पराकोटीचे सामर्थ्य यहोवाकडून प्राप्त होते
१ येशूच्या सर्व शिष्यांना पवित्र सेवेचा एक अनमोल विशेषाधिकार—ख्रिस्ती सेवाकार्य—देण्यात आला आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) पण, मानवी अपरिपूर्णता आणि या व्यवस्थीकरणाच्या दबावांमुळे आपण काही वेळा स्वतःला त्याकरता काहीसे अपात्र समजू.
२ असे आपल्याला वाटते तेव्हा, करिंथमधील अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिलेल्या प्रेषित पौलाच्या पत्रापासून आपण सांत्वन प्राप्त करू शकतो. त्याने लिहिले: “ही आमची संपत्ति मातीच्या भांड्यांत आहे.” (२ करिंथ. ४:७) पौलाला पूर्ण विश्वास होता: “ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडीत नाही.” (२ करिंथ. ४:१) हे खरे आहे, की सुवार्ता प्रचार करत राहणे आणि ‘धैर्य न सोडणे’ आपल्या सर्वांकरता एक आव्हान आहे; मग आपण अभिषिक्तांपैकी असू किंवा “दुसरी मेंढरे” यांपैकी असू. ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देणाऱ्या देवापासून बळ प्राप्त करणे आपल्यासाठी अगत्याचे आहे.—योहा. १०:१६; २ करिंथ. ४:७ब.
३ अनेक साक्षीदार कडा विरोध, गंभीर शारीरिक समस्या, पैशाची चणचण असताना देखील आवेशी प्रचारक आहेत, हे जाणल्याने प्रोत्साहन प्राप्त होते. प्रचार करण्याच्या आपल्या नेमणुकीला यहोवाचे पाठबळ आहे, याची आपल्या सर्वांनी जाण राखली पाहिजे. प्रचार करण्याचा आपला निर्धार निराशा किंवा भीती या गोष्टींनी कमजोर होऊ देण्याऐवजी आपण “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत” जाऊ.—इफिस. ६:१०; नीति. २४:१०.
४ देवाचे सामर्थ्य प्राप्त करणे: देवाकडे त्याच्या मदतीची आणि सामर्थ्याची याचना करत प्रार्थनेत तत्पर असा. (रोम. १२:१२; फिलिप्पै. ४:६, ७) त्यानंतरची गोष्ट म्हणजे, यहोवाकडून पराकोटीचे सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी त्यावर संपूर्ण अंतःकरणाने भरवसा ठेवा. (नीति. ३:५) आपल्या नियतकालिकांमधील आधुनिक दिवसांतील जीवन-कथा वाचा कारण परीक्षांमध्ये तग धरण्यासाठी यहोवा आपल्या सेवकांना मदत करत आहे, याची प्रचिती त्या कथांतून मिळते. मंडळीतील बांधवांसोबत सलोख्याचा संबंध ठेवा आणि मंडळीच्या सभांना जाण्याचे सोडू नका.—रोम. १:११, १२; इब्री. १०:२४, २५.
५ राज्य प्रचाराच्या सर्वात महत्त्वाच्या कार्यात धैर्य न सोडण्यासाठी यहोवाच्या सामर्थ्याने—पराकोटीच्या सामर्थ्याने आपल्या सर्वांना मदत करावी—त्याने ते सामर्थ्य आपल्याला द्यावे म्हणून आपण आपल्या परीने प्रयत्न करावा.