जानेवारीसाठी सेवा सभा
जानेवारी ६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६८ (८४)
१५ मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. “राज्य सेवा शाळा आध्यात्मिक शिक्षण देते.” क्षेत्र सेवेत वापरता येऊ शकतील असे विशिष्ट मुद्दे अलिकडील मासिकातून दाखवा. शनिवारच्या मासिक कार्यासाठी पाठबळ देण्याचे उत्तेजन द्या.
१८ मि: “लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाद्वारे खऱ्या ज्ञानाची घोषणा करा,” प्रश्नोत्तराने चर्चा. प्रकाशनांसोबत परिचित राहण्याच्या मोलावर भर द्या.
१२ मि: स्थानिक गरजा किंवा “डू यू डिनाय सिनफूल टेंडन्सीज्?” द वॉचटावर ऑगस्ट १५, १९९१ अंकातील पृष्ठ २९-३१ वरील लेखावर आधारीत भाषण. (प्रादेशिक: “बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती या नात्याने ईश्वरी भक्ती आचरा,” टेहळणी बुरुज, जुलै १, १९९०.)
गीत ३१ (३) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १३ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६६ (९०)
५ मिः स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त हाताळा.
२५ मिः “सुवार्ता सादरता—“घरोघरच्या कार्यात विविधता वापरुन.” सभागृहासोबत चर्चा या नात्याने हाताळा. परिच्छेद ४ व ५ चा विचार करताना रिझनिंग पुस्तकातील दोन वेगवेगळ्या प्रस्तावना किंवा जुलै १५, १९८८ च्या वॉचटावरमधील प्रस्ताव वापरुन साध्या व थेट पवित्र्याचा वापर स्पष्ट करा. तुमच्या स्थानिक क्षेत्रास अनुलक्षून असणाऱ्या व्यावहारिक प्रस्तावनांचा वापर करा.
१५ मिः प्रश्न पेटी. वडीलांद्वारे हाताळणी. बाप्तिस्मा विधीच्या वेळी आपल्या वागणुकीकडे व ती यहोवा व राज्य संदेशावर कशी प्रभाव पाडते याकडे लक्ष देण्यावर भर द्या.
गीत १९६ (१६) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २० ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६९ (३२)
१० मिः स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल, मंडळीने पाठविलेल्या आणि संस्थेकडून मिळालेल्या अनुदान पाचेपावतीची माहिती.
२० मिः “यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे” प्रश्नोत्तराद्वारे चर्चा. चार सदस्यांच्या कुटुंबाचे प्रात्यक्षिक. १९९२ च्या कॅलेंडरचा वापर करून पिता कुटुंबासोबत फेब्रुवारी महिन्यात आपल्या वेळेचा कसा आराखडा करावा याची चर्चा करतो. क्षेत्रकार्यासाठी कोणते दिवस बाजूला काढावेत व तो कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासोबत कसे कार्य करणार याचा विचार करतो.
१५ मिः “पायनियरींग—समृद्ध आशीर्वाद देणारी सेवा.” प्रश्नोत्तराने चर्चा. दोन पायनियरांची मुलाखत घ्या. पायनियर सेवेत येण्यासाठी त्यांना कोणत्या अडखळणांवर मात करावी लागली? कशामुळे त्यांना पायनियर होण्याचे उत्तेजन मिळाले? त्यांना पायनियरींगमध्ये यशप्राप्ती मिळविणे कशामुळे शक्य झाले? सर्वांना आपल्या परिस्थितीचा प्रार्थनापूर्वक विचार करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
गीत ४० (३१) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी २७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९७ (२२)
१० मिः स्थानिक घोषणा. अलिकडील मासिकाची सादरता कशी करता येईल त्याचे प्रात्यक्षिक सादर करा.
२० मिः “राज्याच्या वाढीत सहभागी होणे.” पुरवणीतील लेखाची प्रश्नोत्तराने चर्चा. बांधवांना संस्थेच्या प्रकाशनांकडून जो लाभ मिळाला त्याबद्दलचे त्रोटक अभिप्राय त्यांच्याकडून ऐकू द्या, किंवा क्षेत्रकार्यात प्रकाशनांच्या वापराबद्दलचे अनुभव थोडक्यात सांगू द्या.
१५ मिः “रिड टू एक्स्पाण्ड युवर हॉरिझन.” शाळा देखरेख्यांद्वारे हाताळणी. अवेक! मासिकाच्या जुलै २२, १९९१ अंकातील पृष्ठे २५-७ वरील साहित्यावर आधारीत भाषण; चांगले वाचक होण्याच्या गरजेवर भर द्या. नुसते चांगले वाचावयास येणे पुरेसे नाही हे समजण्याची सभागृहाला मदत करा; आम्ही आपली सूक्ष्मदृष्टी वाढविण्याची गरज आहे. (प्रादेशिकः “देवाचे वचन सत्य आहे.” टेहळणी बुरुज, नोव्हेंबर १, १९९०.)
गीत २०१ (१०२) व समाप्तीची प्रार्थना.