वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९२ पृ. ३
  • राज्याच्या वाढीत सहभागी होणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्याच्या वाढीत सहभागी होणे
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृह बांधकाम —पवित्र सेवेचा महत्त्वपूर्ण पैलू
    आमची राज्य सेवा—२००६
  • तुम्ही आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करायला तयार आहात का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्रिस्ती बंधूसमाजाची सेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
आमची राज्य सेवा—१९९२
km १/९२ पृ. ३

राज्याच्या वाढीत सहभागी होणे

१ “केवढे अद्‌भूत बदल!” “हे किती जलद घडले!” “सोवियत युनियनमधील आमच्या बांधवांसाठी केवढा आशीर्वाद मिळाला!”

२ अशा प्रकारचे उद्‌गार गेल्या ऑगस्टच्या उत्तरार्धात व सप्टेंबरच्या सुरवातीला, जेव्हा सोवियत युनियनमध्ये संभाव्य अडथळा समोर असताना देखील अधिवेशनांची मालिका यशस्वीपणे पार पडली, तेव्हा ऐकायला मिळाले. त्या उन्हाळ्यातील सोवियत अधिवेशनांना एकदंर ७४,२५२ ची उपस्थिती होती आणि ७,८२० जणांचा बाप्तिस्मा झाला. यासोबत, पूर्व युरोपातील अधिवेशनांना २,९५,९२४ जणांची उपस्थिती होती.

३ खरेच, पहिल्या शतकाप्रमाणे यशया संदेष्ट्याचे शब्द पूर्ण होत आहेत: “अंधकारात चालणाऱ्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; . . . तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहे, हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, ते तुजसमोर आनंद करतात.” होय, राज्याची वाढ आता पुढे जात आहे! येशू ख्रिस्त राज्य करीत आहे! आणि जसे भविष्यवाद पुढे म्हणतोः “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:२, ३, ७.

४ पूर्व युरोपातील भव्य वाढीची काळजी वाहण्यासाठी जर्मनीत अधिक मोठ्या छपाई यंत्रणेसाठी बांधकाम जारी आहे. आमच्या तेथील बांधवांना ह्‍या वाढीत सहभागी होण्याचा आनंद होत आहे, कारण यामुळे येशूच्या त्या ऐतिहासिक भविष्यवादाच्या पूर्णतेला हातभार मिळत आहेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील; तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१४.

५ अमेरिकेत देखील भव्य वाढ होत आहे. सप्टेंबरमध्ये गिलियड प्रशिक्षणार्थीच्या वर्गात हे घोषित करण्यात आले की, एप्रिलपासून सुरु होणाऱ्‍या गिलीयड वर्गाला दुप्पट म्हणजे ५० विद्यार्थी असतील! ही शाळा अर्थातच, वॉचटावर एज्युकेशनल सेंटरमध्ये भरविण्यात येईल. ही जागा पॅटरसन, न्यूयॉर्क येथे आहे व येथे याचे बांधकाम गेल्या तीन वर्षापासून होत आले आहे. त्यामुळे, “पॅटरसन येथे काय घडणार?” अशी जी अनेकांनी विचारणा केली होती ती काही नवलाईची नव्हे.

५ पॅटरसन बांधकाम: आम्हाला हे कळवण्यास आनंद वाटतो की, पॅटरसन येथील काम खूप वेगाने व आराखड्याच्याही पुढे चालले आहे. पॅटरसन इनच्या सात इमारती—एक १५० युनिटचे हॉटेल, जे शैक्षणिक केंद्रापासून पायी जाण्याच्या वाटेवर आहे—पूर्ण होत आले आहे व रस्ता, वाहनतळ, आणि सुशोभित जागा तयार करण्यात आली आहे. शैक्षणिक केंद्र बांधून पूर्ण होईल तेव्हा जवळचे ‘इन’ जगभरातून येणाऱ्‍या व भेट देणाऱ्‍या बांधवांसाठी उतरण्याची जागा म्हणून वापरण्यात येईल. तथापि, सध्या येथे ३०० बेथेल कुटुंबातील सदस्य राहात असून ते इमारत बांधणीच्या कामात गुंतलेले आहेत.

७ या बांधकामावर सध्या ६५० स्वयंसेवक कामगार काम करीत आहेत! यापैकीच्या बऱ्‍याच जणांना राहण्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे व ते दररोज बांधकामाच्या जागी ये-जा करतात. गेल्या वर्षाच्या आरंभाला न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहराने लिहिलेः “पुटनाम विभागाच्या वायव्येकडे रस्ता क्र. २२ वर डोंगरावर शहर वसल्याप्रमाणे बांधकाम जणू मधमाशांच्या घोळक्याच्या रुपात होत असलेले दिसत आहे. सर्वच—अभियांत्रिक, तंत्रज्ञ, नकाशा काढणारे, सुतार, भिंतीवर लेप चढविणारे, विजेचे कामगार, नळकोंडाळी बसविणारे आणि इतर कामगार—चर्च सदस्य आहेत, जे आठवडा ते पूर्ण वर्षापर्यंत स्वेच्छेने काम करण्यात मग्न आहेत. यांना पगार मिळत नाही, पण आकस्मिक खर्चासाठी भत्ता मिळतो.”

८ शैक्षणिक केंद्र १७ इमारतींचे असेल. त्यात स्वयपाकघर, वर्ग, दप्तर, वाहनतळ, १,२०० जण राहू शकतील अशा सहा निवासी इमारती, जेवण घर व सभागृह ज्यात प्रत्येक १,६०० जणांची बसण्याची सोय असेल. या वेळेपर्यंत एकंदर कामापैकी दोन इमारती पूर्ण झाल्या आहेत, चार इमारतींवर काम चालू आहे आणि पाचवर १९९२ मध्ये काम सुरु होईल. शेवटल्या सहा इमारतींचे काम नंतर सुरु होईल. गेल्या उन्हाळ्यात राज्यशासन व स्थानिक अधिकाऱ्‍यांकडून ड्रेनेज यंत्रणेबाबत मान्यता मिळाली तेव्हा बांधकामातील एक टप्पा गाठण्यात आला.

९ बांधणीकामात स्वेच्छेने भाग घेणाऱ्‍या कामकऱ्‍यांना सुंदर आध्यात्मिक लाभ मिळत आहे. खरे म्हणजे, जे स्वयंइच्छेने भाग घेऊ पाहतात अशांनी आध्यात्मिक व्यक्‍ती असलेच पाहिजे. (१ करिंथ. २:१४, १५) दर दिवशीच्या सकाळच्या कामात दैनंदिन पवित्र शास्त्रीय वचनांचा अनुभव मिळतो. आठवड्यातील तीन दिवस, स्वयंइच्छेने काम करणाऱ्‍या कामगारामधून निवडण्यात आलेले चर्चेत सहभागी होतात आणि इतर तीन दिवशी ब्रुकलिन मुख्यालयातील चर्चा पॅटरसन स्वयंसेवकांना ऑडिओ यंत्रणेच्या माध्यमाने ऐकायला मिळते. याखेरीज, कामावर असणाऱ्‍या सर्व स्वयंसेवकांच्या लाभासाठी सोमवारी सायंकाळी वॉचटावरचा अभ्यास चालवला जातो. तथापि, न्यूयॉर्कमध्ये केवळ पॅटरसन येथील बांधकामच प्रगतिपथावर नाही.

१० ब्रुकलिनबद्दल काय? ऑगस्ट ३०, १९९० रोजी बेथेल कुटुंबातील सदस्यांना हे जेव्हा कळले की, संस्थेला ३० मजल्यांची निवासी सोय उभारण्याची परवानगी मिळाली आहे तेव्हा त्यांनी आनंदाने टाळ्यांचा गजर केला. पुढील महिन्यात जेथे नऊ मजली जुनी कारखान्याची इमारत होती ती मोडण्याचे काम सुरु झाले. मग, जानेवारी १९९१ मध्ये नव्या इमारतीचे खोदकाम सुरु होऊन १००×२०० फुटाचा पाया घातला गेला. खोदकामानंतर ३० फुटाची पादचारी मार्ग तयार करण्यात आला. अभियांत्रिकी कौशल्य येथे जरुरीचे होते कारण या इमारतीच्या जागेच्या एका बाजूला बोगदा होता तर दुसऱ्‍या बाजूला वॉचटावर सोसायटीचा दुसरा एक कारखाना होता.

११ सहा महिन्यातच पाया संपविण्यात आला. जमिनीच्या तळघरातील दोन मजल्यात स्वयंपाक घर, अन्‍नाचे गुदाम, इतर सेवेच्या वस्तू आणि हजार माणसे बसू शकतील इतकी मोठी जेवणाची खोली असेल. प्रचंड पोलादाचे पाये तसेच तुळया यांनी जो एकंदर इमारतीचा साचा तयार करण्यात आला आहे त्यांचे वजन ७०,००,००० पौंडापेक्षा अधिक भरेल. जुलैमध्ये या साच्याची बांधणी सुरु झाली. सप्टेंबरपर्यंत विटा लावण्याचे काम सुरु झाले. आता लवकरच ब्रुकलिनच्या निळ्या आकाशात इमारतीचा आकार व रंग खुलू लागेल!

१२ वॉचटावर संस्थेने व्यावसायिक इमारती बांधणीच्या कंपनीद्वारे हाती घेतलेले काम पुढील उन्हाळ्यात संपेल. याचा अर्थ ३७८ फूट उंच इमारतीचा बाहेरील आकार संस्थेला सुपुर्द केला जाईल व मग पुढे साक्षीदार स्वयंसेवक ती पूर्ण करतील. आम्ही आशा करतो की, १९९३ च्या उत्तरार्धापर्यंत पहिले १२ मजले बांधून पूर्ण होतील व त्यात प्रतीक्षालय, जेवणाची खोली, व स्वयंपाक घर तयार होतील. आतापर्यंत ब्रुकलिनमधील सर्व राहत्या जागा भरल्या असल्यामुळे या नव्या घराची जरुरी आहे व त्यामुळे आमची शास्त्रवचनीय नेमणूक पूर्ण करण्यास आम्हाला साहाय्य मिळेल.—मत्तय २४:१४.

१३ तुम्हाला काय करता येईल? आतापर्यंत बंधूजनांनी बरेच काही संपवले आहे. वर्षात सबंध अमेरिकेतून १४,००० पेक्षा अधिक स्वयंसेवक न्यूयॉर्कला आले व त्यांनी इमारत-बांधणीच्या विविध कार्यात भाग घेतला. त्यांनी प्रेमाने घेतलेल्या श्रमाची संस्थेला कदर आहे व यामुळेच ती त्यांचे, व ज्यांनी या श्रमात आपला वाटा दिला त्या त्यांच्या बायकांचे व इतर कौटुंबिक सदस्यांचे आभार मानू इच्छिते. प्रश्‍न हा आहे की, अशा या इमारत बांधणीच्या कामासाठी पुढे येण्याची तुमची तयारी आहे का?—इब्री. १३:१६.

१४ सर्वांना ते जमणार नाही, हे उघड आहे. उदाहरणार्थ, काही स्वयंसेवक इमारत प्रकल्पाच्या कामाला गेले असता कित्येक वडील व उपाध्य सेवक मंडळीच्या गरजेला मदत करु शकतात. (पडताळा नेहम्या ४:१९-२२.) तसेच लागणाऱ्‍या खर्चाला स्वईच्छेने हातभार लावणे हा आणखी एक महत्त्वपूर्ण मार्ग होय. न्यूयॉर्क टाइम्स वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या खर्चाच्या अंदाजाबाबतीत म्हटले आहे की, “नवी [पॅटरसन] इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत तिला १३ दशकोटी डॉलर्सचा खर्च होईल.” स्वच्छेने केलेल्या श्रमदानामुळे एकंदर खर्च अर्ध्यापेक्षाही कमी जाईल हे खरे, पण तो भरपूर असेल. दर महिन्याला लाखो डॉलर्स खर्ची घातले जात आहेत.

१५ मोशेच्या काळी निवासमंडप बांधण्यासाठी याचप्रमाणे शलमोनाच्या मार्गदर्शनाद्वारे उभारल्या जाणाऱ्‍या मंदिरासाठी भौतिक धनाची अत्यंत गरज होती. पण जे जरुरीचे आहे ते देण्यासाठी यहोवाने लोकांच्या अंतःकरणाला प्रेरित केले. (निर्गम ३५:४-६, २१, २२; ३६:३-६; १ इति. २९:३-९) आमच्या काळी वैयक्‍तीक, मंडळ्या तसेच विभाग आपल्यापरिने या इमारत प्रकल्पाला आपले अर्थसहाय्य देत आहे व हे निःसंशये जगभर राज्याच्या घोषणेच्या वाढीला हातभार लावील. या अद्‌भूत वाढीच्या कामास साहाय्य करण्यात आपण सहभाग घेऊ शकाल काय?

१६ आपणास शक्य आहे तर कृपया आपले अनुदान वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया, पोस्ट बॅग १०, लोणावळा, महा. ४१० ४०१ येथे पाठवावे.

१७ तुम्ही इमारत उभारली जात आहे तेथे श्रमिक साहाय्य देण्याच्या पात्रतेत आहा किंवा अर्थसाहाय्य देऊ शकाल वा शकणार नाही; तरीही आपण सर्वजण या इमारत प्रकल्पाची पूर्णता देवाच्या राज्याची आस्था जगभर वाढीस लागावी म्हणून होण्यासाठी प्रार्थना नक्कीच करु शकतो. आपला स्वर्गीय पिता, आपण त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करु तसे तो आपल्याला समृद्धपणे आशीर्वादित करो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा