वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ११/१५ पृ. २-४
  • तारण मिळण्याची काही आशा आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारण मिळण्याची काही आशा आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • “तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • तारण—याचा खरा अर्थ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तारणासाठी जाहीर घोषणा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • येशूमुळे तारण कसं मिळतं?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ११/१५ पृ. २-४

तारण मिळण्याची काही आशा आहे का?

विसावे शतक, मानवजातीला माहीत असलेल्या शतकांपैकी सर्वात रक्‍तरंजित शतक समजले जाते. गेल्या काही दशकांमध्ये तर, गुन्हेगारी, युद्धे, जातीय झगडे, मादक औषधांचा दुरुपयोग, बेईमानी, हिंसा या गोष्टी अगदीच सामान्य झाल्या आहेत. आजारपण, म्हातारपण, मृत्यू यांमुळे दुःख आणि पीडा आणखीनच वाढली आहे. जगातील या असंख्य समस्यांतून सुटका मिळावी असे कोणाला वाटणार नाही? भवितव्यात तारण मिळण्याची काही आशा आहे का?

सुमारे २००० वर्षांपूर्वी प्रेषित योहानाला देण्यात आलेल्या दृष्टान्तावर जरा विचार करा. त्याविषयी त्याने लिहिले: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) संदेष्टा यशयाने देखील काहीसे असेच भाकीत केले: “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुशितो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करितो, कारण परमेश्‍वर हे बोलला आहे.”—यशया २५:८.

देवाने दिलेल्या या अभिवचनांचा काय अर्थ होईल याची कल्पना करा! मानवजातीला, जुलूम, हिंसा आणि दुःख व पीडा देणाऱ्‍या गोष्टींपासून कायमचे मुक्‍त केले जाईल. एवढेच नव्हे तर, आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांपासूनसुद्धा तिची सुटका होईल! देवाचे वचन बायबल, पृथ्वीवर परिपूर्ण परिस्थितीतील सार्वकालिक जीवनाचे वचन देते. (लूक २३:४३; योहान १७:३) हे जीवन ज्यांना हवे त्या सर्वांना मिळू शकते. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे” अशी देवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:३, ४.

परंतु, देवाच्या अभिवचनांतून आपल्याला लाभ मिळवून घ्यायचा असेल तर, आपल्या तारणाच्या संबंधाने येशूची काय भूमिका होती हे आपण समजून घेऊन त्याच्यावर विश्‍वास ठेवला पाहिजे. येशू स्वतःबद्दल असे म्हणाला होता: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) या बाबतीत येशू ख्रिस्ताच्या प्रमुख भूमिकेकडे अंगुली दर्शवत प्रेषित पेत्राने असे म्हटले, की: “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रेषितांची कृत्ये ४:१२) प्रेषित पौल आणि त्याचा सहकारी सीला यांना, तारण मिळवण्यासाठी मी काय करावे असे एका प्रामाणिक अंतःकरणाच्या मनुष्याने विचारले तेव्हा त्यांनी त्याला सांगितले, की: “प्रभू येशूवर विश्‍वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.”—प्रेषितांची कृत्ये १६:३०, ३१.

होय, येशू ख्रिस्त हा ‘जीवनाचा अधिपती’ आहे आणि तारण केवळ त्याच्याद्वारेच मिळू शकते. (प्रेषितांची कृत्ये ३:१५) पण, केवळ एकच मनुष्य आपल्या सर्वांना तारण मिळवून देण्यात प्रमुख कसा होऊ शकतो? या बाबतीत त्याची काय भूमिका आहे याबद्दलची स्पष्ट समज घेतल्यावर तारणाच्या आशेवरील आपला भरवसा आणखी पक्का झाला पाहिजे.

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

पृष्ठ ३: बॉम्बफेकी विमाने: USAF photo; उपाशी मुले: UNITED NATIONS/J. FRAND; जळती युद्धनौका: U.S. Navy photo

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा