ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत जून २७ ते ऑक्टोबर १७, १९९४ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ पवित्र शास्त्र वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. द वॉचटावरच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. स्तोत्रसंहिता पुस्तकामध्ये ७१ वेळेस आढळणारा “सेला” हा शब्द वाचताना उच्चार करण्याची जरुरी नाही. [si पृ. १०१ परि. ५]
२. एखाद्या ख्रिश्चनाने दिलेले वचन हे स्तोत्र १५:४ नुसार अशास्त्रीय आहे हे कळल्यावर सुध्दा त्याने ते पूर्ण करावे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR९१, ८/१ पृ. ३०-१]
३. ईयोबाचे पुस्तक हे दाखवते की, मानवास होणाऱ्या पीडा, आजार व मृत्यू ह्यासाठी देव कारणीभूत नाही. [si पृ. १०० परि. ४२]
४. येशूच्या जीवनक्रमाने हे सिद्ध केले की, आदामाची इच्छा असती तर त्याने परिपूर्ण निष्ठा टिकवली असती व त्याद्वारे देवाच्या कामात खोट नव्हती हे सिद्ध झाले असते. [uw पृ. ५२ परि. ११]
५. लूक १९:२०-२४ मध्ये त्या दासाचे वर्णन केले आहे, ज्याला एक मोहर मिळाली व त्याने ती रुमालात बांधून ठेवली, तो कामाकडे दुर्लक्ष करण्याबद्दल दोषी होता. [gt अध्याय १००]
६. परिश्रमाचे काम व संपूर्ण भक्ती याद्वारे एक प्रामाणिक ख्रिस्ती सार्वकालिक जीवनाचा हक्क प्राप्त करु शकतो. [uw पृ. ३६ परि. १३]
७. पहिले करिंथकर २:९ मध्ये भवितव्यातील पृथ्वीवरच्या नंदनवनाचा उल्लेख आहे. [uw पृ. २६ परि. १२ (३); पहा wMR८५ ९/१ पृ. २८.]
८. केवळ जगात सर्वसाधारण आहे म्हणून विश्वासघातकी वर्तन आपल्याला क्षुल्लक समजता येणार नाही. [uw पृ. ५३ परि. १३]
९. स्तोत्र ४९:१५ पुनरुत्थानाच्या आशेवरील विश्वासाची अभिव्यक्ती आहे. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w८९ ३/१ पृ. २२ परि. १३.]
१०. कधीकधी यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून जगीक वागणुकीत गुरफटण्याचा मोह पाडला जातो. [uw पृ. ४३ परि. ११]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. स्तोत्र काय आहे? [si पृ. १०१ परि. २]
१२. स्तोत्र २७:१० आम्हास कोणती विस्मयकारक खात्री देते? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w९२ ३/१५ पृ. २२ परि. १७.]
१३. स्तोत्र १०:१३ अपश्चातापी अपराध्याठायी कोणता चुकीचा दृष्टिकोन असल्याचे दर्शविते? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w९१ ११/१ पृ. ६.]
१४. निर्गम ९:१५, १६ नुसार, यहोवाने फारोशी ज्या मार्गाने व्यवहार राखला त्याद्वारे काय साध्य करण्यात आले? [uw पृ. ५७ परि. ६, ७]
१५. पवित्र शास्त्राचे वाचन करत असताना आपल्याला हितकारक विश्लेषण करता येतील असे दोन दृष्टिकोन स्पष्ट करा. [uw पृ. २७]
१६. स्तोत्र २:१२ मध्ये जाहीर केल्यानुसार “पुत्राचे चुंबन घ्या” या आज्ञेचा काय अर्थ होतो? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा w८६, ९/१ पृ. २८.]
१७. योहान ८:३२ मध्ये येशू कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता? [uw पृ. ४० परि. ६]
१८. उत्पत्ती ३:१५ मधील “स्त्री” कोणाला चित्रित करते? [uw पृ. ३० परि. ३]
१९. दाविदाला त्याची पापकृत्ये सहमानवांविरुध्द आहेत हे माहीत असतानाही तो यहोवाला स्तोत्र ५१:४ मध्ये “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्ध मी पाप केले आहे” असे का म्हणू शकत होता? [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा sbr पृ.१३.]
२०. पहिल्या शतकामध्ये नाश करणारा “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” कोण होता व आजच्या काळामध्ये कोण आहे? (मत्तय २४:१५) [gt अध्याय १११]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. ईयोब ४०:१५ मधील, “बेहेमोथ” मिळणाऱ्या पुराव्याच्या आधारावर _________________________ याला सूचित करतो, व ईयोब ४१:१, “लिव्याथान” योग्यरितीने _________________________ याला सूचित करते. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा it-१ पृ. २८० व it-२ पृ. २४०.]
२२. यहोवाचा वास्तविक आवाज येशूच्या ------------------------- वेळी, ------------------------- होत असताना व सा. यु. ३३ च्या निसान १०, या दिवशी यरुशलेमेतील ------------------------- त्याच्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करत असताना ऐकण्यात आला. [gt अध्याय १०४]
२३. परुशी आपल्या द्राक्षरसातून ------------------------- काढून टाकतात कारण ते विधीवत अशुध्द आहे, तरी देखील ते न्याय, दया, व विश्वासूपणा यांची उपेक्षा करीत, जे विधीवत अशुध्द असलेले ------------------------- यासारखे आहे. [gt अध्याय १०९]
२४. आपल्या पहिल्या माता-पित्यांना पापाच्या मार्गाला लावण्यासाठी सैतानाने लबाडी केली म्हणून येशूने त्याला ------------------------- असे संबोधिले. [uw पृ. ५३ परि. १३ (१)]
२५. येशू हा देवाचा ------------------------- पुत्र आहे कारण, त्याला एकट्यालाच स्वत: यहोवाने निर्माण केले आहे. [uw पृ. २९ परि. १]
पुढील विधानांतून प्रत्येकी अचूक उत्तरे निवडा:
२६. ईयोब ४२:५ मध्ये नमूदित केल्याप्रमाणे ईयोबाने देवाला पाहिले, त्यामध्ये त्याला (वादळामध्ये देवाचा दृष्टांत घडला; एक देवदूत त्याच्या समोर पाहिला; यहोवाची अधिक जवळून ओळख करुन घेतली) [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR८९ ११/१ पृ. १२.]
२७. मत्तय २६:१३ मध्ये येशूने उल्लेखित केलेली स्त्री (लाजरची बहीण मरीया; क्लोपसची पत्नी मरीया; मरीया मग्दालीया) ही होती. [gt अध्याय १०१]
२८. स्तोत्र ११:३ मध्ये नमूदित असलेले ढासळणारे आधार स्तंभ हे (यरुशलेमेतील मंदिराचा आधारस्तंभ; येशू ख्रिस्त जो कोनशिला; ज्या आधारावर समाज उभा आहे तो न्याय, कायदा, व सुव्यवस्था) याला उल्लेखित आहेत. [साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन; पहा wMR८६, ९/१ पृ. २८.]
२९. येशूने (पेत्र आणि आंद्रिया; फिलिप्प आणि बर्थलमय; याकोब आणि योहान) या प्रेषितांना “गर्जनेचे पुत्र” त्यांच्या तापट स्वभावामुळे म्हटले. [gt अध्याय ९८]
३०. सैतानाने, अधिपत्य करण्याचा देवाचा हक्क तसेच अधिपत्य गाजविण्याची त्याची पध्दत याविषयी आव्हान प्रस्तुत करताना जो मोठा वादविषय उपस्थित केला त्यामध्ये (मानवी हक्क; सर्वात शक्तिशाली कोण याबद्दल प्रश्न; देवाचे विश्वव्यापी सार्वभौमत्व) गोवलेले होते. [uw पृ. ४६ परि. १]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
उत्पत्ती ३:१-५; स्तोत्र. २४:१; प्रे. कृत्ये ८:३२-३८; इब्री. १०:२६, २७; १ पेत्र. ४:३, ४
३१. मानव व पृथ्वी ही देवाची निर्मिती आहे व सर्व काही यहोवाच्या मालकीचे आहे हे ओळखण्याने आम्हास नम्र व आज्ञाधारक बनण्यास मदत केली पाहिजे. [uw पृ. ३९ परि. ४]
३२. देव ज्यामुळे नाखुश होईल हे आपल्याला ठाऊक आहे अशा कोणत्याही गोष्टींची सवय लावून घेण्यापासून आपण दक्ष असावे. [uw पृ. ३३ परि. ८ (३) व ८ (४)]
३३. पवित्र शास्त्राचे अचूक ज्ञान व त्याच्या संदेशाची गुणग्राहकता याद्वारे मेंढरासमान लोकांना बाप्तिस्मा घेण्याकडे निरविते. [uw पृ. ३२ परि. ७]
३४. अविश्वासू लोकांसोबत तुम्ही काम करत असला किंवा त्यांच्या बरोबर शाळेत जात असला तरी, तुम्ही त्यांचा अनावश्यक सहवास टाळण्याद्वारे सोबती म्हणून त्यांची निवड करत नसल्याचे दाखविता. [uw पृ. ४४ परि. १३]
३५. जीवनातील स्वत:चे दर्जे ठरविता आले नाहीत तर वंचित केले जाते असा विश्वास बाळगण्यास लोकांना प्रभावित करणारी जगीक विचारसरणी आम्ही टाळली पाहिजे. [uw पृ. ४६ परि. १]