणि ख्रिस्ती नातेवाईकांबरोबरील पूर्वीसारखी त्याची संगती.”
६. एखाद्या ख्रिश्चनाने बहिष्कृत झालेल्या नातेवाईकाबरोबर एकाच घरात राहत असताना सर्व प्रकारचा संबंध तोडावा का? स्पष्ट करा.
६ घरात: याचा अर्थ असा होतो का, की एखाद्या ख्रिस्ती कुटुंबातील सदस्य बहिष्कृत झालेला असेल तर कुटुंबातील इतरांनी त्यांच्या दररोजच्या जीवनात त्याच्याबरोबर बोलणे, खाणेपिणे व संगती करणे टाळले पाहिजे? टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२, पृष्ठ १८ वरील तळटीपेत म्हटले आहे: “कोणा ख्रिस्ती घरात एखादी बहिष्कृत व्यक्ती असल्यास ती घरातील सर्वसाधारण, दैनंदिन व्यवहारात व कार्यात सहभागी असू शकते.” तेव्हा, जेवताना किंवा दररोजच्या इतर कामांच्या वेळी तिला कितपत वगळायचा हा निर्णय कुटुंबातील सदस्य कदाचित घेतील. पण, तरीसुद्धा ते ज्यांच्याबरोबर सहवास राखतात त्या बांधवांना ते असे भासू देऊ इच्छिणार नाहीत, की बहिष्कृत होण्याआधी जसे सर्व काही होते तसेच आताही आहे.
७. कुटुंबातील एखादा सदस्य बहिष्कृत होतो तेव्हा घरातील आध्यात्मिक संगती कशाप्रकारे बदलते?
७ पण, टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९८१ (इंग्रजी), पृष्ठ २८ वर बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबद्दल किंवा स्वतःहून मंडळीपासून विभक्त हो णाऱ्या व्यक्तीबद्दल असे म्हटले आहे: “त्या व्यक्तीबरोबर पूर्वीसारखे आता कोणत्याही प्रकारचे आध्यात्मिक संबंध राहणार नाहीत. ही गोष्ट नातेवाईकांना अगदी जवळच्या म्हणजे एकाच घरात राहणाऱ्या कुटुंबियांना देखील लागू होते. . . . पूर्वी घरात ज्याप्रकारची आध्यात्मिक संगती होती तशी आता राहणार नाही. उदाहरणार्थ, पती बहिष्कृत असेल तर पत्नीला व मुलांना त्याचे कौटुंबिक बायबल अभ्यास घेणे किंवा बायबल वाचन अथवा प्रार्थना करणे विचित्र वाटू शकते. त्याला प्रार्थना करायचीच असेल, जसे की जेवणाच्या वेळी तर त्याला आपल्या घरात तसे करण्याचा अधिकार आहे. पण मग पत्नी व मुले आपापली प्रार्थना मनातल्या मनात करू शकतात. (नीति. २८:९; स्तो. ११९:१४५, १४६) कुटुंब मिळून बायबल वाचन करत असताना किंवा बायबल अभ्यास होत असताना बहिष्कृत व्यक्ती अशा प्रसंगी उपस्थित राहू इच्छित असेल तर? तर घरातील इतर जण तिला उपस्थित राहून ऐकण्याची अनुमती देऊ शकतात, या अटीवर की त्या व्यक्तीने त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू नये किंवा आपले धार्मिक विचार मांडू नयेत.”
८. घरात बहिष्कृत झालेले मूल असते तेव्हा ख्रिस्ती पालकांची काय जबाबदारी असते?
८ समजा घरातील लहान मुलगा/मुलगी बहिष्कृत असेल तर त्याच्या/तिच्या पालनपोषणाची जबाबदारी ही अजूनही ख्रिस्ती पालकांचीच असते. टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९८९ पृष्ठ २३ वर म्हटले आहे: “त्याला त्यांनी जसे अन्न, वस्त्र आणि निवारा देत राहणे जरूरीचे आहे त्याचप्रमाणे त्याला त्यांनी देवाच्या वचनाच्या अनुषंगाने सूचना देण्याची व शिस्त लावण्याची गरज आहे.” (नीतिसूत्रे ६:२०-२२; २९:१७) यामुळे, तो जरी बहिष्कृत असला तरीही प्रेमळ पालक त्याच्यासोबत गृह बायबल अभ्यास करण्याची योजना कदाचित करतील. त्याच्याशी एकटेपणात अभ्यास केल्यामुळे त्यातून त्याला अधिक सुधारणुकीचे फायदे मिळू शकतील. किंवा कुटुंबाच्या अभ्यासाच्या व्यवस्थेत त्याने सहभाग घेण्याचे चालू ठेवावे असे ते इच्छितील.”—तसेच, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००१ पृष्ठे १६-१७ देखील पाहा.
९. एकाच घरात न राहणाऱ्या बहिष्कृत नातेवाईकाबरोबर ख्रिश्चनांनी कितपत संपर्क ठेवावा?
९ वेगळे राहणारे नातेवाईक: टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९८८ पृष्ठ २३ वर असे म्हटले आहे: ‘तथापि, बहिष्कृत झालेला किंवा स्वतःला अलिप्त करून घेणारा हा असा माणूस आहे जो घरचा यजमान नसून त्या घराशी संबंधित असणारा नातेवाईक आहे व तो दुसरीकडे राहतो, तेव्हा मात्र परिस्थिती वेगळी असते. अशा या नातेवाईकासोबत कोणताही संपर्क न राखणे शक्य आहे. जरी काही कुटुंबातील गोष्टीकरता जरूरीचा संपर्क आलाच तरीही तो, अपश्चात्तापीपणे पाप करणाऱ्या ‘कोणाबरोबरही’ “संगत धरू नये,” या ईश्वरी आज्ञेच्या एकवाक्यतेत कमीत कमी राखला पाहिजे.’ (१ करिंथ. ५:११) एकनिष्ठ ख्रिश्चनांनी अशा नातेवाईकाबरोबर अनावश्यक संगती करण्याचे टाळावे; कामाच्या गोष्टीसुद्धा कमीत कमी कराव्यात.—तसेच टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९८१ (इंग्रजी), पृष्ठे २९-३० देखील पाहा.
१०, ११. बहिष्कृत नातेवाईकाला पुन्हा घरात राहायला घेण्याआधी एक ख्रिस्ती कोणकोणत्या गोष्टींचा विचार करेल?
१० टेहळणी बुरूज नियतकालिकात, उद्भवू शकणाऱ्या आणखी एका परिस्थितीबद्दल सांगितले आहे: “समजा एक जवळचा नातेवाईक, जसे की एक मुलगा किंवा पालक जे तुमच्याबरोबर राहत नाहीत आणि बहिष्कृत आहेत व आता तुमच्यासोबत घरी राहायला येऊ इच्छितात, मग काय? परिस्थितीनुसार काय करायचे हे कुटुंब मिळून ठरवले जाऊ शकते. जसे की, बहिष्कृत पालक आजारी असेल व आर्थिकरीत्या आणि शारीरिकरीत्या स्वतःची काळजी घेऊ शकत नसेल. ख्रिस्ती मुलांवर त्यांना साहाय्य करण्याची शास्त्रवचनीय व नैतिक जबाबदारी आहे. (१ तीम. ५:८) . . . पालकाच्या खरोखरच्या गरजा काय आहेत, त्यांची/तिची मनोवृत्ती काय आहे आणि घराच्या मस्तकाला कुटुंबाच्या आध्यात्मिक कल्याणाची असलेली काळजी यावर आधारित काय करायचे ते ठरवले जाऊ शकते.”—टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९८१ (इंग्रजी), पृष्ठे २८-९.
११ मूल बहिष्कृत झालेले असेल तर, त्याच लेखात पुढे म्हटले आहे: “काही वेळा ख्रिस्ती पालकांनी शारीरिकरीत्या किंवा भावनिकरीत्या आजारी असलेल्या बहिष्कृत मुलाला पुन्हा घरात येऊन राहण्याची परवानगी दिलेली असते. पण, पालक मुलाची परिस्थिती पाहू शकतात. बहिष्कृत मुलगा वेगळा राहत होता पण आता तो राहू शकत नाही का? त्याला आता जरा आरामात राहायचे आहे म्हणून तो पुन्हा घरी येऊ इच्छितोय का? त्याचे नैतिक आचरण व मनोवृत्ती कशी आहे? घरामध्ये तो “खमीर” तर ठरणार नाही ना?—गलती. ५:९.”
१२. बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेचे काय लाभ आहेत?
१२ यहोवाशी एकनिष्ठ राहण्याचे लाभ: बहिष्कृत करण्याच्या व अपश्चात्तापी अपराध्यांना दूर सारण्याच्या शास्त्रवचनांवर आधारित असलेल्या व्यवस्थेला सहकार्य देणे लाभदायी आहे. यामुळे मंडळीची शुद्धता टिकून राहते आणि आपण बायबलच्या उच्च नैतिक स्तरांचे समर्थन करणारे म्हणून उठून दिसतो. (१ पेत्र १:१४-१६) यामुळे भ्रष्ट प्रभावांपासून आपले संरक्षण होते. (गलती. ५:७-९) शिवाय, पाप करणाऱ्यालासुद्धा, मिळालेल्या वाग्दंडापासून पूर्ण लाभ मिळवता येतो आणि त्याला “नीतिमत्त्व व शांतिकारक फळ” उत्पन्न करण्याची संधी मिळते.—इब्री १२:११.
१३. एका कुटुंबाने कोणते फेरबदल केले आणि याचा काय परिणाम झाला?
१३ विभागीय संमेलनातील एक भाषण ऐकल्यानंतर, एका बहिणीला व भावाला जाणवले, की सहा वर्षांपासून बहिष्कृत असलेल्या व वेगळी राहणाऱ्या आपल्या आईबरोबरील त्यांच्या व्यवहारात त्यांना काही फेरबदल करावे लागतील. संमेलनानंतर लगेच, या बांधवाने आपल्या आईला बोलवले आणि तिला त्यांच्या प्रेमाची खात्री करून दिल्यावर समजावून सांगितले, की कुटुंबाच्या बाबतीत अगदीच महत्त्वाचे असे काही बोलायचे असल्याशिवाय ते तिच्याबरोबर बोलू शकणार नाहीत. यानंतर काही काळातच, त्यांच्या आईने सभांना उपस्थित राहायला सुरवात केली व कालांतराने तिला पुन्हा मंडळीत घेण्यात आले. शिवाय, सत्यात नसलेल्या तिच्या पतीने देखील बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली व कालांतराने त्यांचा बाप्तिस्मा झाला.
१४. बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेला आपण एकनिष्ठपणे सहकार्य का दिले पाहिजे?
१४ शास्त्रवचनांवर आधारित असलेल्या बहिष्कृत करण्याच्या व्यवस्थेचे एकनिष्ठपणे समर्थन केल्याने यहोवाबद्दल आपल्या मनात प्रेम आहे हे दिसून येईल आणि जो यहोवाची निंदा करत आहे त्याला यहोवाला उत्तर देता येईल. (नीति. २७:११) आणि आपण यहोवाकडून आशीर्वादांची खात्री बाळगू शकतो. राजा दाविदाने यहोवाविषयी असे लिहिले: “मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही, एकनिष्ठ जनांशी तू एकनिष्ठेने वागतोस.”—२ शमु. २२:२३, २६, NW.