वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९३ पृ. ४
  • तुमच्या सेवेत जिवेभावे असा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या सेवेत जिवेभावे असा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियरांना आधार देणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
  • क्षेत्र सेवेत नियमित असा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km ८/९३ पृ. ४

तुमच्या सेवेत जिवेभावे असा

१ येशूचे शिष्य या नात्याने देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य बनवण्यासाठी आम्हाला नेमण्यात आले आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) या पृथ्वीवर, त्याच्या निकडी किंवा महत्त्वाबरोबर इतर कोणत्याही कामाची तुलना केली जाऊ शकणार नाही. कोट्यावधी लोकांचे प्राण त्यात गोवलेले आहेत. त्यासाठी आपल्या सर्वात जास्त परिश्रमाची जरूरी आहे. पौलाची सूचना चांगल्यारीतीने लागू होते: “जे काही तुम्ही करिता ते . . . प्रभूसाठी [यहोवा न्यू.व.] म्हणून जिवेभावे करा.” (कलस्सै. ३:२३) “जिवेभावे” याची व्याख्या “अति उत्साह किंवा ध्येयनिष्ठ भक्‍ती” अशी केली जाते. तुमच्या सेवेत तुम्ही जिवेभावे आहात का?

२ जिवेभावे असण्यासाठी आम्हाकडून कोणती अपेक्षा केली जाते? यहोवाने स्वीकारयोग्य सेवेला दशमांश किंवा दशांश असे म्हटले. (मला. ३:१०) एक विशिष्ट संख्या देण्याऐवजी, यहोवाबद्दल असलेल्या प्रेमाला व्यक्‍त करण्यासाठी आणि त्याला केलेल्या समर्पणाच्या प्रीत्यर्थ आपण त्याच्या सेवेत जो वेळ आणि परिश्रम अर्पण करतो त्याचे हा दशमांश प्रतिनिधित्व करतो. (w९२ १२/१ पृ. १५) आपल्या कृत्यांनी आपण यहोवासाठी असलेल्या भक्‍ती आणि प्रेमाची तीव्रता प्रवर्तीत केली पाहिजे. जो व्यक्‍ती तनमनाचा असतो त्याला, यहोवाची सेवा त्याचे स्वास्थ्य आणि परिस्थिती अनुमती देईल तितके करण्यासाठी प्रवृत्त झाल्यासारखे वाटले पाहिजे.

३ पौल आशेच्या आधारावर “श्रम व खटपट” करणाऱ्‍या ख्रिश्‍चनांबद्दल खूप चांगले बोलला. (१ तीम. ४:१०) त्यांना ‘समृद्धि देतो’ त्या यहोवाच्या आशीर्वादाचे बक्षिस मिळाले. (नीती. १०:२२) त्या उलट, जे हात राखून किंवा कुरकुरत त्यांचा वेळ आणि शक्‍ती देतात ते देण्यामध्ये जो आनंद असतो त्याचा अनुभव घेत नाहीत. (प्रे. कृत्ये २०:३५) आपले सर्वात चांगले देण्यामध्ये दुर्लक्ष केल्याने आपण खरे म्हणजे यहोवाला द्यावयाच्या दशमांशात त्याला लुबाडतो.—मला. ३:८.

४ आपले सर्वोत्तम ते देणे: आम्ही क्षेत्र सेवेत भाग घेतल्यानंतर त्याचा अहवाल देतो, तेव्हा तो अहवाल खरोखरचा असतो का? आवर मिनिस्ट्री पुस्तकात, पान १०४ वर असे म्हटले आहे: “प्रत्येक साक्ष देण्याच्या काळात तुमच्या क्षेत्र सेवेचा वेळ, तुम्ही साक्ष कार्य सुरू करता तेव्हापासून ते तुमच्या शेवटच्या भेटीपर्यंत असतो. क्षेत्र सेवेमध्ये अल्पोपहारासाठी किंवा जेवणासाठी घेतलेल्या वेळेचा समावेश करावयाचा नाही.” क्षेत्र सेवेत असताना अधिक साध्य करण्यासाठी, चांगली योजना आणि परिश्रमाची आवश्‍यकता आहे.

५ आपले सर्वोत्तम देणे म्हणजेच सेवेत भाग घेत असताना होईल तितके करणे होय. पूर्ण जिवाने काम करणारी व्यक्‍ती घरोघरच्या कार्यात भाग घेण्याऐवजी अनौपचारिक साक्षकार्यात मधून मधून केलेल्या प्रयत्नांपर्यंतच तिचा प्रचार मर्यादित ठेवणार नाही. पूर्ण जिवाने काम करणारा, तरुण, बाप्तिस्मा प्राप्त नसलेला प्रचारक, घरोघरी जाण्यात किंवा सादरता प्रस्तुत करण्यात कमी आस्था दाखवून त्याच्या पालकांच्या आर्जवण्यावरच प्रचारासाठी जाणार नाही.

६ पौल आम्हाला आळशी न होण्यासाठी आमचा मेहनतीपणा टिकवून ठेवण्याकरता आर्जवतो. (इब्री. ६:११, १२) आमच्या वैयक्‍तिक सेवेचा पुनर्विचार करण्यास आणि आम्ही त्यात तनमनाचे होतो म्हणून लज्जित होण्यासाठी कारण नसल्यामुळे किती मोठा आनंद आहे! (२ तीम. २:१५) मोठ्या संकटात वाचलेल्यांमध्ये, आम्ही व्यक्‍तिगतपणे मदत दिलेल्या व्यक्‍तींना पाहून, आम्हाला सर्वात मोठ्या आनंदाची जाणीव होईल. निश्‍चितच, यहोवाची सेवा जिवेभावे करणाऱ्‍यांना तो खूप बक्षिस देतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा