वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१५ पृ. ३०-३१
  • वाचकांचे प्रश्‍न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वाचकांचे प्रश्‍न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • आम्ही तुमच्याबरोबर येऊ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • प्रभूच्या सांज भोजनाचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “आम्ही तुम्हाबरोबर येतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • आत्मा “अंतःकरणाला” साक्ष देतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१५ पृ. ३०-३१

वाचकांचे प्रश्‍न

स्मारक विधीच्या बोधचिन्हांचा भाग घेणाऱ्‍यांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे असे काही वर्षांपासूनचे अहवाल दाखवतात. यावरून, अनेक नवीन जण आत्म्याने अभिषिक्‍त होत आहेत असे सूचित होते का?

अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची १,४४,००० ही संख्या अनेक दशकांपूर्वीच पूर्ण झाली होती असे समजण्यास सबळ कारण आहे.

प्रेषितांची कृत्ये २:१-४ येथे आपण या मर्यादित गटातील पहिल्या सदस्यांबाबत वाचतो: “नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्‍नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना, अकस्मात मोठ्या वाऱ्‍याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.”

यानंतर, यहोवाने इतरांना निवडले व अशांना आपल्या पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त केले. त्यांमध्ये, ख्रिस्ती विश्‍वासाच्या अगदी सुरवातीच्या वर्षांत सहस्त्रावधींची भर पडली. आपल्या काळात स्मारक विधी पाळला जातो तेव्हा वक्‍ते अनेकदा रोमकर ८:१५-१७ या वचनात नमूद केलेल्या प्रेषित पौलाच्या शब्दांकडे आपले लक्ष वेधतात; यात अभिषिक्‍तांना ‘दत्तकपणाचा आत्मा मिळतो’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांना मिळालेला आत्मा ‘स्वतः त्यांच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, ती देवाची मुले, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस आहेत,’ असेही पौलाने पुढे म्हटले. जे लोक खरोखर अशाप्रकारे आत्म्याने अभिषिक्‍त होतात त्यांना याबद्दल खात्री असते. ही निव्वळ एक इच्छा किंवा स्वतःबद्दल एका भावनाप्रधान व अवास्तव अशा दृष्टिकोनातून उमटलेला पडसाद नव्हे.

हे स्वर्गीय पाचारण शतकानुशतके चालत आले आहे असा आपला समज आहे; तथापि तथाकथित तमोयुगादरम्यान, काही काळांत अभिषिक्‍त लोकांची संख्या अत्यल्प असण्याची शक्यता आहे.a गत शतकाच्या शेवटास ख्रिस्ती विश्‍वासाची पुनःस्थापना झाल्यापासून आणखी लोकांना पाचारण्यात व निवडण्यात आले. परंतु, असे दिसते की १९३० या दशकाच्या मध्यात १,४४,००० चा पूर्णांक मुळात गाठण्यात आला होता. यामुळे पृथ्वीवरील जीवनाची आशा बाळगणाऱ्‍या एकनिष्ठ ख्रिश्‍चनांचा एक गट प्रकट होऊ लागला. येशूने, अभिषिक्‍त जणांसोबत एक अनुमोदित कळप या नात्याने उपासना करण्यात सहभागी होणाऱ्‍या या लोकांना “दुसरी मेंढरे” म्हणून संबोधले.—योहान १०:१४-१६.

गत दशकांतील पुरावे, अभिषिक्‍तांच्या पाचारणाच्या पूर्णतेवर व ‘मोठ्या संकटातून’ बचावण्याची आशा बाळगणाऱ्‍या वाढत्या ‘मोठ्या लोकसमुदायास’ प्राप्त होणाऱ्‍या यहोवाच्या आशीर्वादावर प्रकाश टाकतात. (प्रकटीकरण ७:९, १४) उदाहरणार्थ, १९३५ साली ६३,१४६ लोक उपस्थित राहिलेल्या स्मारकविधीत, अभिषिक्‍त असण्याच्या त्यांच्या दाव्याच्या पुराव्यादाखल बोधचिन्हे सेवन करण्यात सहभागी होणाऱ्‍यांची संख्या ५२,४६५ एवढी भरली. तीस वर्षे उलटल्यावर किंवा दुसऱ्‍या शब्दांत बोलायचे झाल्यास १९६५ साली, उपस्थिती ही १९,३३,०८९ एवढी होती, मात्र सहभाग घेणाऱ्‍यांची संख्या ११,५५० पर्यंत घसरली. आणखी ३० वर्षे पुढे गेल्यावर, १९९५ साली उपस्थितीत वाढ होऊन ती १,३१,४७,२०१ एवढी झाली, तथापि केवळ ८,६४५ जणांनीच भाकरी व द्राक्षारस घेण्यात सहभाग घेतला. (१ करिंथकर ११:२३-२६) स्पष्टपणे, जसजशी दशके उलटत गेली तसतशी, शेष जणांपैकी असण्याचा दावा करणाऱ्‍यांची संख्या अतिशय कमी झाली—स्थूलमानाने १९३५ मध्ये ५२,४००; १९६५ मध्ये ११,५००; १९९५ मध्ये ८,६००. तथापि, पृथ्वीवरील आशा बाळगणारे आशीर्वादित झाले आहेत व त्यांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली आहे.

सर्वात अलीकडील अहवाल १९९५ या वर्षाचा आहे व तो गत वर्षापेक्षा २८ सहभागी वाढले असल्याचे दाखवतो; पण सहभागी होणारे व उपस्थित राहणारे यांचे गुणोत्तर खरे तर कमी झाले. हे सर्व विचारात घेता, बोधचिन्हांत नेहमीपेक्षा आणखी थोड्या जणांनी सहभाग घेतला ही चिंतेची बाब नाही. गत वर्षांमध्ये, काहींनी व काहीवेळा तर नवीनच बाप्तिस्मा झालेल्यांनी देखील अचानक सहभागी होण्याचे सुरू केले असे आढळले. पुष्कळ उदाहरणांत, या लोकांनी त्यांचे चुकले असल्याचे कालांतराने कबूल केले. काहींना जाणीव झाली, की त्यांनी शारीरिक अथवा मानसिक दबावाच्या भावनिक प्रतिक्रियेमुळे सहभाग घेतला होता. तथापि, त्यांना खरे तर स्वर्गीय जीवनाचे पाचारण झाले नव्हते हे शेवटी त्यांच्या लक्षात आले. देवाने त्यांना दयाळुपणे समजून घ्यावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली. तसेच ते पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा बाळगणारे उत्तम, एकनिष्ठ ख्रिश्‍चन या नात्याने देवाची सेवा करतच आहेत.

एखाद्याने बोधचिन्हे घेण्यात सहभागी होण्याचे सुरू केल्यास किंवा असे करण्याचे थांबवल्यास आपल्याला विवंचनेत पडण्याचे काहीएक कारण नाही. कोणी पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त होऊन खरोखर स्वर्गीय जीवनासाठी पाचारण्यात आला आहे किंवा नाही हे ठरवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही. येशूच्या खात्रीलायक आश्‍वासनाची आठवण करा: “मी उत्तम मेंढपाळ आहे . . . जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो.” तेवढ्याच खात्रीलायकपणे, यहोवा देखील, त्याने आध्यात्मिक पुत्र म्हणून निवडलेल्यांना ओळखतो. वृद्धावस्था व अनपेक्षित दुर्घटना यांमुळे अभिषिक्‍त लोकांचे पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येते तसतशी त्यांची संख्या घटत राहील यात काही शंका नाही. तर मग, हे खरोखर अभिषिक्‍त असलेले लोक आमरण विश्‍वासू राहून जीवनाच्या मुकुटाची आस धरतात; त्याच प्रकारे, कोकऱ्‍याच्या रक्‍तात आपले वस्त्र धुतलेली दुसरी मेंढरे देखील, येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचावण्याची अपेक्षा करू शकतात.—२ तीमथ्य ४:६-८; प्रकटीकरण २:१०.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) मार्च १५, १९६५ या अंकातील पृष्ठे १९१-२ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा