यहोवाच्या स्मरणिका आपल्याला आध्यात्मिकरीत्या कार्यप्रावृत्त करत आहेत का?
१ स्तोत्रकर्त्याने यहोवाची स्तुती करताना म्हटले: “तुझ्या स्मरणिकांवर माझे चित्त लागलेले आहे.” (स्तोत्र ११९:९९, NW) यहोवा त्याचे नियम, हुकूम, विधी, आज्ञा, व कायदे यांमध्ये जे सांगितले आहे त्याची आठवण आपल्याला करून देतो असा अर्थ ‘स्मरणिका’ यासाठी वापरलेल्या इत्त्वी शब्दातून ध्वनित होतो. आपण प्रातिसाद दिल्यास, ते आपल्याला आध्यात्मिकरीत्या कार्यप्रावृत्त व आनंदी करतील.—स्तोत्र ११९:२.
२ यहोवाचे लोक या नात्याने, आपल्याला नियमितपणे सल्ला व सूचना मिळतात. यापैकी पुष्कळ आपण आधी ऐकल्या आहेत. आपण या उत्तेजनाबद्दल गुणग्राहकता बाळगत असलो तरी त्या गोष्टींविषयी विसरून जाण्याची आपली प्रावृत्ती असते. (याको. १:२५) यहोवा सहनशीलतेने प्रोमळ स्मरणिका देतो. ‘प्राभूने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवावी म्हणून आपले निर्मळ मन जागृत ठेवण्यासाठी’ प्रोषित पेत्राने यातील काही स्मरणिकांची नोंद केली.—२ पेत्र ३:१, २.
३ वारंवार आपल्याला व्यक्तिगत अभ्यास व सभांची उपस्थिती यांच्या महत्त्वाची आठवण करून दिली जाते. या कार्यहालचाली आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी अत्यावश्यक असल्यामुळे अशाप्राकारे स्मरण दिले जाते.—१ तीम. ४:१५; इत्त्वी. १०:२४, २५.
४ प्राचार करण्याची ख्रिस्ती कामगिरी पूर्ण करणे हे काहींसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी परिश्रम, निश्चयीपणा व दीर्घ प्रायत्नाची गरज आहे. या गोष्टी आपल्याकडून पुष्कळ अपेक्षा करत असल्या, तरी “शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी” चढवून आपल्याला ‘खंबीर राहण्यास’ मदत मिळते.—इफिस. ६:१४, १५.
५ यहोवाच्या अपेक्षांबद्दल केवळ मानसिकरीत्या जाणीव राखण्यापेक्षा अधिक गोष्टींनी आपल्या सेवेस प्रावृत्त केले पाहिजे. ‘तारण मिळण्यासाठी मुखाने कबूल करण्यास’ अंतःकरण आपल्याला आवश्यक असणारी चालना पुरवते अशी आठवण आपल्याला प्रोषित पौल करून देतो. (रोम. १०:१०) आपला भक्कम विश्वास असला व आपले अंतःकरण यहोवाच्या स्मरणिकांकडे लक्ष देण्यास इच्छित असेल, तर त्याच्या नावाला स्तुती देण्याचे स्वतःला व्यक्त करण्यास आपल्याला भाग पाडले जाईल.—स्तोत्र ११९:३६; मत्त. १२:३४.
६ आपण चांगली कृत्ये करण्यासाठी कष्ट घेतले, तर त्यामुळे आपल्याला आनंद प्राप्त होईल याची आपण योग्यपणे अपेक्षा करू शकतो. (उप. २:१०) आनंद हे यहोवाच्या आत्म्याचे फळ आहे असे पौल सांगतो व आपण त्यास विपुलतेने प्रादर्शित करण्याचा प्रायत्न केला पाहिजे. (गलती. ५:२२) ‘होता होईल तितक्या प्रायत्नाला’ फलदायी सेवेचे प्रातिफळ देण्यात येईल असे पेत्राने पुढे म्हटले व त्यामुळे आनंद निर्माण होतो.—२ पेत्र १:५-८.
७ आपल्यासमोर आव्हान असल्यास, “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही,” असे घोषित करून प्रोषितांनी जो खंबीर पवित्रा घेतला त्याची आपण आठवण केली पाहिजे. (प्रोषितांची कृत्ये ४:२०) “असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेहि तारण साधिशील,” याचे स्मरण केल्यावर आपल्याला पुढे चालत राहण्यास बळकटी मिळते.—१ तीम. ४:१६.
८ स्मरणिका सतत मिळत असल्यामुळे आपल्याला चिड किंवा संताप येत नाही. त्याउलट, आपण त्यांच्या उत्कृष्ट मूल्याची खोल गुणग्राहकता बाळगतो. (स्तोत्र ११९:१२९) या निर्णायक समयी, आपल्याला आध्यात्मिकरीत्या कार्यप्रावृत्त करण्यासाठी व उत्तम कृत्ये करण्यात आवेशी असण्यास प्रावृत्त करण्यासाठी यहोवा आपल्याला स्मरणिका देत राहतो याबद्दल आपण आभारी आहोत!—२ पेत्र १:१२, १३.