देवाच्या वचनावर विश्वास उभारा
१ दृढ विश्वास जोपासण्याचा काळ कोणता असेल तर तो सध्याचा आहे. पुष्कळ लोकांना विश्वास व भविष्याबद्दलची आशा मुळीच नाही. धार्मिक तसेच राजकीय नेत्यांनी सहसा खोट्या आशेची उभारणी केली आहे की ज्यामुळे पुष्कळ लोक अगदी उघडपणे आपली निराशा दाखवीत आहेत. प्रेषित पौलाने म्हटले होते ते अगदी खरेच आहेः “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्स. ३:२) तरीपण विश्वास हा यहोवाच्या साक्षीदारांचा ठेवा आहे. देवाच्या वचनात आढळणाऱ्या अभिवचनांची नक्कीच पूर्णता होईल असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.
२ यहोवाच्या साक्षीदारांमधील दृढ विश्वास हा त्यांना इतर लोकांपासून वेगळे दाखवतो. हा विश्वास इतरांना तसेच आपल्याही लाभदायक असणारी कर्मे करण्यात तसेच देवाला सन्मान मिळवून देण्यात चालना देतो. असा हा विश्वास देवाच्या वचनाला आमच्या जीवनावर प्रभूत्व करू देण्यास सोडल्यामुळे परिणामित होत असतो. अस्सल ख्रिश्चनांचे आजचे आंतरराष्ट्रीय बंधुत्व हे पवित्र शास्त्र देवाचे प्रेरित वचन आहे असा विश्वास उभारण्याचे मूल्य दाखवून देतो.— २ तीमथ्य ३:१६.
३ इतरांना विश्वासाची उभारणी करण्यास का मदत करावी: वस्तुतः जीवन पणाला लागले असल्यामुळे इतरांनी त्यांचा विश्वास उभारावा यासाठी त्यांची मदत करण्याचे आम्हाला दृढ कारण आहे. हेच लक्षात ठेवून आपण जुलैमध्ये द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? हे पुस्तक क्षेत्रावर सादर करणार आहोत. हे पुस्तक देण्यामगील उद्देश हा की, लोकांनी पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे हे पाहण्यात त्यांना मदत द्यावी. तेदेवाच्या वचनावर लावण्यात आलेल्या कित्येक दोषारोपांची चर्चा करते व त्यांना हाणून पाडते. ते अशा प्रकारातील पुष्कळ प्रश्नांची उत्तरे देते, जसे कीः पवित्र शास्त्र हे अवैज्ञानिक आहे का? ते स्वतःच विपर्यास करणारे आहे का? ते दंतकथा किंवा कहाणी आहे का? पवित्र शास्त्रात उल्लेखिण्यात आलेले चमत्कार खरेच घडले होते का? भूगर्भसंशोधनाने पवित्र शास्त्राच्या अचूक इतिहासाला खोडले आहे का? यासोबत हे प्रकाशन पवित्र शास्त्राच्या प्रेरकतेबद्दल पुष्कळ सुंदर पुरावे देते. ते पवित्र शास्त्राच्या अचूक भविष्यवादांकडे याचप्रमाणे त्याच्या एकंदर अद्भूत सुसंगततेबद्दल देखील निर्देश करते.
४ पवित्र शास्त्रातील सबळ व्यावहारिक ज्ञान तसेच त्यांची लोकांना चांगल्यासाठी बदलण्याची क्षमता हा पवित्र शास्त्र देवाचे वचन असल्याचा पुरावा दाखविण्याचा एक भाग झाला. या पुराव्याबद्दल लोकांना शिकण्याची मदत देण्याची जबाबदारी आमची आहे. हे करण्यासाठी प्रथम आपण त्यांना पवित्र शास्त्र जे म्हणते त्यावर विश्वास ठेवण्यास शिकवले पाहिजे. या कारणास्तव आम्ही ज्यांना प्रकाशने दिली आहेत अशांकडे लवकरात लवकर जाऊन त्यांना पवित्र शास्त्र अभ्यास सादर करून त्यांचा विश्वास उभारण्याची मदत करू शकतो.
५ पुस्तक विश्वास उभारण्यास मदत देते: पुरावा प्रामाणिकपणे तपासून पाहिल्यास कोणीही प्रांजळ माणूस पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे हे स्वीकारण्यात मागे राहणार नाही. हे पुस्तक याबद्दलचा पुरावा अगदी सुलभ रितीने सादर करते. आम्ही लोकांना पवित्र शास्त्र हे देवाचे वचन आहे असे स्वीकारण्याचे तसेच त्याच्या प्रेरित सल्ल्यानुसार जीवन व्यतित करण्याचे प्रोत्साहन देण्याची इच्छा धरावी. जे तसे करीतील ते आनंदाने स्तोत्रकर्त्याच्या अंतःकरणपूर्वक प्रार्थनेचे शब्द प्रतिध्वनित करतीलः “तुझे विधि मी किती प्रिय मानीत आहे ते पाहा; हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तू आपल्या सप्रेम दयेने माझे रक्षण कर. तुझे एकंदर वचन सत्य आहे; तुझे सर्व रास्त निर्णय सनातन आहेत.”—स्तोत्रसंहिता ११९:१५९, १६०.
६ येणाऱ्या “मोठ्या संकटा”तून संरक्षण मिळविण्याची इच्छा करणाऱ्या सर्वांना यहोवा त्याचे वचन, पवित्र शास्त्र याबद्दल प्रेमळपणे मार्गदर्शन देत आहे. (मत्तय २४:२१) जुलैदरम्यान आपण द बायबल—गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? या पुस्तकाचे वितरण १२ रुपयांना करून इतरांना देवाचे वचन वाचण्याचे व अभ्यास करण्याचे उत्तेजन देऊ शकतो.