प्रश्न पेटी
● मंडळीच्या पुस्तक अभ्यास स्थळी असता आपण आपला ख्रिस्ती शिष्टाचार कसा ठेवावा?
आमच्या शेजाऱ्यांचे आम्हाकडे नेहमी लक्ष असते व काही वेळा ते आमच्या वागणूकीबद्दल बोलतात व प्रतिक्रियाही व्यक्त करतात. (पडताळा १ करिंथकर ४:९.) यहोवाचे सेवक असल्यामुळे आमच्या वागणूकीविषयी त्यांचे उद्गार व प्रतिक्रिया ही अनुकूल असावी असेच आम्ही इच्छिले पाहिजे. (१ पेत्र २:१२) हेच, मंडळीचा पुस्तक अभ्यास जेथे होत असतो तेथे आम्ही दाखवीत असलेल्या वागणूकीविषयीही खरे आहे. मंडळीचे बहुतेक पुस्तक अभ्यास हे खाजगी घरी घेण्यात येत असल्यामुळे आमचा शिष्टाचार चांगला आहे याची आम्ही खास दखल घेण्यास हवी. पुस्तक अभ्यास स्थळाच्या परिसरात वाहने ठेवण्याची जागा मर्यादित असेल तर आम्हाठायी शेजाऱ्याविषयी वाटणारे प्रेम, आम्हास, इतरांची गैरसोय होऊन त्यांना आमचा राग येईल अशा कोणाही जागी अविचाराने आमचे वाहन लावण्यापासून दूर ठेवील.
आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र होतो तेव्हा आम्हाला आनंद वाटत असतो व यामुळेच सभेच्या आधी व नंतर आम्हाकडून बरेच उत्साही स्वरुपाचे संभाषण घडत असते हे आपल्याला ठाऊक आहे. (मीखा २:१२) चांगला शिष्टाचार व इतरांबद्दलची सहानुभूती ही आम्हाला बजावील की आमची संभाषणाची वाणी विनयशील असावी. (मत्तय ७:१२; गलती. ६:१०) ख्रिस्ती प्रीती आम्हास, आमच्या मुलांना बाहेर पळण्यापासून, दुसऱ्या लोकांच्या चीजवस्तुंची मोडतोड करण्यापासून दूर ठेवण्याचे नियंत्रण अमलात आणण्यास भाग पाडील. (नीती. २९:१५; १ करिंथ. १३:४, ५) यातच, ज्या घरी पुस्तक अभ्यास चालतो तेथे सभ्य वागणूक ठेवणे हेही समाविष्ट आहे. जर कोणी गैरवर्तणूक केल्याचे आढळले तर वडीलजनाने प्रेमळ पण सक्त ताकीद देण्यात उशीर करू नये, ते यासाठी की, तशा समस्या परत उद्भवू नयेत व शिवाय ज्यांनी एवढ्या आदर सत्काराने आपले घर अभ्यासासाठी दिले त्यांच्याबद्दल शेजाऱ्याकडून तक्रारी, अडचणी उभ्या राहू नयेत; किंवा जे त्या विशिष्ठ स्थळी अभ्यासाला येतात अशांसाठी संकोच निर्माण होऊ देऊ नये.