प्रश्न पेटी
◼ बाप्तिस्मा विधीला उपस्थित राहणारे आपला आनंद कसा व्यक्त करु शकतात?
बाप्तिस्मा आनंदाचा प्रसंग असतो. नवीन लोक यहोवाची बाजू घेत आहेत व जाहीरपणे आपला विश्वास प्रदर्शित करीत आहेत हे बघून आम्हाला आनंद होत असतो. (स्तोत्र. ४०:८) येशूने म्हटले की यामुळे स्वर्गात देखील मोठा आनंद होतो. (लूक १५:१०) बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांचे कौटुंबिक सदस्य आणि ज्यांनी त्यांचा अभ्यास घेतला त्या प्रचारकांना हे नवे लोक आवश्यक ते पाऊ घेत असल्याचे पाहून आनंद वाटतो. पण हा आनंद कसा योग्यपणे व्यक्त केला जाऊ शकतो?
येशूच्या बाप्तिस्म्याने आजच्या बाप्तिस्म्यासाठी नमुना दिला आहे. आपण उचलणारे पाऊल गंभीर व निश्चित स्वरुपाचे आहे हे त्याने जाणले होते. त्याचा बाप्तिस्मा होत असता तो प्रार्थना करीत होता. (लूक ३:२१, २२) बाप्तिस्मा हा मनन व गहन विचार करण्याचा कालावधी असतो हे त्याला ठाऊक होते. त्याच्या शिष्यांनी देखील बाप्तिस्म्याचे महत्त्व ओळखले. इ. स. ३३ मध्ये पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा ओतला गेल्यावर साधारण ३,००० लोकांचा बाप्तिस्मा झाला. ज्यांनी तो प्रसंग बघितला त्या शिष्यांची कशी प्रतिक्रिया होती? ते “प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.” (प्रे. कृत्ये २:४१, ४२) शिष्यांनी आध्यात्मिक गोष्टींची चर्चा केली व एकमेकांच्या आतिथ्याचा आनंद लुटला.
ख्रिस्ती संमेलनात ठळक वैशिष्ट्य बाप्तिस्मा हे असते. यहोवाप्रीत्यर्थ आपली बाजू घेणाऱ्यांसाठी आपला आनंद टाळ्या वाजवून व्यक्त करुन व अशांना शाबासकी देऊन व्यक्त करणे हे निश्चितपणे योग्य आहे. पण तेच, अनियंत्रितपणे ओरडणे, शिट्या मारणे आणि डोक्यावर हात उंचावून ते फडकावणे तसेच मोठ्याने नाव घेऊन ओरडणे या गोष्टी अयोग्य आहेत. अशी ही वागणूक विश्वासाचे वक्तव्य होत असलेल्या या गंभीर व पवित्र प्रसंगाच्या बाबतीत बेपर्वाई दाखविणारी ठरेल. याचप्रकारे, उमेदवार बाप्तिस्मा घेऊन बाहेर पडताक्षणीच त्यांना फुले किंवा बक्षिसे देणे हेही योग्य नाही. बाप्तिस्मा हा तारणासाठी ख्रिस्ती धावेची सुरवात दर्शवितो. यास्तव आम्ही यांच्याबद्दल आनंद करू शकतो व बाप्तिस्म्याने या सदस्यांना यहोवाबरोबर जवळिकीचे नातेसंबंध उभारण्यात जी सुरवात करुन दिली आहे त्याबद्दल त्यांच्यात रसिकता उभारु शकतो.
बाप्तिस्मा होत असलेल्या ठिकाणी विनोद करणे, खेळणे, पोहणे अशासारखी वागणूक प्रसंगाचे गांभिर्य कमी करतील. आमचा आनंद सन्माननीय पद्धतीने व्यक्त केला जाण्यास हवा. आमचा सुव्यवस्थितपणा व गंभीरता ही सर्व उपस्थितांच्या आनंदात भर घालू शकतील.