तुमच्या सेवकपणात अष्टपैलू व्हा
१ अष्टपैलू असणे ही जीवनाची चुणूक आहे असे म्हटले जाते. एकाच विषयासाठी वेगळ्यारितीने केलेला प्रस्ताव विषयास अधिक चित्तवेधक बनवतो. हे आमच्या सेवकपणाच्या बाबतीतही काही कमी नाही. जर आम्ही काळजीपूर्वक नसलो तर आमची घरोघरची सादरता नकळतपणे कायम एकसारखीच असेल. तीच तीच प्रस्तावना वारंवार दिल्याने आम्हाला, त्याचप्रमाणे घरमालकाला कंटाळवाणे वाटेल. यास्तव, तुमच्या सेवकपणात अष्टपैलू व्हा. परंतु हे तुम्ही कसे साध्य करु शकता?
२ ‘नमस्ते, आम्ही आमच्या शेजाऱ्यांना राज्याची सुवार्ता सांगत आहोत’ असे काही म्हणण्याऐवजी, तुमच्या सुरूवातीच्या शब्दातच बदल करण्याचा विचार का करु नये? प्रस्तावनेच्या विपुलतेची माहिती आमच्या रिझनिंग पुस्तकात दिली आहे. पृष्ठे ९-१५वर १८ विविध विषयावर प्रस्तावना दिलेल्या आहेत. आणि अनेक विषयासाठी दोन, तीन किंवा अधिक प्रस्तावना आहेत.
३ जर तुम्ही “आपल्या समस्या—त्या सोडविण्यास आपल्याला कोण मदत करील?” या माहितीपत्रकाचा वापर करीत आहात तर पृष्ठ १३ वरील “लाईफ/हॅपिनेस” या भागातील प्रस्तावना सहाय्यक ठरू शकते:
▪ “जीवनाच्या दर्जाविषयी ज्यांना आज खरोखर काळजी वाटत आहे अशा लोकांशी आम्ही बोलत आहोत. अनेक लोक विचार करतात की अस्सल आनंद आणि समस्याविरहीत जीवन शक्य आहे का? हे माहितीपत्रक प्रोत्साहनदायक आणि विचार करण्याला प्रवृत्त करणारी माहिती सादर करते.” माहितीपत्रक उघडून पृष्ठ १८वरील “नवे जग—किती वेगळे?” यातील एक किंवा दोन भागाची चर्चा करा.
४ काही राज्य प्रचारकांना—खासपणे तरूण तसेच नवोदितांना सोबतच प्रौढांना देखील—हस्तपत्रिकांचा वापर करुन आस्था निर्माण करणारा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो हे समजले आहे.
तरूण प्रचारक “शांतिदायक नवीन जगातील जीवन” या हस्तपत्रिकेचा वापर करून म्हणू शकतो:
▪ “या पृथ्वीवर देव शांती आणि आनंद कसा आणणार आहे याविषयी माझ्याकडे एक संक्षिप्त संदेश आहे. “शांतिदायक नवीन जगातील जीवन” या शिर्षकाची हस्तपत्रिका मी तुम्हाला देऊ इच्छितो. तरूण व्यक्तीबरोबर कार्य करीत असलेला प्रौढ प्रचारक घरमालकाच्या प्रतिक्रियेवरून, पुढील चर्चा तसेच विवेचन करावयाचे की नाही हे ठरवील.
५ घरमालकाने आस्था दाखविल्यास, प्रौढ प्रचारक म्हणू शकतो:
▪ “संपूर्ण पृथ्वीभर शांती स्थापन केली जाईल याविषयी पवित्र शास्त्र भवितव्यासाठी अद्भुत आशा देते. सृष्टी व त्यात जे काही आहे त्याचा कर्ता देव असल्याकारणाने, आम्ही आज ज्या समस्यांचा सामना करीत आहोत त्या काढण्यासाठी त्याला मानवजातीची काळजी वाटत नसेल याच्याशी तुम्ही सहमत नाही का? पवित्र शास्त्र भवितव्याविषयी जे अभिवचन देते त्याविषयी तुमचा काय विचार आहे हे मला ऐकावयाचे आहे.” नंतर स्तोत्रसंहिता ३७:९-११, २९ वाचा.
६ तुम्ही अनंतकाळ जगू शकाल पुस्तकाची सादरता करीत आहात तर पृष्ठे १५६ ते १६२ पर्यंत भवितव्याविषयी सांगितलेल्या सकारात्मक गोष्टींना ठळक का मांडू नये. चित्राच्यापुढे दिलेल्या पवित्र शास्त्रीय उताऱ्याकडे लक्ष वेधवा. देव खरोखर या अभिवचनाची पूर्णता करणार हे विश्वास ठेवण्याजोगे आहे का याविषयी घरमालकाला विचारा. मानवजातीला आशीर्वाद देण्याची देवाची पात्रता यावर भरवसा दृढ करण्यासाठी पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या ज्यांची आधीच पूर्णता झाली आहे त्यांची संक्षिप्त चर्चा करा.
७ शक्य असेल तिथे सत्याच्या बीजांचे रोपन करण्यासाठी आणि दाखविलेली आस्था वाढविण्यासाठी सर्व राज्य उद्घोषकांनी, वाढत असलेल्या ईश्वरशासित आस्थेची सहभागिता करावी. आम्ही आमचा भाग पूर्ण केल्यावर, पुढील कोणत्याही वाढीसाठी आम्ही हे यहोवाच्या हातात आनंदाने टाकू शकतो. आमच्या शेजाऱ्यांबरोबर सहभागिता करण्यासाठी आमच्याकडे सर्वोत्तम वार्ता आहे. नेहमी तयार असल्याने, आम्ही राज्याचा संदेश घोषित करण्यासाठी आणि कोणते साहित्य भेट करावे याची निवड करण्याचा समजूतदारपणा दाखवून नेहमी अष्टपैलू असू.