वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. ३ पृ. १४-१५
  • तुमचा विश्‍वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचा विश्‍वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण आपला विश्‍वास बायबलमधून कसा पडताळून पाहू शकतो?
  • देवाचे राज्य काय आहे?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • देवाचं राज्य काय आहे?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • स्वर्गास कोण जातात व का?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
    यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. ३ पृ. १४-१५

तुमचा विश्‍वास तुम्ही बायबलमधून पडताळून पाहाल का?

तु म्ही एक ख्रिस्ती आहात का? तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर तुम्ही पूर्ण जगभरात असणाऱ्‍या २०० कोटीपेक्षा जास्त लोकांमधून एक आहात. आज स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे हजारो पंथ आहेत. पण त्यांच्या शिकवणी आणि त्यांची मतं मात्र वेगवेगळी आहेत. त्यामुळे तुमचा विश्‍वासदेखील कदाचित इतर ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्‍यांपेक्षा वेगळा असू शकतो. पण तुमचा विश्‍वास काय आहे, याबद्दल एवढा विचार करायला हवा का? हो, कारण तुमची ओळख असे ख्रिस्ती म्हणून असायला हवी ज्यांचा विश्‍वास बायबलवर आधारित आहे.

पहिल्या शतकातील येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना “ख्रिस्ती” म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. (प्रेषितांची कृत्ये ११:२६) त्यांना दुसऱ्‍या कुठल्या नावाची गरज नव्हती कारण त्या वेळी फक्‍त एकच ख्रिस्ती विश्‍वास होता. सर्व ख्रिस्ती लोक एकजुटीने ख्रिस्ती विश्‍वासाची स्थापना करणाऱ्‍या येशूच्या शिकवणींचं आणि मार्गदर्शनाचं पालन करायचे. तुमच्या चर्चमध्येसुद्धा असंच केलं जातं का? येशूने जे शिकवलं आणि पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोकांचा ज्या गोष्टींवर विश्‍वास होता, तुम्हीसुद्धा त्याच गोष्टींवर विश्‍वास करता का? तुमचाही तोच विश्‍वास आहे, याची तुम्ही खात्री कशी करून घेऊ शकता? याचा एकच योग्य मार्ग म्हणजे आपला विश्‍वास बायबलमधून पडताळून पाहणं.

यावर विचार करा: शास्त्रवचनं देवाकडून प्रेरित असल्यामुळे येशू ख्रिस्ताला त्यांच्याविषयी गाढ आदर होता. माणसांनी बनवलेल्या परंपरांना जास्त महत्त्व देऊन, बायबलमधल्या शिकवणींना हलकं मानणारे लोक येशूला पसंत नव्हते. (मार्क ७:९-१३) म्हणूनच येशूच्या खऱ्‍या शिष्यांचा विश्‍वास बायबलवर आधारित असायला हवा. यामुळे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीने स्वतःला प्रश्‍न विचारायला हवा, ‘माझ्या चर्चमध्ये जे शिकवलं जातं ते बायबलवर आधारित आहे का?’ या प्रश्‍नाचं उत्तर मिळवायचं असेल तर आपण आपल्या चर्चच्या शिकवणींना बायबलमधून पडताळून पाहायला नको का?

आपण देवाची करत असलेली उपासना बायबल सत्यावर आधारित असली पाहिजे असं येशूने म्हटलं. (योहान ४:२४; १७:१७) तसंच, सत्याचं “परिपूर्ण [अचूक]” ज्ञान मिळवलं तरच आपलं तारण होईल, असं प्रेषित पौलाने म्हटलं. (१ तीमथ्य २:४) त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपला विश्‍वास अचूक बायबल सत्यावर आधारित असला पाहिजे. कारण आपलं तारण सर्वस्वी त्यावर अवलंबून आहे.

आपण आपला विश्‍वास बायबलमधून कसा पडताळून पाहू शकतो?

खाली दिलेले सहा प्रश्‍न वाचा आणि बायबलमध्ये त्यांची काय उत्तरं दिली आहेत तेसुद्धा पाहा. दिलेली वचनं बायबलमधून पाहा आणि त्यात दिलेल्या उत्तरांवर विचार करा. मग स्वतःला विचारा, ‘माझ्या चर्चच्या शिकवणी बायबलमध्ये जे लिहिलं आहे त्याप्रमाणे आहेत का?’

हे सहा प्रश्‍न तुम्हाला सर्वात महत्त्वाची तुलना करण्यास मदत करतील. तुमच्या चर्चमधील इतर शिकवणींसुद्धा तुम्ही बायबलमधून पडताळून बघायला तयार आहात का? तुम्हाला बायबलमधील सत्याचं परीक्षण करण्यास मदत करायला यहोवाच्या साक्षीदारांना आनंद होईल. तुम्ही एखाद्या यहोवाच्या साक्षीदाराला तुमच्यासोबत मोफत बायबल अभ्यास करायला सांगू शकता किंवा jw.org/mr या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. (wp16-E No. 4)

१ प्रश्‍न: देव कोण आहे?

उत्तर: यहोवा. जो येशूचा पिता आहे. तो सनातन देव, सर्वशक्‍तिमान निर्माणकर्ता आहे ज्याने सर्व काही निर्माण केलं.

बायबल काय म्हणते:

“आम्ही सर्वदा आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकारस्तुती करतो.”—कलस्सैकर १:३.

“तू, तूच मात्र यहोवा आहेस, तू आकाशे, आकाशांची आकाशे त्यांच्या सर्व सैन्यासुद्धा निर्माण केली आहेस, पृथ्वी व ज्या सर्व वस्तू तिच्यावर आहेत त्या, समुद्र व त्यातले सर्व काही तू केले, व ती सर्व तू वाचावतोस व आकाशांचे सैन्य तुला नमन करते.”—नहेम्या ९:६. पं.र.भा

योएल २:३२; १ तीमथ्य १:१७ ही वचनंदेखील पाहा.

२ प्रश्‍न: येशू ख्रिस्त कोण आहे?

उत्तर: येशू देवाचा ज्येष्ठ पुत्र आहे ज्याला त्याने सर्व सृष्टी निर्माण करण्याआधी घडवलं. येशूला घडवण्यात आलं यावरून कळतं की त्याच्या जीवनाला सुरुवात होती. तो देवाच्या अधीन राहतो आणि देवाची इच्छा पूर्ण करतो.

बायबल काय म्हणते:

“माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.”—योहान १४:२८.

“तो [येशू] अदृश्‍य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.”—कलस्सैकर १:१५.

मत्तय २६:३९; १ करिंथकर १५:२८ ही वचनंदेखील पाहा.

३ प्रश्‍न: पवित्र आत्मा काय आहे?

उत्तर: पवित्र आत्मा देवाची क्रियाशील शक्‍ती आहे जिचा वापर देव आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी करतो. ती एक व्यक्‍ती नाही. जेव्हा पवित्र आत्मा लोकांवर येतो तेव्हा देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना सामर्थ्य मिळतं.

बायबल काय म्हणते:

“अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.”—लूक १:४१.

“पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल.”—प्रेषितांची कृत्ये १:८.

उत्पत्ति १:२; प्रेषितांची कृत्ये २:१-४; १०:३८ ही वचनंदेखील पाहा.

४ प्रश्‍न: देवाचे राज्य काय आहे?

उत्तर: देवाचे राज्य स्वर्गीय सरकार आहे. येशू या देवाच्या राज्याचा राजा आहे. हे राज्य लवकरच संपूर्ण पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करेल.

बायबल काय म्हणते:

“सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गातून मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या: जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करेल.”—प्रकटीकरण ११:१५.

दानीएल २:४४; मत्तय ६:९, १० ही वचनंदेखील पाहा.

५ प्रश्‍न: सर्व चांगले लोक स्वर्गात जातात का?

उत्तर: नाही. फक्‍त देवाने निवडलेल्या विश्‍वासू लोकांचा एक छोटा गट ज्याला ‘लहान कळप’ म्हणतात स्वर्गात जाणार आहे. या गटातील लोक येशूसोबत मानवजातीवर राजे म्हणून राज्य करतील.

बायबल काय म्हणते:

“हे लहान कळपा, भिऊ नको; कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे.”—लूक १२:३२.

“ते देवाचे व ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर  . . . राज्य करतील.”—प्रकटीकरण २०:६.

प्रकटीकरण १४:१, ३ ही वचनंदेखील पाहा.

६ प्रश्‍न: पृथ्वीसाठी आणि मानवजातीसाठी देवाचा काय उद्देश आहे?

उत्तर: देवाच्या राज्यात पृथ्वी नंदनवन बनेल आणि विश्‍वासू लोकांना परिपूर्ण आरोग्य मिळेल, कायम टिकणारी शांती उपभोगता येईल आणि सार्वकालिक जीवन मिळेल.

बायबल काय म्हणते:

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.

“तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल; यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४. 

स्तोत्र ३७:२९; २ पेत्र ३:१३ ही वचनंदेखील पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा