सुव्यवस्थित नित्यक्रमात प्रगतीशीलपणे चालत राहा
१ प्रेषित पौलाला फिलिप्पै मंडळीविषयी विशेष प्रेम होते. तो तिची स्थापना करण्यामध्ये साधनीभूत होता. त्यांनी दयाळुपणे दिलेल्या भौतिक तरतूदींसाठी तो कृतज्ञ होता. ते एक चांगले उदाहरण असल्याचे त्याने त्यांच्याबद्दल सांगितले.—२ करिंथ. ८:१-६.
२ पौलाने खोल प्रीतीने प्रवृत्त होऊन फिलिप्पैकरांना पत्र लिहिले. इन्साईट पुस्तक, खंड २, पृष्ठ ६३१ असा अहवाल देते: “संपूर्ण पत्रात तो फिलिप्पै मंडळीला त्यांच्या चांगल्या मार्गात—अधिक समज प्राप्त करत राहण्यासाठी आणि जीवनाच्या वचनावर मजबूत पकड मिळवण्यासाठी, भक्कम विश्वास व मिळणाऱ्या बक्षीसावरील आशा—यामध्ये चालत राहण्यासाठी प्रोत्साहन देतो.” त्यांनी प्रेमळ प्रतिसाद दाखवला व त्यांच्या व पौलामधील प्रीतीचे बंधन अधिक मजबूत केले. पौलाच्या शब्दांचा आज आम्हासाठी विशेष अर्थ आहे. ते आम्हाला त्याच्या सूचनेवर, विशेषकरून फिलिप्पैकर ३:१५-१७ मध्ये जे दिले त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यास चांगले कारण देतात.
३ प्रौढ मनोवृत्ती आवश्यक आहे: पौलाने फिलिप्पैकर ३:१५ येथे अनुभवी व्यक्तीप्रमाणे लिहिले. त्याने त्यांच्या आध्यात्मिक वाढीची कबूली दिली. त्यांना प्रौढ ख्रिश्चन समजून योग्य मनोवृत्तीने त्याने मनःपूर्वक विनंती केली. येशूने प्रदर्शित केलेली नम्रता व गुणग्राहकता जोपर्यंत त्यांच्या मनोवृत्तीत प्रतिबिंबित होत राहील तोपर्यंत ते ‘निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले . . . , जीवनाच्या वचनावर मजबूत पकड मिळवून’ राहणार होते. (फिलिप्पै. २:१५, NW) आम्ही ते शब्द वाचतो तेव्हा पौल जणू आम्हासोबत बोलत आहे असे आम्हाला वाटले पाहिजे. अशाप्रकारे, आमच्या विशेषाधिकारांबद्दल नम्र गुणग्राहकता प्रदर्शित करून येशूसारखी मनोवृत्ती असण्यास आपली मनःपूर्वक इच्छा राहते. आपण सतत यहोवाला प्रार्थनेद्वारे, या तसेच इतर बाबींमध्ये विनंती करून मदतीची विचारणा करतो.—फिलिप्पै. ४:६, ७.
४ फिलिप्पैकर ३:१६ दाखवते त्याप्रमाणे, आम्ही सर्वांनी मजल मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. “मजल मारणे” या शब्दाचा अर्थ, “पुढे सरकणे, प्रगती करणे,” असा होतो. प्रगतीशील व्यक्ती, “नवीन कल्पना, संशोधन किंवा संधींबद्दल आस्थेवाईक” असतात. ख्रिस्तीत्व कधीच स्थिर नसते व त्याचा दावा करणाऱ्यांनी पुढे वाढत राहिले पाहिजे हे फिलिप्पैकरांनी समजून घ्यावे अशी पौलाची इच्छा होती. स्वतःचे परीक्षण करण्याची इच्छा, त्यांच्या कमतरता मान्य करणे व अधिक करण्यासाठी संधी पाहणे किंवा ते आता करत असलेल्या गोष्टीचा दर्जा वाढवणे या गोष्टींद्वारे त्यांचा प्रगतीशीलतेचा आत्मा प्रदर्शित होईल. आज यहोवाची पार्थिव संघटना प्रगतीशीलपणे पुढे वाटचाल करत चालली आहे. ती तिच्या कार्याचे क्षेत्र व देव वचनाबद्दलची समज अधिक विस्तारित करीत आहे. आम्हापैकी प्रत्येकाने तिच्या बरोबरीने वाटचाल केली पाहिजे. तिच्या सर्व तरतूदींचा फायदा घेऊन तिच्या कार्यात संपूर्ण सहभाग घेतला पाहिजे.
५ प्रगतीसाठी सुव्यवस्थित नित्यक्रमाची आवश्यकता आहे: पौलाने त्याच्या बांधवांना, आर्जवून असे म्हटले, ‘त्याच नित्यक्रमात सुव्यवस्थितपणे पुढे चालत राहा.’ (फिलिप्पै. ३:१६, NW) सुव्यवस्थित असण्यासाठी, आम्हाला व्यक्ती किंवा गोष्टींकडे एकमेकांच्या संबंधात योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची तसेच चांगले वर्तन राखण्याची आवश्यकता आहे. फिलिप्पैमधील ख्रिश्चनांनी यहोवाच्या संघटनेच्या तसेच एकमेकांच्या जवळ राहून स्वतःला योग्य स्थानी ठेवले. त्यांचे जीवन प्रीतीच्या नियमाने नियंत्रित होत असे. (योहान १५:१७; फिलिप्पै. २:१, २) पौलाने त्यांना, “सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा,” असे आर्जवले. (फिलिप्पै. १:२७) ख्रिश्चनांकरता आज देखील, सुव्यवस्था व उत्तम वागणूकीची आवश्यकता तितकीच महत्त्वाची आहे.
६ नित्यक्रम म्हणजे, सरावाने, प्रस्थापित कार्यपद्धतीला तडीस नेणे. यास्तव, एका विशिष्ट पद्धतीने गोष्टी करण्याशी ते अगदी जवळून संबंधित आहे. नित्यक्रमामुळे आपलाच फायदा होऊ शकतो. आमच्या पुढच्या पावलाविषयी निर्णय घेत असताना, थांबून विचार करण्याची गरज नसते—आम्ही आधीच सवयीमुळे निश्चित झालेली पद्धत आचरतो.
७ एका ईश्वरशासित सुव्यवस्थित नित्यक्रमात उभारणीकारक, उपयोगी, ईश्वरी सवया असतात. स्वतःला आध्यात्मिकरित्या वाढवणे, इतरांना मदत करणे आणि शक्य असल्यास यहोवाच्या सेवेत अधिक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ही ध्येये साध्य करण्यासाठी, व्यक्तिगत अभ्यास, सभांना नियमित उपस्थिती व प्रचार कार्यातील सहभाग अशा गोष्टींचा समावेश असणारा नित्यक्रम स्थापण्याची व टिकवून ठेवण्याची गरज आहे.
८ सुव्यवस्थित नित्यक्रमामध्ये सामावलेल्या आवश्यक गोष्टी: ‘ज्ञान व सर्व प्रकारची समज’ ही एक आवश्यक गोष्ट आहे. (फिलिप्पै. १:९, NW) व्यक्तिगत अभ्यास आमचा विश्वास अधिक वाढवतो, सत्याबद्दल आपली गुणग्राहकता मजबूत करतो आणि सत्कर्मे करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. तथापि, काहींना त्यांच्या अभ्यासाच्या सवयांमध्ये नियमित राहणे कठीण असल्याचे आढळले आहे. त्याच्यासाठी वेळेचा अभाव हे मुख्य कारण सांगितले जाते.
९ दररोज पवित्र शास्त्राच्या वाचनाच्या फायद्यांवर अधिक जोर दिला जाऊ शकत नाही. त्याची सूचना सर्वप्रकारे “उपयोगी” आहे. (२ तीम. ३:१६, १७) आमच्या दररोजच्या नित्यक्रमात आम्ही पवित्र शास्त्रीय अभ्यासासाठी वेळ कसा काढू शकतो? काहींना असे आढळले आहे की ते, पहाटे काही मिनिटे लवकर उठून तसे करू शकतात. त्यावेळी त्यांचे मन दक्ष असते. इतरांना रात्री झोपण्याआधी काही मिनिटे वाचणे उत्तम आहे असे आढळले आहे. दिवसा घरी असणाऱ्या पत्नी, इतरजण कामावरून किंवा शाळेवरून घरी येण्याआधी दुपारच्या वेळी थोडासा वेळ बाजूला राखू शकतात. पवित्र शास्त्राच्या वाचनाशिवाय काहींनी त्यांच्या साप्ताहिक अभ्यासाच्या नित्यक्रमात प्रोक्लेमर्स पुस्तकाचे वाचनही समाविष्ट केले आहे.
१० आपण नवीन सवया निर्माण करतो तेव्हा त्यांचा आपणातील आधीच्या सवयांसोबत संघर्ष होण्याची खरी शक्यता असते. गतकाळात, उपलब्ध वेळ घालवण्यासाठी अनावश्यक कार्यांना वाव देण्याची आपली प्रवृत्ती राहिली असेल. त्या सवयीला तोडणे सोपे नाही. आपल्या अभ्यासाच्या सवया कशा असाव्यात याबद्दल आपल्याला कोणी काही सांगणार नाही; तसेच आम्ही या बाबतीत काय करतो त्याचा जाबही आम्हाला द्यावयाचा नाही. आपल्या अभ्यासाच्या सवयांचा नियमितपणा मुख्यत्वे ‘अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दलची’ गुणग्राहकता आणि त्यातून लाभ मिळवण्यासाठी “वेळेचा सदुपयोग” करण्याची आपली तयारी यावर अवलंबून आहे.—फिलिप्पै. १:१०, NW; इफिस. ५:१६.
११ ख्रिस्ती सभा आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्या आवश्यक सूचना व प्रोत्साहन पुरवतात. ह्यास्तव, सभांना उपस्थित राहणे हा आमच्या सुव्यवस्थित नित्यक्रमाचा आणखी एक आवश्यक भाग आहे. पौलाने त्याच्या महत्त्वावर जोर दिला. सभांना उपस्थित राहणे हा, प्राधान्याने ठरवण्यात येणारा विकल्प नाही.—इब्री. १०:२४, २५.
१२ आम्ही कार्याचा साप्ताहिक आराखडा योजतो तेव्हा सुव्यवस्थितपणा कसा प्रदर्शित केला जाऊ शकतो? काहीजण वैयक्तिक गोष्टींची काळजी घेण्यासाठी विशिष्ट काळ ठरवतात व वेळ उरलाच, तर त्यात सभांना बसवण्याचा प्रयत्न करतात, परंतु हे त्याउलट असले पाहिजे. आपल्या साप्ताहिक सभांना प्राधान्य दिले गेले पाहिजे व दुसरी कार्ये इतर वेळी योजली गेली पाहिजेत.
१३ नियमित सभांच्या उपस्थितीसाठी, चांगली योजना व कौटुंबिक सहयोगाची गरज असते. सप्ताहाच्या दरम्यान आमच्या कार्याचा आराखडा व्यग्र असतो व त्यामुळे बहुधा वेळ उरतच नाही. याचा अर्थ, शक्य असल्यास, कुटुंबाला खायला, तयार व्हायला आणि सभा सुरु होण्याआधी तेथे पोहंचायला पुरेसा वेळ असेल अशाप्रकारे संध्याकाळचे जेवण जरा लवकरच योजले जावे. त्याबाबतीत, कौटुंबिक सदस्य विविध मार्गांनी सहयोग देऊ शकतात.
१४ आम्हाला सुव्यवस्थित नित्यक्रमात प्रगतीशीलपणे चालत राहायचे असल्यास, नियमित क्षेत्र सेवा अत्यावश्यक आहे. राज्य संदेशाचा प्रचार करण्याच्या भारी जबाबदारीबद्दल आम्ही सर्वजण स्पष्टपणे जाणून आहोत. तेच आम्हाला यहोवाचे साक्षीदार बनवते. (यश. ४३:१०) आज केले जाणारे ते सर्वात निकडीचे व उपयोगी कार्य आहे. यास्तव, तो आपल्या दैनिक नित्यक्रमाचा कमी महत्त्वाचा भाग आहे असा आपण योग्य दृष्टिकोन राखूच शकत नाही. पौलाने सूचना दिल्याप्रमाणे: “त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”—इब्री. १३:१५.
१५ आपण प्रत्येक आठवड्यासाठी आपल्या कार्याची योजना करतो तेव्हा, क्षेत्र सेवेसाठी विशिष्ट वेळ राखून ठेवला पाहिजे. कदाचित, मंडळीने आठवड्यात पुष्कळ वेळा सेवेसाठी सभा आयोजित केल्या असतील. आपण कोणत्या सभेला पाठिंबा देऊ शकतो केवळ याचाच निर्णय करण्याची बाब आहे. नियतकालिकांद्वारे व इतर साहित्याद्वारे घरोघरचे कार्य, पुनर्भेटी घेणे व पवित्र शास्त्राभ्यास चालविणे अशाप्रकारच्या सेवेच्या प्रत्येक पैलूत सहभाग घेणे उत्तम ठरेल. आपण कदाचित, साहित्य सोबत घेऊन अनौपचारिक साक्षकार्य करण्यास आणि संभाषण सुरु करण्यासाठी संधींबद्दल दक्ष असण्यास पूर्वयोजना करू. आपण बहुधा इतरांसोबत जात असल्यामुळे, आपण त्यांच्या योजनेबद्दल विचारले पाहिजे की जेणेकरून एकमेकांना सोयीस्कर असतील अशा योजना करता येतील.
१६ क्षेत्रात भावनाशून्यता दिसत असली तरी, आपल्या प्रचाराचा नित्यक्रम टिकवून ठेवला पाहिजे. आम्हाला आधीच माहीत आहे की, थोडकेच अनुकूलरितीने प्रतिसाद देतील. (मत्त. १३:१५; २४:९) यहेज्केलला ‘फितुरी, उद्धट व कठीण हृदयाच्या’ लोकांना प्रचार करण्याची कामगिरी देण्यात आली होती. यहोवाने ‘त्यांच्या कपाळासारखे [त्याचे] कपाळ कठीण’ करण्याचे म्हणजेच, “गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण” करून यहेज्केलला मदत करण्याचे अभिवचन दिले होते. (यहे. २:३, ४; ३:७-९) यास्तव, सेवेच्या एका नियमित क्रमासाठी सतत प्रयत्न चालू ठेवण्याची गरज आहे.
१७ अनुसरण्यासाठी चांगली उदाहरणे: क्षेत्र सेवेत पुढाकार घेण्यासाठी कोणी असल्यास, आम्हापैकी पुष्कळ जण चांगले कार्य करतात. पौल व त्याच्या साथीदारांनी चांगले उदाहरण मांडले. त्याने इतरांना त्याचे अनुसरण करण्यास आर्जवले. (फिलिप्पै. ३:१७) त्याला आध्यात्मिकरित्या मजबूत ठेवण्यासाठी ज्या आवश्यक घटकांची गरज होती ते सर्व त्याच्या नित्यक्रमात समाविष्ट होते.
१८ आज देखील, आम्ही उत्तम उदाहरणांनी आशीर्वादित आहोत. इब्रीयांस १३:७ येथे पौलाने आर्जवले: “जे तुमचे अधिकारी होते . . . त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.” अर्थात, ख्रिस्त आमचे उदाहरण आहे, परंतु आपण पुढाकार घेणाऱ्यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकतो. पौलाप्रमाणे, वडिलांनी देखील इतरांसाठी चांगले उदाहरण असण्याच्या गरजेविषयी जागृत असले पाहिजे. सर्वांच्या व्यक्तिगत परिस्थिती वेगवेगळ्या असल्या तरी, प्रत्येक जण राज्य आस्था प्रथम ठेवण्यात सुव्यवस्थित नित्यक्रम आचरीत आहे हे दाखवले पाहिजे. भौतिक तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्या तरी, व्यक्तिगत अभ्यास, सभांची उपस्थिती व क्षेत्र सेवेत पुढाकार घेण्यात वडिलांच्या चांगल्या सवया असावयास हव्यात. वडीलांनी ते, ‘त्यांची घरची व्यवस्था चांगली ठेवणारे’ असल्याचा पुरावा दिला तर, मंडळीतील सर्वांना सुव्यवस्थित नित्यक्रमात कार्य करीत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.—१ तीम. ३:४, ५.
१९ नवीन सेवा वर्षासाठी ध्येये: नवीन सेवा वर्षाची सुरवात ही आपल्या व्यक्तिगत नित्यक्रमावर विचार करण्यासाठी एक उचित वेळ आहे. मागील वर्षाच्या कार्याची उजळणी काय दाखवून देते? आपण आपल्या कार्याचे प्रमाण टिकवून ठेवू शकलो किंवा सुधारू शकलो का? आपण आपल्या व्यक्तिगत अभ्यासात कदाचित अधिक तरबेज झालो असू. आपण अधिक नियमितपणे सभांना उपस्थित राहिलो असू. किंवा साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवून आपली क्षेत्र सेवा अधिक वाढवली असेल. कदाचित, मंडळीतील किंवा कुटुंबातील इतरांसाठी केलेल्या ख्रिस्ती दयाळुपणाच्या कृतींबद्दल आपण सांगू शकतो. असे असल्यास, देवाला संतुष्ट करण्याजोग्या मार्गाने चाललो ह्याबद्दल आपण आनंद करू शकतो. ‘उत्तरोत्तर वृद्धि करत राहण्यासाठी’ आपल्याकडे चांगले कारण आहे.—१ थेस्सलनी. ४:१.
२० पण, आपला नित्यक्रम अस्थिर किंवा अनियमित होता तेव्हा काय. आपण आध्यात्मिकरित्या कसे परिणामित झालो होतो? काही कारणामुळे आपल्या प्रगतीत अडथळे आले का? यहोवाच्या मदतीसाठी विनंती करून सुधारणूकीची सुरवात होते. (फिलिप्पै. ४:६, १३) कुटुंबासोबत तुमच्या गरजांची चर्चा करा. तुमच्या नित्यक्रमातील काही पैलूत बदल करण्यास त्यांच्या मदतीची विनंती करा. तुम्हाला काही समस्या असतील, तर मदतीसाठी वडिलांकडे विनंती करा. आपण मनःपूर्वक प्रयत्न केला व यहोवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद दिला, तर आपण “निष्क्रिय व निष्फळ” होण्याचे टाळू शकतो याची खात्री आम्हाला असेल.—२ पेत्र १:५-८.
२१ सुव्यवस्थित नित्यक्रमात चालल्याने आशीर्वाद प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे प्रयत्न योग्यतेचे ठरतात. सुव्यवस्थित नित्यक्रमात प्रगतीशीलपणे चालत राहण्यास तुम्ही निश्चित असता त्यावेळी, ‘आस्थेविषयी मंद असू नका; आत्म्यात उत्सुक असा; प्रभूची [यहोवा, NW] सेवा करा.’ (रोम. १२:११)—या विषयावर अधिक माहिती असलेल्या विचारविनिमयासाठी मे १, १९८५ चे द वॉचटावर पृष्ठे १३-१७ पाहा.