वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. ३-४
  • ह्‍या सर्वांमागे कोण आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ह्‍या सर्वांमागे कोण आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा—कोण आहे?
    यहोवा—कोण आहे?
  • मुलाखत एका जीवरसायनशास्त्रज्ञाशी
    सावध राहा!—२००६
  • आम्हाला कोण सांगू शकतो?
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • कौतुकाने रचना पाहा रचनाकाराला जाणा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. ३-४

ह्‍या सर्वांमागे कोण आहे?

कंबोडियाच्या जंगलातून मार्ग काढत हेन्री मूओ, हा १९ व्या शतकातील फ्रेंच शोधक एका रुंद खंदकाजवळ येऊन पोहंचला जे एका मंदिराच्या सभोवती खोदले होते. तो उभा होता तेथून सुमारे एक किलोमीटरवर, ६० मीटर उंच असलेली मंदिराची पाच शिखरे आकाशाला भिडू पाहत होती. ते पृथ्वीवरील सर्वात भव्य अंकोर वात मंदिर होते. मूओने त्याचा शोध लावण्याआधी सात शतकांपासून ते ऊन, वारा, पाऊस झेलत तेथे उभे होते.

मूओ त्याला पाहिल्या पाहिल्या सांगू शकला, की शेवाळ्यांनी झाकलेले हे बांधकाम मानवी हातांनी निर्माण झाले होते. “कोणा प्राचीन मायकेलॲन्जेलोद्वारा उभारलेली ही कलाकृती ग्रीस किंवा रोमच्या कोणत्याही वास्तुशैलीपेक्षा भव्य आहे” असे त्यांनी लिहिले. शतकांपासून ते असे विराण पडलेले असले तरी, या सुंदर कलाकृतीमागे एक रचनाकार होता याबद्दल त्यांच्या मनात कोणतीच शंका नव्हती.

आपल्या सभोवतालचे हे जग एका रचनाकाराने निर्माण केले असावे याचे स्पष्टीकरण देण्याकरता अशाच प्रकारचा तर्क अनेक शतकांआधी लिहिलेले सुज्ञता असलेले एक पुस्तक करते, ही एक लक्षवेधक गोष्ट आहे. हे जग निर्माण करण्यात आले आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) काहींना ही समानता पटणार नाही, ते म्हणतील: ‘निसर्गाची कार्ये मानव-निर्मित कार्यांपेक्षा वेगळी आहेत.’ परंतु, सर्वच शास्त्रज्ञांना ही तुलना मान्य नाही. “जीवरासायनिक संस्था निर्जीव वस्तू नाहीत,” असे कबूल केल्यावर लीहाय युनिव्हर्सिटीत जीवरसायनशास्त्राचे सहकारी प्राध्यापक मायकल बीही विचारतात: “जिवंत जीवरासायनिक संस्थांना बुद्धिमानीरीतीने रचले जाऊ शकते का?” ते पुढे दाखवून देतात, की जननिक इंजिनियरींग सारख्या पद्धतींद्वारे शास्त्रज्ञ आता सजीवांमध्ये मूलभूत बदल रचत आहेत. स्पष्टतः, निर्जीव आणि सजीव वस्तूंची रचना करता येते व ते योजताही येतात! बीही, जिवंत पेशींच्या सूक्ष्म जगात शिरून, कार्य करण्याकरता एकमेकांवर अवलंबून असलेल्या घटकांच्या मिळून बनलेल्या आश्‍चर्यकारक जटिल संस्थांची चर्चा करतात. त्यांचा निष्कर्ष? “रैणवीय स्थराला जाऊन जीवनाचा तपास करण्याकरता म्हणजे पेशीचा बारकाईने तपास करण्याकरता केलेल्या या संकलित प्रयत्नांचा परिणाम स्पष्टपणे दाखवून देतो की पेशी, ही एक ‘रचना’ आहे!”

विश्‍वरचनाशास्त्रज्ञ आणि भौतिकीविज्ञ यांनी देखील जग आणि विश्‍व यांचे अगदी जवळून परीक्षण केले आहे व त्यांना काही विस्मयकारक वस्तुस्थिती आढळल्या आहेत. उदाहरणार्थ, त्यांना आता माहीत झाले आहे, की कोणत्याही विश्‍वस्थिरांकांच्या प्रमाणात अत्यल्प जरी बदल झाला असता तरी हे विश्‍व निर्जीव झाले असते.a विश्‍वरचनाशास्त्रज्ञ ब्रॅन्डन कार्टर यांनी या वस्तुस्थितींना विस्मयजनक योगायोग असे संबोधले. पण तुम्हाला जर एक गूढ, आंतरसंयोग योगायोगांची एक मालिकाच दिसू लागली तर कोणीतरी या योगायोगांच्या मागे निश्‍चित असेल अशी पुसटशी शंका तुमच्या मनाला चाटून जाणार नाही का?

होय, या सर्व जटिल संस्थांमागे व नीट लावलेल्या “योगायोगांमागे” एक रचनाकार नक्कीच आहे. तो कोण आहे? प्राध्यापक बीही कबूल करतात, की “वैज्ञानिक पद्धतींद्वारे रचनाकाराची ओळख काढणे कदाचित खूपच कठीण असेल;” पण “तत्त्वज्ञान आणि वेदान्तशास्त्र” कदाचित या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून ते त्यांच्यावर हा प्रश्‍न सोपवतात. कदाचित तुम्हाला स्वतःला वाटेल, की तो प्रश्‍न तुमच्यासाठी विषयाला सोडून आहे. परंतु, समजा तुम्हाला नेमके जे हवे आहे त्याच गोष्टी असलेले व छानपैकी वेष्टन घातलेले एक पुडके तुम्हाला मिळते तेव्हा, ते तुम्हाला कोणी पाठवले असावे हे तुम्ही जाणू इच्छिणार नाही का?

आपल्यालासुद्धा, असेच एक पुडके मिळाले आहे; म्हणजे, आपल्याला जगण्याकरता व जीवनाचा आस्वाद घेण्यास शक्य करणाऱ्‍या सुंदर सुंदर बक्षिसांनी भरलेले पुडके. ते पुडके आहे ही पृथ्वी; जीवन टिकवण्याकरता आवश्‍यक असणाऱ्‍या सर्व उल्लेखनीय व्यवस्था असलेली ही पृथ्वी. ही बक्षिसे आपल्याला कोणी दिली हे आपण जाणू इच्छिणार नाही का?

आनंदाची गोष्ट म्हणजे, हे पुडके पाठवणाऱ्‍याने सोबत एक चिठ्ठी पाठवली आहे. आधी ज्या पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला होता ते सुज्ञता असलेले प्राचीन पुस्तक बायबल म्हणजे ती “चिठ्ठी” होय. आपल्याला ते पुडके कोणी दिले या प्रश्‍नाचे उत्तर विलक्षण सरळतेने व स्पष्टपणे बायबलच्या सुरवातीच्या शब्दात दिले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.”—उत्पत्ति १:१.

त्या ‘चिठ्ठीत’ निर्माणकर्ता स्वतःचे नाव सांगून आपली ओळख देतो: “आकाश निर्माण करून . . . पृथ्वीचा व तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांना श्‍वास देणारा . . . खरा देव यहोवा असे म्हणतो.” (यशया ४२:५, NW) होय, विश्‍व बनवणारा आणि पृथ्वीवरील पुरुष आणि स्त्रियांना निर्माण करणाऱ्‍या देवाचे नाव यहोवा आहे. पण यहोवा आहे तरी कोण? तो कसा आहे? आणि पृथ्वीवरील सर्व लोकांनी त्याचे ऐकणे अगत्याचे का आहे?

[तळटीप]

a “स्थिरांक” असे प्रमाण आहेत ज्यांचे अख्ख्या विश्‍वात बदल होत नसतात. यांची दोन उदाहरणे, प्रकाशाची गती आणि गुरुत्वाकर्षणाचा वस्तुमानाशी असलेला संबंध, ही आहेत.

[३ पानांवरील चित्र]

अंकोर वात मानवी हातांची एक कलाकृती

[४ पानांवरील चित्र]

तुम्हाला एखादे बक्षीस मिळते तेव्हा ते कोणी पाठवले हे तुम्ही जाणू इच्छिणार नाही का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा