वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९१ पृ. १
  • “या!” असे निर्भिडपणे निमंत्रण द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “या!” असे निर्भिडपणे निमंत्रण द्या
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निर्भिड सहभागिता
  • ‘आत्मा व वधू “ये” असे म्हणत राहतात’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • “ऐकणाराही म्हणोः ‘ये!’”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • एक परिणामकारक मोहीम
    आमची राज्य सेवा—२०१३
  • एक खास आमंत्रण
    आपली राज्य सेवा—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ३/९१ पृ. १

“या!” असे निर्भिडपणे निमंत्रण द्या

१ जगभर जलदगतीने घडणाऱ्‍या घटना सध्याच्या काळाची “शेवटला काळ” ही ओळख देत आहेत. (२ तीम. ३:१-५) गुन्हेगारीत वाढ, आर्थिक अस्थैर्यता, आणि जीवास धोकादायक असणारे आजार यांनी आपला दबाव वाढवला आहे. तथापि, अशा अनर्थात देखील, हे आनंदाचे आहे की, लोकांना आज असे आमंत्रण दिले जात आहे जे त्यांना सर्वकाळासाठी वाचवू शकते. आत्मा व वधू ही सारखे म्हणत आहेतः “या!” आणि आता यांना “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाला आहे व तोही सर्वत्र लोकांना, त्यांनी येऊन जीवनाचे पाणी मोफत घ्यावे असे निमंत्रण देत आहे.—प्रकटी. ७:९; २२:१७.

२ आज धार्मिकतेची तहान असलेले लोक मोठ्या संख्येने या निमंत्रणाचा स्वीकार करीत आहेत. गेल्या वर्षी प्रांतिय अधिवेशनांना जगभर लाखो उपस्थित राहिले होते, आणि जवळजवळ १ कोटी लोक स्मारकविधीस उपस्थित होते. दुसरे लाखो जण राज्य संदेशाचे श्रवण करून यहोवाने पुरविलेल्या तरतुदींसंबंधाने आपली आत्मीयता दाखवीत आहेत. यास्तव, आम्ही आपला वेळ जाहीर तसेच घरोघरचे कार्य करण्यात सूज्ञतेने घालवून हे आमंत्रण सर्वांना देणे किती महत्त्वाचे आहे बरे!—प्रे. कृत्ये ५:४२; इफिस ५:१५, १६.

निर्भिड सहभागिता

३ आरंभीच्या ख्रिस्तीजनांचा त्यांच्या आवेशी प्रचारामुळे छळ झाला. (प्रे. कृत्ये १६:१९-२१; १७:२-८) तरीपण, त्यांनी सुवार्तेची घोषणा निर्भिडपणे करण्याचे थांबविले नाही. याचप्रमाणे आम्ही देखील सुवार्तेचा प्रचार निर्भिडपणे करण्याचा आमचा निश्‍चय राखला पाहिजे.

४ ज्या देशात प्रचाराच्या कामाला बंदी आहे तेथेसुद्धा आपले बांधव, तीव्र छळ तसेच नोकऱ्‍या, घरे व आपले स्वातंत्र्य गमावणे हे अनुभवीत आहेत तरीही प्रचारकार्यात पूर्ण अंतःकरणाने सहभागी होत आहेत. त्यांचे सुंदर उदाहरण आम्हाला, इतरांना “ये”ण्याचे निमंत्रण देण्यात उत्तेजनात्मक ठरावे.—२ थेस्स. ३:९.

५ एका भगिनीने सत्य शिकल्यानंतर ३५ वर्षे पायनियरींग करण्याची इच्छा अंतःकरणपूर्वक राखली होती. ती ७० वर्षांची झाली तेव्हा तिची व्यक्‍तीगत स्थिती बदलली आणि ती नियमित पायनियर बनली. अशा वयात एखादे नवे काम केवळ थोडेच घेऊ शकतील, पण तिने ते करून दाखविले. आता पूर्ण वेळेच्या कामाचा काही वर्षे अनुभव घेतल्यावर ती म्हणतेः “ते दररोज चांगले होत आहे.” तिने प्रयत्न करून राज्य सेवेच्या कामात अधिक सहभाग घ्यावा या यहोवाकडील निमंत्रणाचा निर्भिडपणे स्वीकार करून दाखविल्यामुळे तिने इतरांना आध्यात्मिक तजेला दिला आहे.

६ पहिल्या शतकाप्रमाणेच आजही लोक या निमंत्रणाचा स्वीकार करून आपल्या विचारात बदल करून आपल्या मनाचे रुपांतर करीत आहेत व देवाचा अपमान करणाऱ्‍या प्रथा सोडून देत आहेत. ते साक्षीदारांच्या समर्पित अशा आंतरराष्ट्रीय बंधुत्वाचा भाग बनत असून आत्मा व वधू यांच्याबरोबर मिळून आणखी इतर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना “या!” हे निमंत्रण देत आहेत.

७ राज्याच्या कार्यात होत असलेली प्रचंड वाढ तसेच विविध देशात शाखा दप्तरांचा होत असलेला विस्तार यहोवाच्या आशीर्वादांचा पुरावा देत आहे. पण या जुन्या व्यवस्थीकरणाची वेळ संपत आहे. तर “या!” असे निमंत्रण देण्यामध्ये आत्ताच निर्भिडता व आवेश प्रदर्शित करण्याची ही नामी वेळ आहे, ज्यामुळे इतर लवकर प्रतिसाद देतील आणि ऐकलेल्या गोष्टींनुरुप आवश्‍यक ती कृती करून दाखवतील.—प्रे. कृत्ये २०:२६, २७; रोम. १२:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा