वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९१ पृ. ८
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ऐकून घेण्याद्वारे प्रभावीपणाने
  • जुळवून घ्या
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • महान शिक्षकाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • घरोघरी प्रभावीपणे कार्य करणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • घरमालकाला तर्क करण्यास मदत करा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ५/९१ पृ. ८

सुवार्ता सादरता

ऐकून घेण्याद्वारे प्रभावीपणाने

१ आम्हाला आमच्या सेवेत प्रभावी व्हावयाचे आहे तर प्रथमतः आपण हे ओळखले पाहिजे की, दोन व्यक्‍ती सारख्या नसतात. प्रत्येकाला जीवनात विविध अनुभव असतो तसेच प्रत्येकाच्या आवडीनिवडी व इच्छाही भिन्‍न असतात. याचा अर्थ हा की, आपल्याला राज्याचा संदेश त्या व्यक्‍तीला जुळणारा असा केला पाहिजे, म्हणजे आपण ज्याच्याशी बोलत असतो त्या व्यक्‍तीला वैयक्‍तीकपणे त्याचा काय अर्थ होतो हे समजावून दिले पाहिजे. हे परिणामकारक रितीने करण्यासाठी आम्ही चांगले ऐकून घेण्यास हवे.

२ पुष्कळ प्रचारक आपल्या प्रस्तावनेत कुशलपणे प्रश्‍न विचारुन घरमालकाला संभाषणात गोवून घेतात. घरमालकाला पेचात न टाकणारे दृष्टीकोणात्मक प्रश्‍न अधिक प्रभावी ठरतात. पण, घरमालक बोलतात तेव्हा तो जे म्हणतो ते आपण ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. ऐकून घेण्यामुळे शेजाऱ्‍यावरील प्रीती व आदर प्रकट होतो व त्यामुळे बोलणाऱ्‍या व्यक्‍तीच्या विचारातील अंतर्दृष्टी आपल्याला मिळते. त्या व्यक्‍तीची परिस्थिती जाणून घेण्यामुळे आम्हाला त्याच्या जागी स्वतःला ठेवून आत्मविश्‍वासाने बोलता येते. तेव्हा त्याजशी पवित्र शास्त्रातून समाधान व आशा यांची सहभागी करता येते.

जुळवून घ्या

३ प्रेषित पौलाने सूचना केली: “तुम्हाला भेटणाऱ्‍या प्रत्येक माणसाबरोबर कसे बोलायचे ते शिकून घ्या.” (कलस्सै. ४:६, न्यू इंग्लिश बायबल) कोणी माणूस काय बोलेल याविषयी आपल्याला अगाऊपणे कळत नसले तरी लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांच्याशी आम्ही परिचित असतो. यामुळे आम्ही “शिकू” शकतो व विविध परिस्थितींचा सामना करण्यासाठी मानसिकरित्या स्वतःची तयारी करू शकतो.

४ उदाहरणार्थ, आपण जगव्याप्त शांतीबद्दल बोलण्याची तयारी केलेली असेल, पण घरमालकाने मध्येच विषय काढला की त्याची नोकरी गेली आहे. त्याचे हे म्हणणे आपण नजरेआड करावे का? आपल्या घरची कशी तरतूद करावी ही गोष्ट त्याच्या मनात व अंतःकरणात प्रधान स्थान घेऊन आहे हे नक्की. तर मग, त्याच्या गरजेला तुम्ही कसा प्रतिसाद देऊ शकाल? त्याच्याबद्दल सहानुभूति व्यक्‍त करून आणि त्याच्या परिस्थितीविषयी खरी काळजी वाटत आहे हे आपल्या भाष्याद्वारे दाखवून. मग, दयेने त्याचे लक्ष शास्त्रवचनांकडे वळवून देवाचे सरकार कसे समाधानकारक काम देईल तसेच आपल्या सर्व गरजा भागवील हे दाखवा.—यशया ६५:१७, २१, २२, २४.

५ आम्हाला असे कळले की, घरमालकाच्या कुटुंबातील कोणी सदस्य अलिकडच्या गुन्ह्‌यात बळी पडला आहे किंवा त्याला जबर अन्याय सहन करावा लागला आहे. अशावेळी आम्ही दाखवलेली सहानुभूतिपूर्वक काळजी आणि व्यक्‍तीगत आस्था त्या घरमालकाचे अंतःकरण मृदु करू शकेल व मग, त्याला, यहोवा देव या सर्व वेदनादायक समस्यांची जाणीव राखून असून तो सर्व दुष्टाईला काढून टाकण्यासाठी लवकरच हालचाल करील हे दाखवता येईल.—पहा रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स, पृष्ठे १०, १२, २२९-३१.

६ दोघांनी आपसात चांगले दळणवळण ठेवले नाही तर त्यांच्यातील नातेसंबंध दुर्बल होतात. अशावेळी, एखादा बोलतो तेव्हा दुसरा आपले मन व अंतःकरण लावून त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही. मग, अशाप्रकारची नीट न ऐकण्याची सवय गैरसमज निर्माण करते किंवा कोणाला मदत देण्याची संधि गमावते. उलटपक्षी, आदराने नीट ऐकून घेण्याची सवय लावल्यामुळे आम्हाला सुवार्ता अधिक प्रभावी रितीने सादर करता येईल, यहोवाची लोकांविषयीची निस्वार्थ आस्था इतरांपुढे दाखवता येईल आणि मग, लोकांना आमच्या या प्रेमळ निर्माणकर्त्याबरोबर व त्याच्या लोकांबरोबर चांगले नातेसंबंध वाढवीत राहण्याची मदत करता येईल.—याकोब १:१९; अवेक! ७४ ११/२२, पृष्ठे २१-३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा