आपण वारंवार भेटी का घेत असतो?
१ असा प्रश्न, कदाचित सेवेसाठी एखाद्या दिवशी तयारी करत असताना तुम्ही कधी स्वतःला विचारला का? भारतातील मंडळ्यांना, ते एका वर्षात उरकू शकतील इतक्याच क्षेत्राची मागणी संस्थेकडे करण्यास सांगितल्यामुळे, नवनवीन क्षेत्रांत कार्य करण्याची सवय झालेल्या आपल्यापैकी काहींना आता, वर्षा मागून वर्षे त्याच त्या क्षेत्रांत जाणे असामान्य वाटते. काही ठिकाणी म्हणजे जेथे आपले क्षेत्र वारंवार उरकले जाते तेथील कित्येक घरमालक कदाचित आपल्याला ओळखून लगेच आपल्यावर दार लोटून घेत असतात. केवळ काही मूठभरच लोक अनुकूलरित्या प्रतिसाद देतात. असे असले तरी, आपण वारंवार भेटी घेण्यामागे काही सबळ कारणे दडलेली आहेत.
२ प्रथम, शेवट येईपर्यंत आपल्याला अखंड प्रचार करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) आपल्याला किती काळ प्रचार करावा लागेल याबाबत संदेष्टा यशयाने विचारणा केली होती. त्याला मिळालेले उत्तर यशया ६:११ मध्ये नमूद आहे. यात काही प्रश्नच नाही—देवाचा संदेश घेऊन लोकांकडे जात राहण्यास त्याला सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे, आजही लोकांनी आपल्याला घालवून दिले तरी, आपल्या क्षेत्रातील लोकांची आपण वारंवार भेट घेत राहावी अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (यहे. ३:१०, ११) आपल्याला सोपवून दिलेली ही एक पवित्र जबाबदारी आहे.—१ करिंथ. ९:१७.
३ वारंवार भेटी घेण्यामागील आणखी एक कारण म्हणजे, यहोवाप्रती असणाऱ्या आपल्या भक्तिभावाची गहनता प्रदर्शित करण्याची एक संधी आपल्याला मिळते. (१ योहा. ५:३) शिवाय, नजिकच्या भवितव्यात मानवजातीकरता काय राखून आहे यावर आपण मनन करतो तेव्हा, आपल्या शेजाऱ्यांना प्रेमळपणे बजावण्याचा प्रयत्न केल्याशिवाय आपण कसे राहू शकतो बरे? (२ तीम. ४:२; याको. २:८) आपली कार्यनियुक्ती निभावण्यातील आपल्या विश्वासूपणामुळे, उद्धाराच्या देवाच्या संदेशास प्रतिसाद देण्यास त्यांना वारंवार संधी दिल्या जातात; आणि यामुळे आपल्याला बजावण्यात आले नव्हते अशी कारणमिमांसा ते करूच शकणार नाहीत.—यहे. ५:१३.
४ याव्यतिरिक्त, काही लोकांचे हृदयपालट केव्हा होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यांच्या वैयक्तिक परिस्थितींमधील परिवर्तनामुळे, कुटुंबातील एखाद्या शोकांतिकेमुळे अथवा त्यांच्या भविष्याचा त्यांना विचार करण्यास लावणाऱ्या जगिक परिस्थितींमुळे हा पालट घडून आला असावा. दुसऱ्या बाजूला पाहता, आपण त्यांच्या दारी जाऊन जे काही सांगतो त्यातील कशानेतरी एक अनुकूल प्रतिसाद देण्यास चेतना मिळू शकते. (उप. ९:११; १ करिंथ. ७:३१) शिवाय, लोक स्थलांतरही करत असतात. सुवार्तेला योग्य प्रतिसाद दाखवणारे नवनवीन रहिवासी—कदाचित, नुकतेच प्रौढतेत पदार्पण केलेले, जे सध्या स्वावलंबी जीवन जगत आहेत आणि जीवनातील आपल्या उद्देशाचा गांभिर्याने विचार करत आहेत, असे लोक आपल्याला आपल्या क्षेत्रात भेटण्याची शक्यता आहे.
५ भारतातील क्षेत्र काही वेळा अमर्याद वाटत असले तरी, येथे देखील असे प्रत्ययास आले आहे, की पुनर्भेटी करण्यावर योग्य लक्ष देऊन दर वर्षी, एका संकेंद्रित पद्धतीने क्षेत्र उरकल्यामुळे उत्तम परिणाम दिसून आले आहेत; तथापि, प्रचारक आपल्या निवासस्थानांपासून दूर असलेल्या क्षेत्रांत जात असल्यामुळे सहजपणे पुन्हा भेटी घेणे त्यांना जमत नाही. आपण आयुष्यभरात केवळ एकदाच लोकांच्या भेटी घेतो तेव्हा त्यांच्या मनांवर जी छाप पडते त्यापेक्षा वेगळी आणि चांगली छाप तेव्हा पडते जेव्हा आपण वर्षातून निदान एकदा नियमितपणे त्यांच्या भेटी घेतो. कालांतराने, प्रचारकांच्या संख्येत वाढ झाल्यावर मंडळ्या संस्थेकडून अतिरिक्त क्षेत्राची मागणी करू शकतात पण तेही, वर्षभरात उरकता येईल इतकेच क्षेत्र असावे.
६ आपण वारंवार भेटी घेत राहू का? होय! वारंवार लोकांना भेटण्यासंबंधी शास्त्रवचने आपल्याला पुष्कळसे प्रोत्साहन देतात. शेवटी, जेव्हा प्रचाराच्या कार्याला पूर्णविराम मिळेल तेव्हा सेवेतील आपल्या अखंड प्रयत्नांकरता यहोवा आपल्याला तसेच राज्याच्या सुवार्तेप्रती कृतज्ञपूर्वक प्रतिसाद देणाऱ्यांना आशीर्वादित करील.—१ तीम. ४:१६.