उभारणीकारक असा
१ आपण ‘कठीण दिवसात’ राहत असल्यामुळे आपणा सर्वांना उत्तेजनाची गरज आहे. (२ तीम. ३:१) पौल, त्याच्या काळातही या गरजेची जाणीव राखून ‘परस्परांना उत्तेजन प्राप्त होण्याच्या’ संधींना समजून त्याच्या बांधवांसोबत संपर्क ठेवण्यास उत्सुक होता. त्याने त्याच्या बांधवांना, “ज्या गोष्टींकडून . . . एकमेकांची अभिवृद्धि होईल त्यांच्यामागे . . . लागावे” असे आर्जवले. (रोम. १:११, १२; १४:१९) हे प्रायत्न ‘शिष्यांची मने स्थिरावण्यात व त्यांना विश्वासात टिकून राहण्याकरता उत्तेजन देण्यास’ यशस्वी ठरले. (प्रो. कृत्ये १४:२२) आज आपल्याला त्याच प्राकारच्या उत्तेजनाची फार आवश्यकता आहे.
२ आपल्या बोलण्याद्वारे आपण इतरांकरता उत्तेजनात्मक ठरू शकतो. शब्दांचा योग्यरीतीने उपयोग केल्यास, आपले शब्द “रुपेरी करंड्यात सोन्याची फळे” असे असतील. (नीती. २५:११) मंडळ्यांमध्ये सहभाग घेण्याकरवी, आपण ‘एकमेकांस बोध’ करतो. (इत्त्वी. १०:२५) आपण अनुभव सांगतो, प्राशंसा करतो किंवा आध्यात्मिक बाबींची चर्चा करतो तेव्हा आपल्या जीभेचा सकारात्मक पद्धतीने वापर करू शकतो. जीभेचा असा हितकर उपयोग ‘उन्नातीकरता चागंला व ऐकणाऱ्यांना कृपादान देणारा’ असतो.—इफिस. ४:२९.
३ उभारणीकारक असणाऱ्या गोष्टींची चर्चा करा: फिलिप्पैकर ४:८ मध्ये, पौलाने आपण जे काही बोलतो त्याविषयी साहाय्यक मार्गदर्शन पुरवले. ज्या गोष्टी सत्य, आदरणीय, न्याय्य, शुद्ध, प्राशंसनीय, श्रवणीय, सद्गुणी व स्तुतीयोग्य आहेत त्यांचा विचार आपण करावा असे त्याने सांगितले. आपण जे काही बोलतो ते देवाच्या वचनावर आधारित असल्यास, ते सत्य व फायदेकारक आहे याची आपल्याला खात्री असेल. (योहान १७:१७) आपले ख्रिस्ती समर्पण, आपण मंडळीच्या सभांमध्ये शिकतो त्या गोष्टी, आपण ज्या प्राकारे आपली सेवा पूर्ण करतो आणि अशाच इतर गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. देवाच्या वचनाच्या दर्जांविषयी आणि तत्त्वांविषयीची उभारणीकारक संभाषणे आपल्याला नक्कीच ‘तारणासाठी ज्ञानी करतील.’ (२ तीम. ३:१५) यहोवाच्या शुद्ध संघटनेमध्ये शुद्ध वर्तणूक अनुसरणाऱ्यांची आपण प्राशंसा व्यक्त करू शकतो. आपल्या बांधवांच्या दयाळुपणाच्या प्रोमळ कृत्यांची आपण स्तुती करू शकतो. (योहान १३:३४, ३५) आपण आपल्या बांधवांमध्ये निरीक्षितो त्या श्रवणीय गोष्टींमध्ये, विश्वास, आनंद, शांती व सहनशीलता अशा हितकारक ख्रिस्ती गुणांचा समावेश होतो. अशा सद्गुणी व स्तुतीयोग्य गोष्टींचे संभाषण इतरांच्या ‘उन्नातीकरता बरे’ आहे.—रोम. १५:२.
४ जगातील निरुत्साहित करणाऱ्या चिंता, प्रात्येक दिवशी आपल्या समोर आहेत. त्या गोष्टींना बाजूला सारून आपल्या बांधवांसोबत प्रोमळ सहवास राखणे किती उत्साहवर्धक आहे! आपण एकत्र घालविणारा वेळ जतन करून ठेवण्यासारखा एक ठेवा आहे. आपण नेहमीच उत्तेनदायक व उभारणीकारक असल्यास, इतरजण आपणाविषयी खरेपणाने म्हणतील: ‘त्यांनी माझ्या आत्म्यास हुरूप आणला आहे.’—१ करिंथ. १६:१८.