फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी ३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २०१ (१०२)
५ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा.
२० मि: “जगव्याप्त निर्भयता जवळ आली आहे हे सर्वांना कळू द्या.” सुरवातीच्या त्रोटक प्रास्ताविकतेनंतर प्रत्येक संक्रमणाचा विचार करा आणि उत्तम तयारी केलेल्या प्रचारकाद्वारे त्याचा वापर वेळ मुभा देईल तसा दाखवून द्या. ४ थ्या परिच्छेदावर कोणा युवकाने प्रात्यक्षिक करावे हे चांगले आहे. पाचव्या परिच्छेदातील संक्रमण घरमालकाच्या मनात एखादे मनोवेधक शास्त्रवचन सोडतो. पान ४ वर सुचविलेल्या प्रस्तावनातील एकीचा तसेच येथील संक्रमणाचा वापर करण्याचे बांधवांना उबदारपणे उत्तेजन द्या.
२० मि: “हाव टू हेल्प डिप्रेस्ड वन्स रिगेन जॉय.” मार्च १५, १९९० च्या वॉचटावरमधील पृष्ठे २६-३०वर आधारीत भाषण. (प्रादेशिक: “तुम्हास आनंदी बनविणारे काम.” टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९९०.)
गीत ३० (११७) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२६ (२५)
५ मिः स्थानिक घोषणा.
१० मिः “क्षेत्रकार्याची तयारी करण्यासाठी व्यावहारिक पवित्रा.” लेखाची सभागृहाबरोबर चर्चा करा आणि मग, पूर्वीच नेमणूक दिलेल्या तीन किंवा चार प्रचारकांना हा पवित्रा कशाप्रकारे फायदेकारक ठरला यावर विवेचन माडण्यासाठी बोलवा. उदाहरणार्थ, ते विविध सादरतेबद्दल, स्थानिक क्षेत्राला अनुलक्षून ते विशिष्ट साहित्य कसे लागू करावे, लवचिकपणा, किंवा हा पवित्र प्रचारकांना त्यांना सादर करण्यास समाधानकारक वाटणारे साहित्य निवडण्यास कशी मदत देतो यावर ते विवेचन देऊ शकतात. क्षेत्रकार्याच्या सभेला येताना प्रचारकांनी आपणासोबत आमची राज्य सेवा याची आपली प्रत आणावी म्हणून उत्तेजन द्या.
२० मिः “घरमालकाला ऐकणारे करणाऱ्या प्रस्तावना.” तुमचे क्षेत्र कशाप्रकारातील आहे याबद्दल त्रोटक चर्चा करा. घरमालकाला कोणते विषय महत्त्वाचे वाटतात? स्थानिकरित्या ज्या प्रस्तावना लागू होतात व जी सादरता यश मिळवून देऊ शकते त्यावर लक्ष केंद्रित करा. उत्तम तयारी केलेल्या प्रचारकाने ही सादरता सादर करून पीस ॲण्ड सेक्युरिटी (जुनी आवृत्ती) हे खास सादरतेचे किंवा इतर पुस्तक सादर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. लेखात दाखविल्याप्रमाणे प्रचारकाने प्रस्तुती करावी. मग, शाळेला जाणारा एक युवक हीच प्रस्तुती दाखवतो व मासिके सादर करतो. या पद्धतीचा सर्वांनी क्षेत्र कार्यात प्रयत्न करावा म्हणून उत्तेजन द्यावे.
१० मिः स्थानिक गरजा किंवा “ॲटीट्युड ऑफ ट्रु ख्रिश्चन्स टुवर्ड द वर्ल्ड ॲण्ड पीपल हू आर पार्ट ऑफ इट.” रिझनिंग पुस्तकातील पृष्ठ ४३७-८ वर आधारीत वडीलाद्वारेचे भाषण.
गीत १३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७६ (१)
१० मिः स्थानिक घोषणा, ईश्वरशासित वृत्त, जमाखर्च अहवाल व अनुदानाची पोच.
१५ मिः पायनियर सेवा मजसाठी आहे का? या देशात सर्व प्रचाराकांच्या ५ टक्के नियमित पायनियर आहेत. तुलना करण्यासाठी स्थानिक आकडा द्या. मग, आम्हापैकी अधिकांना व खासपणे ज्यांचे लवकरच माध्यमिक शिक्षण संपणार आहे अशा युवकांना पूर्ण वेळेच्या सेवेसाठी जागा ठेवता येईल का? तीन नियमित पायनियर, खासपणे युवक, गृहिणी व सेवानिवृत्त व्यक्ती अशांची मुलाखत घ्या. (जर नियमित पायनियर नसतील तर साहाय्यक पायनियर किंवा पायनियरींग केलेल्या प्रचारकांस वापरता येईल.) आर्थिक बाबींचा विचार करा. तुमच्या वसाहतीत कोणत्या प्रकारचे अर्धवेळ काम उपलब्ध आहे? प्रत्येक जण आपली उपजिविका कशी साधतो? खर्च करण्याच्या सवयात त्यांनी कोणते बदल केले? आवश्यक तासांची पूर्णता करण्यासाठी जो आराखडा आखलेला आहे त्याचा विचार करा. कोणाच्या आरोग्यविषयक समस्या आहेत का? ते कसा सामना करतात? आणखी इतर कोणत्या आव्हानांना त्यांनी यशस्वीपणे तोंड दिले आहे? मुलाखती सरळ मनोदयाच्या व उत्तेजनदायक असाव्यात. सभागृहातील लोकांनी आपल्या व्यक्तीगत परिस्थितीचे परिक्षण करून अधिकांना ही पूर्ण वेळेची सेवा करता येईल का हे पाहण्याचे उबदार उत्तेजन द्यावे.
२० मिः एकटे पालक आपल्या मुलांना कशी मदत देऊ शकतात. एक त्रोटक प्रस्तावना व मग, एक आई आपल्या मुलांसोबत क्षेत्रसेवेसाठी तयारी करीत असल्याचे दृश्य. पूर्वी नव्हती इतकी आज एक-पालकीय कुटुंबे संस्थेत आहेत. तीमथ्याची आई व आजी यांनी त्याच्यामध्ये सत्य ज्या प्रकाराने बिंबवले ते आज पालकांनी अनुसरण्याजोगे उत्तम उदाहरण आहे. (२ तीम. १:५; ३:१४, १५) प्रात्यक्षिक: आई, नवयौवनातील एक मुलगी व एक लहान मुलगी आपले जेवण संपवून स्वयंपाक घरातील मेजावर बसल्या आहेत. आई म्हणते की भांडी घासण्याआधी, ती घरमालकीण बनेल व दोघी मुली आपल्या सादरता कशा करतील हे त्या आईला दाखवतील. लहान मुलगी आमची राज्य सेवा यातून ४ पानावरील एक प्रस्तावना घेते व ती आईला सादर करून दाखवते. आई तिला चांगल्या तयारीबद्दल उबदार प्रशंसा करते व म्हणते की, तिने संस्थेने सुचविलेली शास्त्रवचने वाचावीत. लहान मुलगी लगेच यशया ९:६, ७ काढून ते वाचते. मग, आई वडील मुलीला पुस्तक कसे सादर करणार ते विचारते. वडील मुलगी आमची राज्य सेवा यातील पृष्ठ १ वर दिलेले संक्रमण निवडते व ते आईला सादर करते. आई तिलाही शाबासकी देते व म्हणते की, दोघींनी प्रस्तावना व संक्रमणाची तयारी करावी की, त्यांना क्षेत्रकार्यात पुस्तक सादर करता येऊ शकेल. मुलींना सांगितले जाते की त्या थोडा वेळ यावर तयारी करू शकतात व मग, भांडी घासू शकतात. वडील मंडळीतील सर्व कुटुंबांना आपल्या मुलांना प्रेमळ साहाय्य देण्याचे उत्तेजन देऊन हा भाग संपवितो.
गीत १८३ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९२ (१०)
१५ मिः वडील स्थानिक घोषणा हाताळून स्थानिक गरजा हाताळतात. वेळ मिळेल तसा अद्ययावत मासिकातील विविध बोलके मुद्दे सांगा. जो आमची राज्य सेवा याच्या या अंकात सुचविलेल्या प्रस्तावना व संक्रमणासोबत चांगला जुळू शकेल अशा एकाची निवड करा. मग एका चांगल्या तयारी केलेल्या प्रचारकाद्वारे प्रस्तावना, संक्रमण मिळून संपूर्ण सादरता सादर करून मासिके सादर करू द्या. हे दाखवा की, लोकांना संभाषणामध्ये समाविष्ट करुन आणि सुचविलेल्या सादरतांचा वापर करून त्यांना आमच्या संदेशाबाबतीत आस्थेवाईक बनवणे हे तितके अवघड नाही.
१८ मिः “पुनर्भेटींची जबाबदारी स्वीकारा.” प्रश्नोत्तरे. पुनर्भेटीच्या कामात सहभागी होण्याचे सर्वांना उबदार उत्तेजन द्या. पुढल्या सेवा सभेमध्ये परत भेटीच्या वेळी काय बोलावे याची चर्चा होणार आहे तेव्हा या सभेला सर्वांनी उपस्थित राहावे असे सांगावे.
१२ मिः रिझगिंन पुस्तकातील पृष्ठ २५-६ वरील “गर्भपात” या विषयावर चर्चा. विषयाची त्रोटक प्रस्तावना केल्यावर, म्हणजे तो आज बातम्यांमध्ये कसा आहे, तसेच लाखो लोकांना चिंतेचा कसा बनला आहे हे सांगितल्यावर, एक बहीण पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत आहे अशा दृश्याची प्रस्तुती करा. शास्त्राभ्यास घेणारी स्त्री आपल्या बहिणीला गर्भवती झाल्यामुळे बऱ्याच चिंतेमध्ये असल्याचे सांगते. ती म्हणते की, कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी नाही त्यामुळे तिला खूप चिंता वाटत आहे. तिचे नातलग सांगतात की, तिने लगेच गर्भपात करावा. बहीण म्हणते की, ते दोघे मिळून रिझनिंग पुस्तकात याबद्दल काय म्हटले आहे ते बघतील. शास्त्रवचनांचे संशोधन करुन यहोवाला अद्याप न जन्मलेल्या बाळाबद्दल कसे वाटते ते आणि त्याला गर्भपात करणे योग्य वाटते का हे बघतील. पहिल्यांदा त्या गर्भपाताची व्याख्या बघतात. मग, ते प्रश्न, शास्त्रवचने व पृष्ठ २५-६ वर दिलेली माहिती विचारात घेतात. या बहिणीने त्या स्त्रीला विवाद करण्यास व जीवनाच्या पावित्र्याबद्दल आपली रसिकता वाढविण्याची मदत केली पाहिजे.
गीत १६४ (७३) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च २ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ९२ (५१)
१० मिः स्थानिक घोषणा. प्रचारकांनी एप्रिल व मे दरम्यान साहाय्यक पायानियरींग करावी यासाठी आत्ताच योजना आखण्याचे उत्तेजन द्या. एप्रिल व मे दरम्यान सुटी असणाऱ्या कुटुंबांना तसेच तरुणांना, क्षेत्रकार्यात अधिक सहभाग घेता येण्यासाठी काय व्यवस्था करता येईल ते बघण्यास सांगा.
२० मिः “तुम्ही परत भेट घ्याल तेव्हा काय बोलणार?” सभागृहासोबत चर्चा व परिच्छेदांची चर्चा करताना त्यातील सादरता दाखविण्यासाठी प्रचारकांना आधीच तयारी करून यायला सांगावे. ही लहान प्रात्यक्षिके आधी तालीम केलेली असावीत.
१५ मिः “लेंडिंग मनी टू फेलो ख्रिश्चन्स.” वॉचटावरच्या ऑक्टोबर १५, १९९१ अंकातील पृष्ठे २५-८ वर वडीलाद्वारे भाषण. (प्रादेशिक: लॉटरी तिकिटावरील वाचकांचे प्रश्न. टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९९०.)
गीत १४७ (३८) व समाप्तीची प्रार्थना.