घोषणा
◼ साहित्य सादरता
ऑक्टोबर: अवेक! किंवा टेहळणी बुरूज यांची वर्गणी. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी व पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी नाही.
वर्गण्या घेताना, कृपया लक्षात असू द्या की, पंजाबी व उर्दू (जे मासिक आहेत) यांशिवाय टेहळणी बुरूज आता सर्व भारतीय भाषांमध्ये व नेपाळी भाषेत पाक्षिक आहे.
अवेक! मल्याळम व तामीळमध्ये पाक्षिक आहे, परंतु गुजराती, कन्नाड व तेलगू भाषेत मासिक आहे. बंगाली, हिंदी, मराठी किंवा नेपाळी भाषेत अवेक! च्या व्यक्तिगत वर्गण्या उपलब्ध नाहीत पण या चार भाषांमध्ये त्रैमासिक वितरकांच्या प्राती मंडळ्यांना उपलब्ध आहेत.
नोव्हेंबर: शक्य असेल तेथे, द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकासह न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स ७५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. पर्याय म्हणून, मॅनकाईंड्स सर्च फॉर गॉड हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जावे. इतर भाषेतील पर्यायी सादरतांच्या सूचनेसाठी ऑगस्ट १९९५ ची आमची राज्य सेवा पाहा.
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक ४५.०० रुपयांच्या अनुदानात. आळीपाळीने, माय बुक ऑफ बायबल स्टोरीझ किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक त्याच अनुदानात सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल पुस्तक २५.०० रुपयांना).
जानेवारी: आमची राज्य सेवा यात आधी दिलेल्या खास सादरतेची पुस्तके म्हणून १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही एक ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. ही उपलब्ध नाहीत त्या भाषांमध्ये, नोव्हेंबर १९९५ च्या महिन्यासाठी सुचवलेले पर्याय उपयोगात आणले जाऊ शकतात.
◼ आमची राज्य सेवा च्या या अंकासह “१९९६ करता ईश्वारशासित सेवा प्राशालेचा आराखडा” ही पुरवणी आहे व ती १९९६ च्या संपूर्ण वर्षादरम्यान संदर्भाकरता ठेवण्यात यावी.
◼ आम्हाला प्रात्येक महिन्याला मंडळीचा अहवाल (S-1) याची अधिकाधिक कार्डे, भारताचा मासिक क्षेत्र सेवा अहवाल ब्रुकलिनला पाठवण्याची तारीख उलटून गेल्यावर मिळत आहेत. यास्तव, मंडळीच्या प्राचारकांनी त्यांचे क्षेत्र सेवेचे अहवाल प्रात्येक महिन्याच्या शेवटी तत्परतेने द्यावेत अशी आठवण आम्ही करून देत आहोत. तथापि, मंडळीचा अहवाल संकलित करण्याआधी आपल्या क्षेत्र सेवेचे अहवाल देण्याकरता सचिवांनी सर्व प्राचारकांसाठी थांबू नये. त्यांनी लवकरात लवकर S-1 कार्ड आम्हाला पोस्टाने पाठवावे, कोणत्याही प्रासंगी, त्यांनी ते पुढील महिन्याच्या सहा तारखेनंतर पाठवू नये. वैयक्तिकांचे नंतर मिळालेले अहवाल तसेच ठेवून पुढील महिन्याच्या मंडळीच्या अहवालात सामील केले जावेत. मंडळीच्या सचिवांनी, उशीरा आलेले अहवाल व चुकांची दुरुस्ती पुढील महिन्याच्या मंडळीच्या अहवालात सामील करावेत—मंडळीचा अहवाल पाठवल्यावर संस्थेला दुरुस्ती पाठवली जाऊ नये.
◼ उपलब्ध असलेली नवी प्राकाशने:
टेहळणी बुरूज व अवेक! यांचे १९९४ चे बांधणी केलेले खंड —इंग्रजी
शांतीदायक नवीन जगातील जीवन (T-15) —तिबेटन
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्राकाशने:
द टाईम फॉर ट्रु सब्मीशन टू गॉड (मुसलमानांकरता) —इंग्रजी
मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का? —तामीळ
सुरक्षित भवितव्य—ते तुम्हास कसे लाभेल —गुजराती, तामीळ, मराठी, मल्याळम