वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९६ पृ. १
  • विश्‍वासाने चाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासाने चाला
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “विश्‍वासात स्थिर राहा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ९/९६ पृ. १

विश्‍वासाने चाला

१ कोट्यवधी लोक भौतिक मालमत्तेला आपल्या जीवनाचा केंद्रभाग बनवून द्रव्याच्या फसव्या शक्‍तीवर मूर्खपणाने भरवसा ठेवतात. (मत्त. १३:२२) त्यांची धनसंपत्ती हरवते अथवा चोरीला जाते अथवा काहीच फायद्याची ठरत नाही तेव्हा त्यांना कष्टमय धडा मिळतो. आपल्याला सुज्ञ मार्ग अनुसरायला अर्थात आध्यात्मिक संपत्तीकरता झटायला आर्जवले आहे. (मत्त. ६:१९, २०) यामध्ये ‘विश्‍वासाने चालणे’ समाविष्ट आहे.—२ करिंथ. ५:७.

२ “विश्‍वास” हा शब्द, आत्मविश्‍वास, भरवसा, निश्‍चित मत असा अर्थ ध्वनित करणाऱ्‍या ग्रीक शब्दातून अनुवादित केला आहे. विश्‍वासाने चालण्याचा अर्थ, आपल्या पावलांचे मार्गदर्शन करण्याच्या देवाच्या क्षमतेवर व आपल्या गरजांकडे लक्ष देण्याच्या त्याच्या इच्छेवर भरवसा ठेवून त्याच्यावरील आत्मविश्‍वासासह कठीण परिस्थितींचा सामना करणे होय. येशूने उत्कृष्ट उदाहरण मांडले; त्याने आपले लक्ष, जे खरोखर महत्त्वाचे होते त्यावर केंद्रित केले. (इब्री. १२:२) त्याचप्रमाणे, आपणही अदृश्‍य, आध्यात्मिक गोष्टींवर आपली अंतःकरणे केंद्रित केली पाहिजेत. (२ करिंथ. ४:१८) आपल्या सद्य जीवनाचा अशाश्‍वतपणा आपण सतत लक्षात ठेवला पाहिजे आणि यहोवावर पूर्ण अवलंबून असल्याचे कबूल केले पाहिजे.

३ यहोवा त्याच्या दृश्‍य संघटनेच्या माध्यमाने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ मार्गदर्शनाखाली आपल्याला मार्गदर्शित करत आहे असे देखील आपले निश्‍चित मत असावयास हवे. (मत्त. २४:४५-४७) मंडळीत ‘पुढाकार घेणाऱ्‍यांच्या आज्ञेत’ राहून आपण आपला विश्‍वास प्रदर्शित करतो. (इब्री. १३:१७) ईश्‍वरशासित व्यवस्थेला सहयोग देऊन नम्रपणाने कार्य केल्याने यहोवावरील आपला भरवसा प्रकट होतो. (१ पेत्र ५:६) संघटनेला सोपवून दिलेल्या कामास संपूर्ण अंतःकरणाने पाठिंबा देण्याकरता आपण प्रवृत्त झाले पाहिजे. हे आपल्याला प्रीती आणि एकतेच्या अतूट बंधनात आपल्या बांधवांच्या आणखी जवळ आणील.—१ करिंथ. १:१०.

४ विश्‍वास दृढ कसा करावा: आपल्या विश्‍वासास आपण अप्रगतीशील होऊ देऊ नये. तो वाढवण्यास आपल्याला परिश्रमपूर्वक लढा देण्याची गरज आहे. अभ्यास, प्रार्थना आणि सभांच्या उपस्थितीतील नियमितपणा आपल्याला आपला विश्‍वास बळकट करण्यास मदत करील जेणेकरून यहोवाच्या साह्‍याने त्यास कोणत्याही परीक्षेला तोंड देता येईल. (इफिस. ६:१६) तुम्ही दैनिक बायबल वाचन आणि सभांची तयारी यांकरता चांगला नित्यक्रम निश्‍चित केला आहे का? तुम्ही जे काही शिकता त्यावर बहुतेकवेळा मनन आणि यहोवाला प्रार्थना करता का? सर्व सभांना उपस्थित राहण्याची आणि संधी मिळते त्यानुसार त्यांमध्ये सहभाग घेण्याची तुमची रीत आहे का?—इब्री. १०:२३-२५.

५ खंबीर विश्‍वास चांगल्या कामांद्वारे सिद्ध केला जातो. (याको. २:२६) आपला विश्‍वास प्रदर्शित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, इतरांना आपली आशा जाहीर करणे होय. सुवार्ता सांगण्याकरता तुम्ही संधी शोधता का? सेवाकार्यात अधिक करणे तुम्हाला शक्य होण्याकरता तुमच्या परिस्थितींमध्ये काही फेरबदल केला जाऊ शकतो का? आपल्या सेवाकार्याचा दर्जा आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी ज्या सूचना आपल्याला प्राप्त होतात त्यांचा तुम्ही अवलंब करता का? तुम्ही वैयक्‍तिक आध्यात्मिक ध्येये राखता आणि ती साध्य करण्याकरता यत्न करता का?

६ येशूने, दररोजच्या जीवनातील कारभारांमध्ये अतिरिक्‍तपणे गुंग होण्याविषयी आणि भौतिक अथवा स्वार्थी गोष्टींना आपला आध्यात्मिक दृष्टिकोन मंदावण्यास वाव देण्याविषयी ताकीद दिली. (लूक २१:३४-३६) आपले विश्‍वासरूपी तारू फुटू नये म्हणून आपण सभोवार नजर ठेवून जपून चालले पाहिजे. (इफिस. ५:१५; १ तीम. १:१९) आपणा सर्वांना अशी आशा आहे, की सरतेशेवटी आपण “सुयुद्ध . . . केले आहे, धाव संपविली आहे, विश्‍वास राखिला आहे” असे म्हणू शकू.—२ तीम ४:७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा