सर्व गोष्टी घडविणाऱ्या निर्मात्याचा सन्मान करा
१ १९ व्या शतकात सैतानाने, मानवजातीला अंधळे करावे यासाठी एका कावेबाज योजनेला उबविले. ते होते उत्क्रांतीचे तत्त्व. (२ करिंथ. ४:४) हे तत्त्व, पवित्र शास्त्रातील निर्मितीच्या अहवालाचा तसेच मानवाचे पापात पतन घडले या गोष्टींचा धिक्कार करते. त्यामुळे येशूचे खंडणी यज्ञार्पण तसेच पवित्र शास्त्र देवाचे राज्य आणि सार्वकालिक जीवन याविषयी जे शिक्षण देते ते व्यर्थ होऊ शकते. याखेरीज, हे उत्क्रांतीचे तत्त्व हिंसाचार व युद्धे, तसेच लैंगिक अनैतिकता व सर्व प्रकारचा अर्धम यांना वाट देते. या घातक शिक्षणाविषयी कोण मानवजातीला इशारा देऊ शकेल?
२ ऑक्टोबर महिन्यात हेच काम आम्ही करणार आहोत, कारण आपण यहोवाच्या निर्माणकर्त्यापदाविषयी जाहीर घोषणा करण्यात मग्न असणार. आम्ही आमच्या घरोघरच्या उपाध्यपणाच्या कार्यात, रस्त्यावरील साक्षीकार्यात, नोकरीवरील जेवणाच्या सुटीत तसेच शाळेत लाईफ—हाव डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकाची सादरता करणार आहोत. ते उत्क्रांतीचे तत्त्व देवाची कशी मानखंडणा करते याविषयी सर्वांना सांगण्याची आमची इच्छा असावी.
प्रभावी साक्ष द्या
३ अनौपचारिकपणे किंवा घरोघरचे साक्षीकार्य करताना तुम्ही उत्क्रांती या विषयासंबंधाने बातम्यांच्या माध्यमाने वेळोवेळी जे मतप्रतिपादन करण्यात आले आहे त्याचा उल्लेख संभाषणाच्या सुरवातीस करू शकता. हे उत्क्रांतीचे तत्त्व शाळेत शिकवले जावे का याविषयी बरेच मतप्रतिपादन झाले आहे. या विषयासंबंधाने कोणा व्यक्तीने झालेली चर्चा ऐकली असेल वा वाचली असेल; तसेच त्यावरील संतप्त वादावादीही वाचली असेल, तरीसुद्धा या विषयाच्या अनुषंगाने पवित्र शास्त्रात जे थेट विधान मांडण्यात आले आहे त्याविषयी जाणून घेण्यास त्याला निःसंशये आवडेल. तेव्हा इब्रीयांस ३:४ मध्ये जे म्हटले आहे त्याकडे घरमालकाचे लक्ष वेधवा. ते वाचा व थोडक्यात त्यावर विवेचन मांडा.
४ घरमालक धार्मिक स्वरुपाचा दिसत असल्यास, तुम्हाला हे म्हणता येईल की, धार्मिक लोक तसेच उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारे लोक हे मानतात की, आम्ही सभोवार ज्या गोष्टी बघतो त्याला “सृष्टी” किंवा “सृष्टीमाता” जबाबदार आहे. पण या अद्भुत विश्वाचा थोर दाता व निर्माता याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला अजाण ठेवीत नाही. तेव्हा प्रकटीकरण ४:११ कडे त्यांचे लक्ष वळविता येऊ शकेल. ते वचन वाचल्यावर कदाचित घरमालकाला आपले विचार मांडावेसे वाटतील. तेव्हा याची सांगड क्रिएशन पुस्तकातील एखादा विशिष्ट मुद्दा किंवा अधिक मुद्दे याजसोबत बांधून तुम्ही ते पुस्तक त्याला वाचण्याचे उत्तेजन देऊ शकाल.
शाळेत
५ अहो, यहोवाचे सर्व तरुण सेवकहो, तुम्ही क्रिएशन पुस्तकाची आधी उजळणी करून ठेवा व तुमचे शाळकरी मित्र तसेच शिक्षकांना कोणत्या मुद्याविषयीची माहिती दाखवून त्यांजमध्ये आस्था निर्माण करता येईल ते विचारात घ्या. काहींना हे आढळले की ते पुस्तकच नुसते बाकावर ठेवले तरी त्यामुळे चर्चेला आरंभ मिळतो. दुसऱ्यांनी निर्मिती या विषयाच्या अनुषंगाने आपले शिक्षक तसेच व्यवस्थापकीय वर्ग यांच्याशी चर्चा केली व यामुळे त्यांना बऱ्याच प्रतींचे वितरण करता आले.
६ जेथे प्रत्येकजण यहोवाचा सन्मान करीत राहील अशा जगात वास्तव्य करण्याची आशा आम्हा सर्वांना आहे याचा आम्हाला आनंद वाटतो. प्रकटीकरणातील दृष्टांतात योहानाने बघितले की, दैदिप्यमान प्राणी यहोवासमोर दंडवत घालून अशी घोषणा करीत आहेतः “हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटी. ४:११) हेच शब्द आपण आपल्या ऑक्टोबरच्या उपाध्यपणात प्रतिध्वनित करू या!