आध्यात्मिक ऐश्वर्याची इतरांसमवेत सहभागी करा
१ आजच्या काळातील यहोवाच्या साक्षीदारांना विश्वासू मोशेप्रमाणेच ठाऊक आहे की, या जगाची भौतिक धनसंपदा आध्यात्मिक ऐश्वर्याच्या तुलनेत काहीही नाही. (इब्री. ११:२६) पैशांमुळे घरे, मोटरी व इतर मालकी ठेवा विकत घेता येतो, पण तो जीवन, मनाची शांती किंवा यहोवा देवाची मर्जी व आशीर्वाद देऊ शकत नाही.
२ देवाचे वचन व त्याचे उद्देश याविषयीचे ज्ञान व समज ही आध्यात्मिक ऐश्वर्ये होत. (कल. २:३) ही अद्वितीय ऐश्वर्ये सध्या खरा सौख्यानंद देऊ शकतात व भावी काळासाठी एक सबळ आशा देतात. असे हे आध्यात्मिक स्वरुपाचे ऐश्वर्य आपल्याला लाभले आहे म्हणून आपण किती मान्यताप्राप्त लोक आहोत बरे!
इतरांना कसे धनवान बनवावे
३ आपण लोकांना द वॉचटावर प्रस्तुत करण्याद्वारे आध्यात्मिक रितीने धनवान होण्यास मदत देऊ शकतो, कारण यांना त्याकरवी ईश्वरी सूज्ञानाच्या ‘गुप्त निधी’कडे निरविले जाते. (नीती २:४) यास्तव, जून महिन्याच्या दरम्यान आपण प्रत्येक संधीला द वॉचटावर याची वार्षिक वर्गणी सादर करण्याचा प्रयत्न करु या. द वॉचटावर याने आमच्या जीवनाला कसे समृद्ध केले हे लक्षात आणले तर आपण माघार न घेता होता होईल तितक्या अधिक लोकांना ते सादर करण्यासाठी विविध मार्ग अजमावून पाहू या. (नीती ३:२७) जेथे किरकोळ मासिके व माहितीपत्रके दिली आहेत तेथील पत्त्यांची नोंद करुन ठेवा म्हणजे तुम्हाला यांचा मागोवा घेत राहून नियमितपणे मासिके देता येऊन मासिक मार्ग तयार करता येईल.
४ स्तोत्रसंहिता ११२ मध्ये दाखवलेल्या त्या देवभिरु माणसासारखे आपल्याला कसे होता येईल, ज्याने आपणाकडील मोलवान वस्तु इतरांमध्ये मोकळपणाने वाटल्या? (स्तोत्र. ११२:१, ३, ९) आम्ही मेंढरांसमान वृत्ती दाखवणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्या आध्यात्मिक गरजा पुऱ्या करण्यासाठी मदत देण्यास हवी. (मत्तय ५:३) याचा अर्थ हा की, आम्ही प्रत्येक संधीचा फायदा घेऊन औपचारिक व अनौपचारिक साक्ष द्यावी.
५ काही क्षेत्रात सायंकाळचे साक्षीकार्य अधिक फलदायी असल्याचे दिसून आले आहे कारण यावेळी अधिक लोक आपल्या घरी असतात. तुम्ही तुमच्या गटाचा पुस्तक अभ्यास होण्याआधी जवळपास कोठेतरी किंवा आठवड्याच्या इतर दिवशी एके संध्याकाळी एखादा तास क्षेत्रकार्य करण्याचा प्रयत्न केला आहे का? हे करण्यासाठी निश्चित आराखडा का करु नये? ते कार्य तुम्हाला मोठे फलदायी ठरू शकेल.
६ तुम्ही जेथे नोकरीला आहात तेथेही योग्य वेळी साक्ष देण्याचा प्रयत्न करता का? एक भगिनीने आपल्या टेबलावर कित्येक मासिके तिच्या सहकामगारांनी जाताना पहावीत म्हणून ठेवली. पण दुपार येण्याआधीच ती सर्व मासिके वितरीत झाली. तिच्या बऱ्याच कामगार साथीदारांनी खरी आस्था दाखवली व यामुळे तिला १८ वार्षिक वर्गण्या मिळू शकल्या.
७ आपल्याला यहोवाची संस्था आणि पवित्र शास्त्राचा आपला अभ्यास याकरवी जे ज्ञान व माहितीचे आध्यात्मिक ऐश्वर्य मिळाले आहे त्याची तुलना चांदी, सोने व इतर जडवादीय संपत्तीसोबत करता येणार नाही. जे आध्यात्मिक ऐश्वर्याचा शोध घेत आहेत अशांना खरा सौख्यानंद, समाधानाचा मार्ग, शांती, “दीर्घायुष्य”—सार्वकालिक जीवन देखील—या गोष्टी शक्य होत आहेत. (नीती. ३:१३-१८) आध्यात्मिक ऐश्वर्याची भागीदारी इतरांसोबत करण्यामुळे आम्हाला जे मिळाले आहे त्याविषयी आपली आम्ही रसिकता व्यक्त करीत असतो व यामुळे आपल्यावर यहोवाचे सतत आशीर्वाद राहतात.—नीती. १९:१७.