द वॉचटावर याचे वाचन करण्यास इतरांना उत्तेजन द्या
१ सत्यावर प्रीती करणाऱ्या लोकांना द वॉचटावर याचे नियमित रुपाने वाचन करण्याचे प्रोत्साहन आपण मे व जून महिन्यात देत आहोत. आज पृथ्वीवर जी दयनीय स्थिती आहे त्याविषयी शोक व विलाप करणाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानाचा साठा केवळ हेच मासिक पुरवीत आहे हे आमच्या स्वानुभवावरून आम्हाला कळले आहे.—यहे. ९:४.
२ द वॉचटावर याने आम्हाला पवित्र शास्त्र भविष्यवादांची समज पुरविली की, आपण शेवटल्या काळात राहात आहोत व लवकरच देवाचे राज्य या पृथ्वीवर शांती आणील. आम्हाला इतरांच्या जीवनाविषयी खरी काळजी वाटत असल्यामुळेच या अद्भुत आशेची सहभागी त्यांच्याबरोबर करण्याची कळकळ आम्हाला वाटली पाहिजे. या कार्यामुळे कित्येक प्रामाणिक हृदयाचे लोक तारणासाठी गोळा केले जात आहेत हे पाहून आम्हाला मोठे समाधान मिळते.—योहान १०:१६.
३ द वॉचटावर मासिकाच्या एप्रिल १, १९९१ च्या अंकातील एक विचारप्रवर्तक लेख, “इस इट लेटर दॅन यू थिंक?” हा आहे. एप्रिल १५ च्या अंकात “व्हेन पीस वील रिअली कम?” हा लेख देण्यात आला आहे. हे लेख आमचा नवा संभाषणाचा विषय, “जगव्याप्त शांती—ती जवळ आहे का?” याजबरोबर अगदी छानपणे जुळतात. घरमालक सुवार्तेविषयी खराच आस्थेवाईक आहे का हे पडताळण्यासाठी त्याला पवित्र शास्त्राच्या उबदार व मैत्रीपूर्ण चर्चेत सामील करा. याला पूर्वतयारी जरुरीची आहे व यात सध्याची मासिके घरमालकाला चर्चेला घेतलेल्या विषयाबद्दलची समज अधिक वाढवण्यात कशी उपयुक्त आहेत हे दाखविण्याची तयारीही समाविष्ट आहे.
४ जे आम्हाला आपला पत्ता देतात अशांना मासिके पाठविणे हे आमचे उद्दिष्ट नाही. आमची नेमणूक ही प्रचार करण्याची व शिष्य बनविण्याची आहे हे लक्षात ठेवा. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) एखाद्या व्यक्तीला निवडक लेख वाचावयाला आवडतात तर त्याचे नाव आम्ही आपल्या मासिक फेऱ्यासाठी लिहावे व त्याला व्यक्तीशः नियमित भेटी द्याव्या. त्याच्याबरोबरचा तुमचा नित्य सहवास त्याजमध्ये अधिक रस वाढवण्यात आणि केव्हा त्या व्यक्तीने द वॉचटावर हे मासिक टपालाने सुरु करावे हे ठरविण्यात अधिक मुभा पुरवील.
५ यहोवाच्या राज्याची सुवार्ता घरोघर तसेच अनौपचारिकपणे लोकांना सांगण्यात मे व जून महिन्यामध्ये आपल्याला पुष्कळ सुसंध्या मिळणार. आमच्या क्षेत्रातील लीन जनांना आध्यात्मिक तजेला देण्यासाठी आपण जे परिश्रम घेऊ त्यावर यहोवाचा विपुल आशीर्वाद सतत असेल याचा आम्ही आत्मविश्वास बाळगू शकतो.