वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w18 नोव्हेंबर पृ. ३२
  • आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “यहोवासाठी एक भेट”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • ‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही यहोवाचे आभार मानतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
w18 नोव्हेंबर पृ. ३२
donate.jw.org

आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो?

येशूने एकदा म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्ये २०:३५) ही गोष्ट आपल्या आणि यहोवाच्या नात्यालाही लागू होते. असं का म्हणता येईल? कारण यहोवाने आपल्याला बऱ्‍याच भेटवस्तू दिल्या आहेत आणि यामुळे आपल्याला आनंद होतो. पण यहोवाला भेट दिल्यामुळे  आपल्याला जास्त  आनंद होईल. आपण यहोवाला कोणती भेट देऊ शकतो? नीतिसूत्रे ३:९ मध्ये म्हटलं आहे: “तू आपल्या द्रव्याने [मौल्यवान गोष्टींनी, NW] . . . परमेश्‍वराचा सन्मान कर.” आपल्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टींमध्ये आपला वेळ, आपली कौशल्यं, शक्‍ती आणि साधनं सामील आहेत. आपण या सर्व गोष्टींचा उपयोग खऱ्‍या उपासनेला वाढवण्यासाठी करतो, तेव्हा आपण यहोवाला भेट देत असतो आणि यामुळे आपल्याला आनंद होतो.

भौतिक गोष्टींमधून यहोवाला भेटवस्तू देण्याच्या बाबतीत दुर्लक्ष होऊ नये म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? प्रेषित पौलने करिंथकरांना सांगितलं, की त्यांनी दान म्हणून काही रक्कम “बाजूला काढून” ठेवावी. (१ करिंथ. १६:२) जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात दान देण्याच्या पद्धतींबाबतीत अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता? खाली दिलेल्या चौकटीत याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सर्व देशांमध्ये ऑनलाईन दान देण्याची सोय उपलब्ध नाही. पण इतर कोणत्या मार्गांनी दान दिलं जाऊ शकतं याबद्दल डोनेशन्सच्या पेजवर माहिती मिळू शकते. काही देशांमध्ये या पेजवर दान देण्याबाबतीत सहसा विचारल्या जाणाऱ्‍या प्रश्‍नांबद्दल एक दस्तऐवज उपलब्ध असतं.

ऑनलाईन दान देण्याचा सोपा मार्ग

शोधायला सोपं

  • वेब ब्राउझर

    वेब ब्राउझरमध्ये donate.jw.org टाईप करा

  • JW Library

    JW Library® च्या होम पेजवर “डोनेशन्स” लिंकवर क्लिक करा

वापरायला सोपं

पुढील गोष्टींसाठी एकदा किंवा अनेकदा दान द्या:

  • जगभरात चाललेल्या कामासाठी

  • तुमच्या मंडळीसाठी

  • प्रांतीय अधिवेशनासाठी

  • विभागीय संमेलनासाठी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा