सुटीचे साक्षकार्य
जगिक सुट्या असतात तेव्हा वडिलांनी सुटीच्या साक्षकार्यासाठी खास व्यवस्था केली पाहिजे कारण पुष्कळांना ऐहिक कामाची आणि शाळेची सुटी असते. आपण पारंपारिक सुट्यांच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करीत नसल्यामुळे, अशा शुभेच्छांबद्दल आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो त्याबाबत चतुर असण्याची गरज आहे. एखाद्या शुभेच्छेचा मोठा विषय बनवण्याची गरज नाही आणि पुष्कळ प्रसंगी आपण घरमालकाचे—किंवा शेजाऱ्याचे वा नातेवाईकाचे—त्याच्या सदिच्छांसाठी आभार मानू शकतो व नंतर आपली सादरता देऊ शकतो. एखाद्या घरमालकाने आपण नाताळाची शुभेच्छा न दिल्याबद्दल काही म्हटले तर आपण त्याला सांगू शकतो की, देवाचा सन्मान करणाऱ्यांकडून अपेक्षिले जाते त्याप्रमाणे आपण येशू ख्रिस्ताचा सन्मान करतो, परंतु पुष्कळ मानव-निर्मित रीतीरिवाज ख्रिस्ताचा किंवा देवाचा सन्मान करत नसल्यामुळे, आपण त्यांच्यात भाग घेत नाही.