वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९१ पृ. ३
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अभ्यास चालविण्यामागील ध्येये
  • व्यक्‍तीगत आस्था दाखवा
  • मंडळीचा पुस्तक अभ्यास शैक्षणिक कार्यहालचालींना चालना देतो
    आमची राज्य सेवा—१९९४
  • मंडळीतील आमच्या पुस्तक अभ्यास चालकासोबत सहकार्य देणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • पुढाकार घेणारे पर्यवेक्षक—मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक
    आमची राज्य सेवा—१९९९
  • मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था भाग ३: क्षेत्र कार्याचे केंद्र
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km ८/९१ पृ. ३

मंडळीची पुस्तक अभ्यास व्यवस्था

भाग १: अभ्यास चालकाची जबाबदारी

१ यहोवाच्या लोकांची आध्यात्मिक वाढ करण्यामध्ये मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. येणाऱ्‍या महिन्यांमध्ये मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेसंबंधीची विविध माहिती तसेच त्यापासून आपल्याला कसा लाभ मिळू शकेल ते आपण पाहणार आहोत. या अंकात आपण पुस्तक अभ्यास चालकास अभ्यास कसा प्रोत्साहनदायक तसेच विश्‍वासास उभारक बनवता येईल ते बघू या.

२ आपले शिक्षण परिणामकारक रितीने देण्यासाठी चालकाने चांगली तयारी केली पाहिजे. देवाच्या वचनाचा मननशील अभ्यास करणारा विद्यार्थी या नात्याने त्याला केवळ प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर माहीत असून उपयोगाचे नाही, तर ते का अचूक आहे हे देखील माहीत असावयास हवे. अभ्यासातील सर्वांनी उत्तराचे कारण जाणून घ्यावे ही मदत देण्याची त्याची पराकाष्ठा असावी. (१ पेत्र ३:१५) यामुळे त्यांची साहित्याविषयी आवड अधिक खोलवर रुजविली जाईल.

अभ्यास चालविण्यामागील ध्येये

३ अभ्यासात उपस्थित असलेल्या सर्वांच्या विश्‍वासाची उभारणी करावी व त्यांना देवाची इच्छा अधिक पूर्ण रुपाने करण्याची चालना द्यावी यासाठी साहित्याचा वापर करावा हे चालकाचे एक ध्येय असावे. (स्तोत्र. ११०:३; २ थेस्स. १:३-५) हे साध्य करण्यासाठी, चालकाने काही विशिष्ट ठिकाणी थांबून, जे मुद्दे यहोवा, त्याचे वचन, व त्याची संस्था याबद्दलची हृदयनिष्ठा वाढवितात ते ‘जोर देऊन सांगावे.’ (गल. ६:६, रेफ. बाय. तळटीप) वेळ आहे त्यानुसार, विश्‍वासाची उभारणी करणाऱ्‍या या मुद्यांना बाहेर काढण्यासाठी कुशलपणे प्रश्‍न विचारले पाहिजेत.

४ साहित्याचा व्यावहारिकपणे कसा उपयोग करता येईल हे पाहण्याची मदत सर्वांना देणे हे आणखी एक ध्येय आहे. यांचा त्यांना क्षेत्र कार्यासाठी कसा वापर करता येईल? बांधव तसेच नवीन लोकांना याकडून कसे उत्तेजन देता येईल? स्वतःला व कुटुंबाला याद्वारे कशी दृढता देता येईल? मंडळीच्या पुस्तक अभ्यास चालकांनी दरवेळी धड्याची तयारी करताना अभ्यासात विशिष्ट मुद्यांचा कसा व्यावहारिक उपयोग करता येईल हे आधी जाणून घ्यावे.

५ काही माहिती विश्‍वासात नसणारे नातेवाईक, शाळकरी मित्र, तसेच सोबतीचे कामगार यांना साहाय्यक ठरू शकते. दुसरे साहित्य विश्‍वासात विभाजित असणाऱ्‍या घरात किंवा एक-पालकीय कुटुंबाला उपयुक्‍त ठरू शकते. विचारात घेत असलेल्या सहित्याची कारणमीमांसा शोधण्यास मदत देऊन तसेच त्यांना त्या साहित्याचा व्यावहारिक अवलंब कसा करता येईल याचे उत्तर त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांना साहाय्यक करु शकेल. अभ्यासात प्रश्‍न वाचणे व उत्तरे विचारणे यापेक्षा तो अधिक मनोरंजक कसा करता येईल ते चालकाने पाहण्यास हवे.—पडताळा १ करिंथकर १४:९, १९.

व्यक्‍तीगत आस्था दाखवा

६ गटातील प्रत्येकाविषयीची व्यक्‍तीगत आस्था राखून सर्वांना पूर्ण रुपाने सहभागी होण्याची उत्तेजन चालकाला देता येईल. जे लाजाळू आहेत अशांना आधीच एखादे शास्त्रवचन वाचण्याची किंवा एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर तयार करून येण्याची नियुक्‍ती द्यावी. सर्वांनी आपल्या शब्दात उत्तरे देण्याचा प्रयत्न राखावा. दिलेल्या अभिप्रायाकडे लक्ष देऊन ऐकल्यामुळे चालकाला हे समजू शकते की, कोणाला व्यक्‍तीगत साहाय्याची गरज आहे का. अशा विशिष्ठांकडे लक्ष देण्यासाठी तो गटातील कोणा अनुभवी बंधूचा वापर करू शकतो.

७ मंडळीचा पुस्तक अभ्यास हा आम्हास एक आशीर्वाद आहे. तो आम्हाला लहान गटात एकत्रित भेटण्याची तसेच आम्हाकडे अधिक व्यक्‍तीगत लक्ष मिळण्याची सोय पुरवितो. या कारणास्तव, ही सभा इतर सभांच्या तुलनेत तितकी महत्त्वपूर्ण नाही असे मुळीच समजू नये. मंडळीतील तुमचा पुस्तक अभ्यास चालक, दर आठवड्याच्या अभ्यासाचा वापर, तुमच्या यहोवावरील विश्‍वासास उभारक ठरण्याकरता आणि देवाच्या आध्यात्मिक तरतुदींविषयी तुमची आवड अधिक वाढवण्यासाठी करण्याची आपली जबाबदारी गंभीरपणे घेत असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा