वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९० पृ. ३
  • धीराने फळ देत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धीराने फळ देत राहा
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • धीर व चिकाटी महत्त्वाची
  • आम्हाला अधिक करता येणे शक्य आहे का?
  • प्रार्थनेची गरज
  • कृतज्ञता दाखविणे
  • इतर गरजा
  • “धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • ‘धीर धरणारे ते धन्य’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • सुवार्ता सादरता—प्रार्थनाशील पद्धतीने
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ‘विपुल फळ देत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ९/९० पृ. ३

धीराने फळ देत राहा

१ येशू ख्रिस्ताचा मृत्यु व त्याचे पुनरुत्थान होऊन ३० सुद्धा वर्षे झाली नसतील, तेव्हा प्रेषित पौलाने कलस्सै येथील मंडळीला पत्र पाठविले. त्यामध्ये त्याने हे म्हटले की, सत्याची सुवार्ता सर्व जगात फळ देत आहे व तिची वृद्धी होत आहे. (कल. १:५, ६) आज अगदी भव्य प्रमाणात यहोवाच्या साक्षीदारांनी राज्याची ही सुवार्ता अक्षरशः “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” नेली आहे असे म्हणता येईल. (प्रे. कृत्ये १:८; योहान १४:१२) १९८९ या कार्यवर्षात राज्य प्रचारकांच्या सर्वसाधारण संख्येत ५.६ टक्के वाढ झाली आणि आम्ही २१२ देशात ३७,८७,१८८ प्रचारकांचा उच्चांक गाठला!

२ ज्या देशात देवाच्या राज्याच्या प्रचाराला बंदी आहे व जेथून पूर्ण अहवाल मिळू शकले नाहीत तेथे तर ७.६ टक्क्यांची आणखी वाढ कळविण्यात आली! त्या देशात बहुत समस्या असल्या तरी तेथील प्रचारक “धीराने फळ देत” आहेत. (लूक ८:१५) काही जागी दबाव कमी होत आहेत, तरीपण इतर देशात कठीण परिस्थिती आहे तशीच आहे.

३ ज्या देशात राज्याच्या प्रचाराच्या कामाला अधिक मोकळीक आहे तेथे आम्ही वेगळ्या समस्यांना तोंड देऊन आहोत. क्षेत्रावर बरीच उदासीन वृत्ती व बेपर्वाईचा सामना करावा लागत आहे. हे, भौतिक समृद्धता असणाऱ्‍या देशात तर अधिकपणे जाणवते. या प्रवृत्त्यांची लागण स्वतःवर होऊ न देण्यासाठी यहोवाच्या सेवकांनी जागृत असले पाहिजे. आम्ही भौतिक आस्था, सुखविलास, मनोरंजन व इतर विचलीत करणाऱ्‍या गोष्टींना आमच्या ईश्‍वरशासित हालचालींवर अतिक्रमण करु देता कामा नये. तसे झालेच तर आम्हीही निष्काळजी होऊ आणि धीराने फळ देत राहण्याची जी गरज आहे तिजमध्ये अपयशी ठरु.—लूक २१:३४-३६.

धीर व चिकाटी महत्त्वाची

४ सुवार्तेबद्दलच्या विरोधाचा सामना आम्हाला करावा लागत असला किंवा आमच्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍यांची पूर्तता करण्यामध्ये आम्हाला अल्पशी मोकळीक आहे तेथे धीर राखणे जरुरीचे आहे. काही देशात आमचे बांधव काही दशकांपासून प्रतिकूल परिस्थितींचा सामना करीत कार्य करीत आहेत. अशा या प्रतिकूल परिस्थितीतील त्यांच्या धीराने त्यांना मान्यतेची स्थिती लाभू दिली व ते आता समृद्ध आशीर्वाद मिळवीत आहेत. (रोम. ५:३-५; गल. ६:९) आम्हाला कोणत्याही अडचणींना सामना द्यावा लागला तरी धीराने पुढे जात राहावे. राज्याची साक्ष ही दिलीच पाहिजे व हे करताना आम्ही सर्वांनीच आपल्यापरिने आपल्या सचोटीचे प्रदर्शन करण्यास हवे. धीरामुळेच आम्हाला आपले जीव किंवा जीवन मिळवून घेता येईल.—मार्क १३:१०; लूक २१:१९.

५ यहोवाच्या सेवेत उत्साहाने भाग घेत राहिल्यास व प्रचाराच्या कामी कधी कंटाळा न केल्यास आम्ही आध्यात्मिक गोष्टींना सहजपणे गृहीत धरणारे नाहीत असे दाखविता येईल. काही देशात रहदारीची साधने मिळणे मुष्कीलीचे आहे, गरजेच्या भौतिक वस्तुंची कमी आहे तसेच आर्थिक समस्या आहेत अशा ठिकाणी सुवार्तेच्या प्रचारास विरंगुळा नाही. यापैकीच्या काही देशात मंडळ प्रचारक महिन्याला १४ ते १७ तासांच्या क्षेत्रकार्याचा अहवाल देत आहेत. त्यांच्यामधील पायनियरांची संख्याही वाढती आहे. यामुळे, अधिक भौतिक सुविधा असणाऱ्‍या आम्हा बांधवांना जरा विचार करण्याचे कारण मिळते. आम्हाला सर्वात महत्त्वपूर्ण अशा राज्याच्या प्रचाराच्या व शिष्य बनविण्याच्या कामात आमचा नियमित सहभाग अधिक वाढवता येईल का?

आम्हाला अधिक करता येणे शक्य आहे का?

६ क्षेत्रकार्यात अधिक वेळ खर्च करायचा आहे तर आमच्या आराखड्यात काहीशी सुधारणा करण्याची गरज भासेल. आम्ही रविवारी क्षेत्रकार्यात एक तास कार्य करीत असलो तर आणखी एक तास पुनर्भेटी घेण्यात किंवा पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्यात वाढविता येईल का? किंवा आम्ही पवित्र शास्त्र अभ्यास चालवीत असलो तर त्याआधी एक तासासाठी घरोघरचे कार्य किंवा पुनर्भेटीचे कार्य करण्यात वेळ देऊ शकू का? शनिवारी दोन तासांचे मासिक कार्य केल्यावर आम्हाला आमच्या मासिक मार्गावर मासिके देता येतील किंवा काही पुनर्भेटी घेता येतील. जे शहरी विभागात राहतात अशांना काही सोयीचा वेळ रस्त्यावरील साक्षीकार्य करण्यात देता येईल. अशाप्रकारे या किंवा त्या माध्यमाने आम्हाला क्षेत्रकार्यातील आमचा सहभाग वाढविता येईल. यामुळे चांगले परिणाम प्रमाणबद्धतेत मिळण्यास हवेत.

७ क्षेत्रकार्यात अधिक वेळ खर्च करण्यामुळे अधिक पुनर्भेटी मिळतात व अधिक पुनर्भेटी घेतल्याने अधिक पवित्र शास्त्र अभ्यासांची प्राप्ती मिळते. मग, याचा परिणाम काही काळातच अधिक लोक सत्यात येतील व आमच्यासोबत राज्य-प्रचाराचे काम पूर्ण करण्यात मदत देतील.—मत्तय २८:१९, २०.

प्रार्थनेची गरज

८ आम्हाला धीराने फळ देत रहावयाचे आहे तर आम्ही यहोवाच्या आशीर्वादांची याचना करावी व त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाला अनुसरले पाहिजे. आम्ही आमच्या उपाध्यपणाच्या विषयास यहोवाला प्रार्थनेतून मांडले पाहिजे. आमच्या क्षेत्रकार्याविषयी यहोवाला प्रार्थना करताना आम्ही त्याचे सहकारी आहोत याचे आम्हाला स्मरण देण्यात आले आहे. (१ करिंथ ३:९) आमच्या उपाध्यपणात आम्हाला त्वरित परिणाम दिसत नसले तरी केवळ यहोवाच्या मदतीनेच आम्ही त्यात टिकून राहू शकतो. काही क्षेत्रात, राज्याच्या घोषकांनी कितीतरी वर्षे विश्‍वासूपणे धीराचे प्रदर्शन केल्यावर वाढ दिसली. आम्ही भवितव्याकडे पाहात असता, थकून न जाता आमचे उपाध्यपण पूर्णपणे तडीस नेता यावे म्हणून नेहमी ईश्‍वरी मार्गदर्शनाचा मागोवा घेतला पाहिजे. (२ तीम. ४:५) राज्याचा प्रचार व शिष्य बनविण्याच्या कामात अजूनही फलप्राप्ती मिळत आहे.

९ आम्ही सातत्याने प्रार्थना करीत राहण्याच्या गरजेवर येशूने भर दिला. (लूक १८:१) पौलाने बोध केलाः “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनी. ५:१७) आम्ही आता प्रार्थनेत तत्पर राहण्याविषयी काही तातडीची कारणे आहेत. दरवर्षी वाढत जाणाऱ्‍या कळपाची काळजी घेण्यात बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या समाविष्ट आहेत. इतरांनीही धीराने फळ देत राहावे म्हणून त्यांना मदत व उत्तेजन देण्याची गरज आहे. प्रत्येक प्रचारक तसेच सबंध संघटन यांच्या विशिष्ट गरजांकडे लक्ष दिले पाहिजे. राज्याच्या कामास हातभार लाभावा तसेच पवित्र शास्त्रावर आधारित असलेली प्रकाशने सतत उपलब्ध व्हावीत म्हणून अनुदानाची जी गरज आहे त्यासाठी आपण यहोवाला, त्याने देवभिरु लोकांनी याबाबतीत उदार प्रवृत्ती दाखवावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे.—२ करिंथ. ९:८-११.

१० जगभरातील क्षेत्र पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात ईश्‍वरशासित हालचालींसाठी उघडे होत असता कलस्सैकर ४:२ मधील बोध आज अधिक अर्थपूर्णता घेत आहेः “प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुति करीत जागृत राहा.” आम्ही आमच्या बांधवांसाठी सर्वत्र, त्यांनी फळ देत राहावे तसेच गतकाळात जेथे साक्षीकार्य अधिक कठीण होते त्या क्षेत्रात आढळलेल्या अधिक मेंढरासमान वृत्तीच्या लोकांना मदत देण्याविषयी प्रार्थना करण्यास हवी.

कृतज्ञता दाखविणे

११ आम्ही ज्याचा मनमुराद आनंद घेत आहोत त्या आध्यात्मिक तरतुदींविषयी आम्हाला किती कृतज्ञ वाटते बरे! या सर्वासाठी आम्ही यहोवाचे आभार मानण्यास हवेत, तसेच विश्‍वासू दास व त्याचे नियमन मंडळ यांच्या कार्यावर अधिक आशीर्वाद यावा यासाठी प्रार्थना केली पाहिजे. ते आम्हासाठी तसेच जगभरातील सर्व मेंढरासमान लोकांविषयीची काळजी करण्यात जे नम्र व अविश्रांत परिश्रम घेत आहेत त्याविषयी सगळीकडे कृतज्ञता व्यक्‍त होत आहे.

१२ राज्याच्या बीची लावणी करण्यात बऱ्‍याच प्रकाशनांचे वितरण झालेले आहे. (मत्तय १३:३-८, १८-२३) तरीही, क्षेत्राकडून पवित्र शास्त्र व त्यावर आधारित असणाऱ्‍या प्रकाशनांसाठी अधिकाधिक मागणी होत आहे. जागतिक अहवाल स्पष्ट करतो की, पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यासाच्या रुपात पुष्कळ लागवड व पाणी घालण्याचे कार्य उरकण्यात आले आहे. आम्ही या महत्त्वपूर्ण कार्यात आपला सहभाग घेत असता यहोवाचे उपकार मानतो की, त्याच्याकडून मिळत असलेल्या सतत आशीर्वादामुळे सर्व गोष्टी वाढीला लागत आहेत. होय, त्या आशीर्वादासाठी आम्ही नित्य प्रार्थना करतो.—१ करिंथ. ३:६, ७.

इतर गरजा

१३ जगामध्ये राहून देखील जगाचे भाग नसल्यामुळे ख्रिश्‍चनांना परिक्षा व छळ येत राहणार व हे शेवटल्या दिवसात अधिक प्रखर होणार. काही सध्या छळ किंवा इतर अडचणी सहन करीत आहेत. काहींना युद्धाने छिन्‍नविच्छिन्‍न झालेल्या देशात आपले ख्रिस्ती कार्य करावे लागत आहे. आमच्या बांधवांना भूमिकंप, वादळ व तुफान या गोष्टींचा देखील अनुभव घ्यावा लागत आहे. असे घडते तेव्हा आम्ही त्या विभागातील आमच्या बांधवांसाठी प्रार्थना करावी. (पडताळा प्रे. कृत्ये १२:५; २ करिंथ. १:११.) आमच्या कामावर असणारी बंदी, आमच्या बांधवांचा ऐकिवात असलेला छळ तसेच राज्य आस्थेवर परिणाम करणाऱ्‍या गोष्टींसाठी उच्च दर्जावरील अधिकाऱ्‍यांचा प्रत्यक्ष संपर्क करणे किंवा त्यांना पत्र पाठविणे जरुरीचे बनते. अशा परिस्थितीत आपल्याला करता येते तेवढे करावे व सोबत या अधिकाऱ्‍यांविषयीही प्रार्थना करावी की त्यांनी आमच्या सहसेवकांच्या बाबतीत चांगली मनोवृत्ती दाखवावी म्हणून त्यांचे अंतःकरण मृदु केले जावे.—१ तीम. २:१, २.

१४ सैतानी दुष्ट जगात वसाहतीस असणाऱ्‍या अनेक कुटुंबावर पुष्कळ दबाव आणले जात आहेत. (२ करिंथ. ४:४) विवाहित कुटुंबांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असेल. अशांनी ईश्‍वरी मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांना प्रार्थना करण्याचे उत्तेजन द्यावे. तसेच आपणही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. (१ करिंथ ७:५; १ पेत्र ३:७) कुटुंब चालकांनी आपल्या घरची व्यवस्था नीट राखण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी जी प्रांजळ प्रार्थना ते करतील ती यहोवा ऐकेल ही खात्री राखावी. (शास्ते. १३:८; फिलि. ४:६, ७) युवकांना व वयस्करांनाही मोठ्या कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. हे कदाचित, शाळेत, नोकरीवर, प्रवासात किंवा इतर परिस्थितीत घडते. अशावेळी प्रार्थना ही या दुष्ट जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करण्यात आम्हाला मदत देते आणि आम्ही देवाच्या दृष्टीने योग्य ते करीत असता ती फळ देत राहण्यात साहाय्य करते.—मत्तय ६:१३; इफि. ६:१३-१८; १ योहा. ३:२२.

१५ यहोवा हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. (स्तोत्र. ६५:२) आम्ही सर्वदा आपल्या चिंता त्याच्यावर टाकल्या पाहिजेत. (स्तोत्र. ५५:२२) आम्ही प्रार्थनेच्या माध्यमाने सर्व राज्य आस्थेविषयी काळजी व्यक्‍त करण्याची तसेच आमच्या सर्वत्र असणाऱ्‍या बांधवांच्या कल्याणाविषयी चिंता दाखविण्याची आम्हाला संधि आहे. मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांच्या कामाविषयी तसेच जगभरात वाढीचा कार्यक्रम राबविणाऱ्‍या बांधवांविषयी आम्ही विचार करतो, आध्यात्मिकदृष्ट्या आजारी असणाऱ्‍यांसोबत दळणवळण राखताना किंवा लहान मोठ्या समस्यांना हाताळीत असताना आम्ही या सर्व गोष्टी प्रार्थनेकरवी यहोवापुढे ठेवाव्यात. (१ थेस्स. ५:२५; याकोब ५:१४-१६) होय, आम्ही आमच्या सर्व चिंता यहोवावर टाकाव्या या खात्रीने की, आम्ही त्याच्या इच्छेनुसार काहीही मागितले तर तो आमचे ऐकेल. (१ पेत्र ५:७; १ योहान ५:१४) यासाठीच, आपण राज्य सेवेत आवेशी राहू या व धीराने फळ देत राहावे म्हणून मदत देण्यासाठी यहोवाकडे नित्याने पाहात राहू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा