ईश्वरशासित वृत
◆ जपानचा सप्टेंबरमध्ये नवीन प्रचारकांचा उच्चांक १,३८,९८५ होता. नियमित पायनियरांचा ऑगस्टमध्ये जो उच्चांक होता त्यात २,२०० नी अधिक भर पडली. नवीन कार्यवर्षांत पाच नवे विभाग सुरु करण्यात आले. सप्टेंबरमध्ये ९९ विभागात १२८ पायनियर सेवा शाळा वर्ग घेण्यात आले आणि एकुण ३,०६८ नियमित पायनियर या अभ्यासक्रमात सहभागी होते.
◆ पापुआ न्यु गिनीमध्ये २,२७२ प्रचारकांनी अहवाल देऊन सप्टेंबरमध्ये ९ टक्के वाढीचा एक नवा उच्चांक गाठला.
◆ श्री लंका येथे सप्टेंबरमध्ये १,२४९ प्रचारकांनी अहवाल देऊन एक नवा उच्चांक गाठला.
◆ युगांडामध्ये सप्टेंबरमध्ये ६४२ प्रचारकांद्वारा एक नवा उच्चांक गाठला गेला. जी दोन विभागिय संमेलने झाली त्यांची संयुक्त उपस्थिती १,३७४ होती व बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या ३४ होती.