वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. १
  • राज्याचा प्रचार लोकांचे जीव वाचवतो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्याचा प्रचार लोकांचे जीव वाचवतो!
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीची भावना टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “प्रथम . . . सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • “शुभवृत्त विदित करणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. १

राज्याचा प्रचार लोकांचे जीव वाचवतो!

१ सध्या संपूर्ण जगात होणारे ते सर्वात महत्त्वपूर्ण कार्य आहे. यहोवा देव, येशू ख्रिस्त आणि असंख्य देवदूत या सर्वांची नजर या कार्यावर आहे. ते कोणते कार्य आहे आणि ते इतके महत्त्वपूर्ण का आहे? ते राज्य प्रचाराचे कार्य आहे आणि या कार्यामुळे लोकांचा जीव वाचतो!—रोम. १:१६; १०:१३, १४.

२ काही लोकांना वाटते, की आपल्या सभोवतालचे जग सुधारण्याच्या कार्यात भाग घेऊन आपण लोकांची अधिक मदत करू शकतो. पुष्कळ लोक, शांती आणण्याचा, रोग बरे करण्याचा आणि आर्थिक परिस्थितीत सुधार करण्याचा प्रयत्न करण्यात गुंतलेले आहेत. पण, या सर्व कार्यांपेक्षा अधिक फायदेकारक कोणते कार्य ठरू शकेल?

३ सर्वात श्रेष्ठ कार्य: राज्याच्या संदेशातच खरे तर, जीवनाचा उद्देश, मानवावर आलेले दुःख आणि भवितव्याची एकमेव आशा यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे. राज्याच्या सुवार्तेमुळे लोक यहोवा देवाचे मित्र होऊ शकतात आणि “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति” प्राप्त करू शकतात. (फिलिप्पै. ४:७) फक्‍त राज्याचा संदेशच, जीवनाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन देतो आणि भवितव्यात होणाऱ्‍या दुष्ट जगाच्या नाशातून आपले जीवन कसे वाचवता येईल ते सांगतो. (१ योहा. २:१७) तेव्हा, राज्याच्या प्रचार कार्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न व्यर्थ ठरतील का?

४ उदाहरणार्थ: एखाद्या गावातील धरण लवकरच फुटणार आहे परंतु तेथील लोक मात्र अजूनही झोपलेले आहेत. या गावकऱ्‍यांचे जीव वाचवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता असू शकेल? कमजोर झालेल्या धरणाच्या भिंतींमागील पाणी उपसून आपण त्यांचे जीव वाचवू शकू का? अवकळा पसरलेल्या गावात सुधारणा केल्याने लोकांचे जीव वाचतील का? मुळीच नाही! गावकऱ्‍यांना झोपेतून उठवून त्यांना येणाऱ्‍या संकटाविषयी सांगितले पाहिजे आणि तेथून पळून जाण्यास त्यांना मदत केली पाहिजे! आजही आध्यात्मिक अर्थाने झोपलेल्या लोकांसमोर खूप मोठा धोका आहे. (लूक २१:३४-३६) या सद्य व्यवस्थीकरणाचा लवकरच नाश होणार असल्यामुळे आपण होता होईल तितक्या तातडीने लोकांना याविषयी सांगण्याचा प्रयत्न करू या.—२ तीम. ४:२; २ पेत्र ३:११, १२.

५ या कार्यात टिकून राहा: या कार्यात टिकून राहा: प्रामाणिक अंतःकरणाच्या अधिकाधिक लोकांशी—त्यांच्या घरी, रस्त्यावर, टेलिफोनवर आणि अनौपचारीकरीत्या संपर्क साधण्यासाठी आपण वेगवेगळे मार्ग शोधत राहू या. यहोवा देवाने आपल्याला दिलेले हे कार्य अतिशय महत्त्वाचे कार्य आहे जे आपण आपल्या शक्‍तीच्या जोरावर करू शकणार नाही. हे कार्य आपण आवेशाने केले तर आपण ‘स्वतःचे व आपले ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधू.’—१ तीम. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा