वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 २/१५ पृ. १३-१८
  • आता आणि सदासर्वकाळासाठी आनंदी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आता आणि सदासर्वकाळासाठी आनंदी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या काळातील पूर्णता
  • तुम्ही त्या पूर्णतेचे भाग आहात का?
  • एक पूर्णता अद्यापही पुढे होणे आहे!
  • आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवा आपल्याला आनंदाने त्याची सेवा करत राहायला कशी मदत करतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • “हा मी आहे! मला पाठीव” असे तुम्ही म्हणाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 २/१५ पृ. १३-१८

आता आणि सदासर्वकाळासाठी आनंदी

“जे मी उत्पन्‍न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व उल्लास पावा; पाहा मी यरुशलेम उल्लासमय तिचे लोक आनंदमय करितो.”—यशया ६५:१८.

१. अनेक शतकांपासून लोकांवर खऱ्‍या उपासनेचा कसा परिणाम झाला आहे?

शतकांपासून, खरा देव यहोवाची सेवा करणाऱ्‍या अगणित लोकांना विपुल आनंद प्राप्त झाला आहे. त्या असंख्य लोकांपैकी एक दावीद होता जो खऱ्‍या उपासनेत आनंदी होता. कराराचा कोश जेरूसलेममध्ये आणला जात होता तेव्हा “दाविदाने व सर्व इस्राएल लोकांनी परमेश्‍वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकीत वर आणिला,” असे बायबल कथन करते. (२ शमुवेल ६:१५) यहोवाची सेवा करण्यामध्ये अशा प्रकारचा आनंद गत काळातील एक साधारण गोष्ट नाही. तुम्हीही त्यात सहभाग घेऊ शकता. शिवाय, आता सुद्धा तुम्ही नवनव्या आनंदाचे वाटेकरी होऊ शकता!

२. परतलेल्या यहुद्यांविषयी यशयाच्या ३५ व्या अध्यायातील पहिल्या पूर्णतेव्यतिरिक्‍त आणखी एका पूर्णतेमध्ये आज कोण गोवलेले आहेत?

२ यशयाच्या ३५ व्या अध्यायातील उत्तेजक भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेचे परीक्षण आपण मागील लेखात केले. आपण या भविष्यवाणीला उचितपणे पुनर्स्थापित भविष्यवाणी असे संबोधू शकतो कारण प्राचीन यहुद्यांसाठी तिचा तोच अर्थ झाला. आपल्या काळात देखील तिची पूर्णता त्याचप्रकारची आहे. ते कसे? त्याचे असे आहे, की सा. यु. पेन्टेकॉस्ट ३३ मधील येशूचे शिष्य आणि इतरांपासून सुरवात करून यहोवा आध्यात्मिक इस्राएलांबरोबर व्यवहार करीत आला आहे. हे देवाच्या आत्म्याने अभिषिक्‍त झालेले मानव आहेत जे, प्रेषित पौलाने ज्याला ‘देवाचे इस्राएल’ म्हटले त्याचा भाग होतात. (गलतीकर ६:१६; रोमकर ८:१५-१७) तसेच, १ पेत्र २:९ मध्ये या ख्रिश्‍चनांना “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” असे संबोधले आहे याची देखील आठवण करा. पुढे पेत्र आध्यात्मिक इस्राएलला दिलेल्या नेमणुकीची ओळख देतो: “ज्याने तुम्हांस अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.”

आपल्या काळातील पूर्णता

३, ४. यशयाच्या ३४ अध्यायाची आधुनिक दिवसात पूर्णता झाली तेव्हा कोणती परिस्थिती होती?

३ या शतकामध्ये असा एक काळ होता जेव्हा पृथ्वीवरील आध्यात्मिक इस्राएलचा शेष, सुसंगतपणे, अशा प्रकारच्या संदेशाची घोषणा करण्यात सक्रिय नव्हता. ते देवाच्या “अद्‌भुत प्रकाशात” पूर्णपणे आनंद करीत नव्हते. वास्तविक पाहता, ते पुष्कळ प्रमाणात काळोखात होते. ते केव्हा? आणि यहोवा देवाने त्याविषयी काय केले?

४ सन १९१४ मध्ये स्वर्गात देवाच्या मशीही राज्याची स्थापना झाली तेव्हा म्हणजे, पहिल्या जागतिक महायुद्धाचा तो काळ होता. विविध राष्ट्रांतील चर्चमधील पाळकांच्या पाठिंब्याने राष्ट्रे, एकमेकांवर क्रोधाविष्ट झाली होती. (प्रकटीकरण ११:१७, १८) अर्थातच, देव ज्याप्रमाणे ताठ मानेच्या एदोम राष्ट्राच्या विरोधात होता त्याचप्रमाणे उच्च प्रतिष्ठित पाळकवर्गासोबत धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगताच्या देखील तो विरोधात होता. यास्तव, प्रतिनमुनेदार एदोम म्हणजेच ख्रिस्ती धर्मजगत, यशयाच्या ३४ व्या अध्यायाची आधुनिक दिवसातील पूर्णता जाणण्याच्या मार्गावर आहे. कायमचा उच्छेद करण्याद्वारे ही पूर्णता तितकीच निश्‍चित आहे जितकी प्राचीन एदोमविरुद्धची पहिली पूर्णता झाली होती.—प्रकटीकरण १८:४-८, १९-२१.

५. यशयाच्या ३५ व्या अध्यायाची कोणत्या प्रकारची पूर्णता आपल्या काळात झाली आहे?

५ आनंदावर अधिक भर देणाऱ्‍या ३५ व्या अध्यायातील यशयाच्या भविष्यवाणीविषयी काय? ती देखील आपल्या काळामध्ये पूर्ण झाली आहे. कसे बरे? ती बंदिवासाच्या एका प्रकारापासून आध्यात्मिक इस्राएलच्या पुनर्स्थापनेपर्यंत पूर्ण झाली आहे. तेव्हा, जिवंत असलेल्या अनेकांच्या आयुष्यात घडणारा अलीकडचा ईश्‍वरशासित इतिहास म्हणजे नक्की काय आहे याच्या वास्तविकतांचे आपण परीक्षण करू या.

६. आध्यात्मिक इस्राएलचा शेष बंदिवासासारख्या अवस्थेत आला असे का म्हणता येऊ शकते?

६ पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळादरम्यान अगदीच अल्प काळासाठी, आध्यात्मिक इस्राएलचा शेष देवाच्या इच्छेनुरूप पूर्णपणे शुद्ध आणि एकवाक्यतेत राहिला नव्हता. त्यांच्यातील काही जणांवर सिद्धांतिक चुकांबद्दल आणि संग्रामी राष्ट्रांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला तेव्हा ते यहोवाच्या बाजूने तटस्थ राहिले नाहीत म्हणून हातमिळवणी केल्याचा कलंक लागला होता. युद्धाच्या त्या काळादरम्यान, त्यांनी सर्व प्रकारचा छळ सहन केला, अनेक ठिकाणी तर त्यांच्या बायबल आधारित प्रकाशनांवर बंदी देखील आली. शेवटी, अधिक प्रामुख्य असलेल्या बांधवांना सिद्धापराधी ठरवून व खोटे आरोप लावून कारागृहात टाकण्यात आले. गत गोष्टींचा विचार करताना, एका अर्थाने देवाचे लोक स्वातंत्र्याऐवजी बंदिवासाच्या स्थितीत होते हे पाहण्यास आपल्याला कठीण वाटत नाही. (पडताळा योहान ८:३१, ३२.) त्यांच्यामध्ये गंभीरपणे आध्यात्मिक दृष्टीची उणीव होती. (इफिसकर १:१६-१८) देवाची स्तुती करण्यासाठी त्यांनी अगदीच मूकपणा दर्शवला ज्याचा परिणाम ते आध्यात्मिकरीत्या निष्फळ ठरले. (यशया ३२:३, ४; रोमकर १४:११; फिलिप्पैकर २:११) बॅबिलोनच्या दास्यत्वात असलेल्या प्राचीन यहुद्यांच्या स्थितीमध्ये आणि या स्थितीमध्ये तुम्हाला काही साम्य दिसून येते का?

७, ८. आधुनिक दिवसातील शेषांनी कोणत्या प्रकारच्या पुनर्स्थापनेचा अनुभव घेतला?

७ पण देव त्याच्या आधुनिक दिवसातील सेवकांना त्या स्थितीमध्ये सोडून देणार होता का? नाही, यशयाद्वारे जे काही भाकीत केले गेले त्यानुसार त्यांना पुनर्स्थापित करण्याचा त्याचा दृढनिश्‍चय होता. अशाच प्रकारे, आध्यात्मिक इस्राएलच्या शेषवर्गाला एका आध्यात्मिक परादीसमध्ये समृद्धता आणि स्वास्थ्य पुन्हा देऊन ३५ व्या अध्यायातील हीच भविष्यवाणी आपल्या दिवसांमध्ये वैविध्यरितीने पूर्ण होते. इब्रीयांस १२:१२ मध्ये, पौलाने यशया ३५:३ या वचनाला लाक्षणिकरीत्या लागू करून यशयाच्या या भविष्यवाणीच्या भागाचा आध्यात्मिक अवलंब करण्याच्या अचूकतेला पुष्टी दिली.

८ युद्धोत्तर काळामध्ये, आध्यात्मिक इस्राएलच्या अभिषिक्‍त जणांचा शेष जणू काय बंदिवासातून बाहेर आला. यहोवा देवाने, त्यांना मुक्‍त करण्यासाठी येशू ख्रिस्ताचा, महान कोरेशचा उपयोग केला. अशा प्रकारे हा शेष पुनर्बांधणीचे कार्य करू शकला, जो प्राचीन यहुद्यांचा शेषांच्या कार्याच्या तुल्य होता. हे यहुदी जेरूसलेममधील खरोखरच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी आपल्या मायदेशी परत गेले होते. पुढे, आधुनिक काळातील आध्यात्मिक इस्राएली हिरवेगार आध्यात्मिक परादीस, लाक्षणिक एदेन बागेची जोपासना व निर्मिती करण्यास सुरवात करू शकत होते.

९. यशया ३५:१, २, ५-७ मध्ये जे काही वर्णन केले आहे त्याची आमच्या काळात कशी वाढ झाली?

९ वरील गोष्टी ध्यानात ठेवून, आपण पुन्हा एकदा यशयाच्या ३५ व्या अध्यायाचा विचार करून १ आणि २ वचन पाहू या. एकेकाळी निर्जल असलेले क्षेत्र खरोखर मोहरू लागले व प्राचीन शारोनच्या मैदानासारखे सुपीक होऊ लागले. आता ५ ते ७ वचने पाहा. शेष जन, ज्यांपैकीचे काही जण अद्यापही हयात व यहोवाच्या सेवेत सक्रिय आहेत त्यांचे ज्ञानचक्षू उघडले. त्यांना, सन १९१४ मध्ये आणि त्यानंतर काय घडले ते उत्तमरीत्या दिसले. त्यामुळे शेषांसोबत सेवा करणारा “मोठा लोकसमुदाय,” जो आपल्यातील अनेकांचा मिळून बनलेला आहे त्यांच्यावर देखील याचा परिणाम झाला.—प्रकटीकरण ७:९.

तुम्ही त्या पूर्णतेचे भाग आहात का?

१०, ११. (अ) यशया ३५:५-७ च्या पूर्णतेत तुम्ही कसे गोवलेले आहात? (ब) या बदलांविषयी तुम्हाला व्यक्‍तिगतपणे कसे वाटते?

१० स्वतःचेच उदाहरण घ्या. यहोवाच्या साक्षीदारांच्या संपर्कात येण्याआधी तुम्ही नित्याने बायबल वाचत होतात का? जरी वाचत होता तरी, तुम्हाला कितपत ते समजत होते? उदाहरणार्थ, तुम्हाला आता मृतांच्या स्थितीविषयीचे सत्य माहीत आहे. या विषयावर आस्थेवाईक असलेल्या कोणाला तरी तुम्ही कदाचित या विषयाला धरून असलेला उत्पत्तिचा २ रा अध्याय, उपदेशकाचा ९ वा अध्याय आणि यहेज्केलाचा १८ वा अध्याय तसेच इतर अनेक शास्त्रवचने दाखवू शकता. होय, अनेक गोष्टींवर किंवा वादविषयांवर बायबल काय शिकवते ते तुम्हाला बहुधा समजते. सोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला बायबलचा अर्थ समजला आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे केले त्याप्रमाणे निःसंशय इतरांना त्याचा बहुतेक भाग समजावून सांगू शकता.

११ परंतु, आपण सर्वांनी स्वतःला विचारले पाहिजे, ‘बायबल सत्यांविषयी मला जे काही माहीत आहे ते सर्व मी कसे शिकलो? यहोवाच्या लोकांबरोबर अभ्यास करण्याआधी, आता सांगितलेली सर्व शास्त्रवचने मी लगेचच काढू शकलो का? मी त्यांचा पूर्णपणे अर्थ समजू शकलो का व त्यांच्या गर्भितार्थाबद्दल योग्य निष्कर्ष काढले का?’ या प्रश्‍नांचे सरळ उत्तर कदाचित, नाही असेच आहे. या विधानावर कोणीही आक्षेप घेऊ नये, पण या वचनांविषयी आणि त्यांच्या अर्थाविषयी तुम्ही मूलभूतपणे अंधळे होता असे म्हणता येऊ शकते. हो ना? ते बायबलमध्येच होते, पण तुम्ही त्यांना पाहू शकला नाही किंवा त्यांचे महत्त्व जाणू शकला नाही. मग आध्यात्मिकरीत्या तुमचे डोळे कसे उघडे झाले? अभिषिक्‍त शेषांसाठी यहोवाने यशया ३५:५ च्या पूर्णतेत जे केले त्याच्याद्वारे. त्यानंतर, तुमचे डोळे उघडले गेले. तुम्ही आता आध्यात्मिक अंधकारात नाही. तुम्ही आता पाहू शकता.—पडताळा प्रकटीकरण ३:१७, १८.

१२. (अ) चमत्कारिकपणे शारीरिकरीत्या बरे होण्याचा हा समय नाही असे आपण का म्हणू शकतो? (ब) कशाप्रकारे बंधू एफ. डब्ल्यू. फ्रान्झच्या उदाहरणाने आपल्या काळातील यशया ३५:५ च्या पूर्णतेला चित्रित केले?

१२ बायबल आणि अनेक शतकांपासून देवाच्या व्यवहारांच्या जागृत विद्यार्थ्यांना माहीत आहे की चमत्कारिकरीत्या शारीरिक बरे होण्यासाठी इतिहासातील हा काळ नव्हे. (१ करिंथकर १३:८-१०) यास्तव, येशू ख्रिस्त हा देवाचा संदेष्टा मशीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी तो अंधळ्यांचे नेत्र उघडेल अशी आपण अपेक्षा करत नाही. (योहान ९:१-७, ३०-३३) शिवाय तो सर्व बहिऱ्‍यांचेही कान उघडत नाही. अभिषिक्‍त व वॉच टावर संस्थेचे माजी अध्यक्ष असलेले फ्रेड्रिक डब्ल्यू. फ्रान्झ यांनी त्यांचे शतायुष गाठले तेव्हा ते जवळजवळ अंध झाले होते आणि त्यांना ऐकण्याचे साधन वापरावे लागत होते. काही वर्षांनंतर त्यांना दिसत नसल्यामुळे वाचता येत नव्हते; तरीही, यशया ३५:५ च्या अर्थाने त्यांना अंध किंवा बधिर असा कोण विचार करील? त्यांची अचूक आध्यात्मिक दृष्टी पृथ्वीवरील देवाच्या सर्व लोकांसाठी एक आशीर्वाद होती.

१३. देवाच्या आधुनिक दिवसातील लोकांनी कोणत्या प्रकारचा फेरबदल किंवा पुनर्स्थापना अनुभवली?

१३ किंवा तुमच्या जिव्हेविषयी काय? देवाच्या अभिषिक्‍त जणांना त्यांच्या आध्यात्मिक बंदिवासात मुके करण्यात आले असावे. पण देवाने त्यांच्या स्थितीचे रूपांतर केले तेव्हा देवाच्या स्थापित राज्याविषयी आणि भवितव्याबद्दलच्या त्याच्या अभिवचनांविषयी त्यांना जे काही माहीत होते त्यामुळे त्यांची जिव्हा आनंद करू लागली. तुमची जिव्हा मोकळी करण्यासाठी देखील त्यांनी तुम्हाला मदत केली असावी. गत काळात तुम्ही किती प्रमाणात इतरांशी बायबल सत्यांविषयी बोलला? कदाचित काही क्षणी तुम्ही असा विचार केला असेल, की ‘मला अभ्यास करायला आवडतो, पण परक्या लोकांशी मी जाऊन बोलणार नाही.’ परंतु “मुक्याची जीभ” आता ‘गजर करीत’ आहे ही गोष्ट खरी नाही का?—यशया ३५:६.

१४, १५. आपल्या काळातील अनेक जण कशाप्रकारे ‘पवित्र राजमार्गावर’ चालले आहेत?

१४ बॅबिलोनच्या बंदिवासातून मुक्‍त झालेल्या प्राचीन यहुद्यांना त्यांच्या मायदेशी परतण्यासाठी लांब प्रवास करावा लागला. त्याची साम्यता आपल्या काळातील कशासोबत होते? यशया ३५:८ पहा: “तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत.”

१५ अभिषिक्‍त शेष, आध्यात्मिक बंदिवासातून मुक्‍त झाल्यापासून, लाखो इतर मेंढरांसोबत मोठ्या बाबेलमधून निघून लाक्षणिक मार्गावर, आध्यात्मिक परादीसकडे नेणाऱ्‍या शुद्ध पवित्र राजमार्गावर आले आहेत. या पवित्र राजमार्गावर जाण्यास पात्र होण्यासाठी व त्यावरच राहण्यासाठी आम्ही हरतऱ्‍हेचे प्रयत्न करीत आहोत. स्वतःबद्दल विचार करा. तुम्ही आता ज्या नैतिक दर्जांनुरुप आणि तत्त्वांनुरुप जगता ते, तुम्ही जगत होता त्यापेक्षा उच्च नाहीत का? तुमचे विचार आणि तुमचे आचरण देवाच्या इच्छेनुरुप करण्यासाठी तुम्ही होता होईल तितका प्रयत्न करीत नाही का?—रोमकर ८:१२, १३; इफिसकर ४:२२-२४.

१६. पवित्र राजमार्गावर चालत असताना आपण कोणत्या प्रकारच्या परिस्थितींचा आनंद लुटू शकतो?

१६ या पवित्र राजमार्गावर चालत असताना, तुम्ही खरे पाहता पशूतुल्य मानवांच्या भीतीपासून मुक्‍त आहात. जगामधील लोभी किंवा द्वेषी लोक तुम्हाला लाक्षणिकपणे जिवंतच गिळंकृत करणार नाहीत यासाठी तुम्हाला जागृत राहावे लागते हे खरे आहे. इतरांसोबत व्यवहार करताना अनेक जण अतिशय लोभीपणा दाखवतात. पण देवाचे लोक यांच्या किती विरोधात आहेत! तेथे तुम्ही एका सुरक्षित वातावरणात आहात. अर्थात, तुमचे सहख्रिश्‍चन परिपूर्ण नाहीत; काहीवेळा एखादा चूक करतो किंवा तुमच्याविरुद्ध अपराध करतो. पण तुम्हाला माहीत आहे, की तुमचे बांधव तुम्हाला मुद्दाम इजा पोहंचवण्याचा किंवा तुम्हाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. (स्तोत्र ५७:४; यहेज्केल २२:२५; लूक २०:४५-४७; प्रेषितांची कृत्ये २०:२९; २ करिंथकर ११:१९, २०; गलतीकर ५:१५) उलट, ते तुमच्यामध्ये आस्था दाखवतात; त्यांनी तुम्हाला मदत केली आहे; ते तुमच्याबरोबर सेवा करू इच्छितात.

१७, १८. कोणत्या अर्थाने आता परादीस अस्तित्वात आहे व त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो?

१७ तेव्हा आपण यशयाच्या ३५ व्या अध्यायाकडे पाहून १ ते ८ वचनांच्या सद्य पूर्णतेला ध्यानात ठेवू शकतो. ज्याला उचितपणे आध्यात्मिक परादीस म्हटले आहे ते आपल्याला मिळाले आहे हे स्पष्ट नाही का? नाही, ते परिपूर्ण नाही—होय, अद्यापही नाही. पण ते खरोखर एक परादीस आहे कारण २ ऱ्‍या वचनात म्हटल्याप्रमाणे आपण “परमेश्‍वराचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्‍वर्य” आधीच पाहू शकतो. आणि त्याचा परिणाम काय झाला आहे? १० वे वचन म्हणते: “मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.” खरोखर, खोट्या धर्मांतून आपले बाहेर येणे आणि देवाच्या मर्जीनुसार खऱ्‍या उपासनेचा पाठलाग, आनंदाला प्रेरित करणारा आहे.

१८ खऱ्‍या उपासनेशी निगडित असलेला आनंद वाढतच राहतो, नाही का? नवोदितांना स्वतःमध्ये बदल करताना व बायबल सत्यांमध्ये प्रशिक्षित होत असताना तुम्ही पाहता. तुम्ही तरुणांना मोठे होत असताना व मंडळीमध्ये आध्यात्मिक प्रगती करताना पाहता. तुम्ही बाप्तिस्मा होत असताना पाहता जेथे तुमच्या ओळखीचे लोक बाप्तिस्मा घेतात. आज, आनंद, विपुल आनंद करण्यासाठी ही कारणे नव्हेत का? होय, आपल्या आध्यात्मिक परादीसमध्ये आणि परादीसमय परिस्थितीमध्ये इतरांनी सहभाग घ्यावा ही देखील केवढी आनंदविणारी गोष्ट आहे!

एक पूर्णता अद्यापही पुढे होणे आहे!

१९. यशयाचा ३५ वा अध्याय आपल्याला कोणत्या आशादायक अपेक्षेने भारावून टाकतो?

१९ आतापर्यंत आपण यशयाच्या ३५ व्या अध्यायाचा, यहुदी जेव्हा परतले तेव्हा झालेली पहिली पूर्णता आणि आज होत असलेली त्याची आध्यात्मिक पूर्णता याच्याविषयीचा विचार केला. पण सर्वकाही येथेच समाप्त होत नाही. पुढे आणखी पुष्कळ काही आहे. ती, पृथ्वीवर येणाऱ्‍या एका अक्षरार्थ परादीस परिस्थितीच्या पुनर्स्थापनेविषयी बायबलच्या खात्रीशी संबंधित आहे.—स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:४, ५.

२०, २१. यशयाच्या ३५ व्या अध्यायाची आणखी एक पूर्णता होईल असा विचार करणे तर्कशुद्ध आणि शास्त्रवचनानुसार का आहे?

२० आधी परादीसचे हुबेहूब वर्णन देऊन मग त्या गोष्टींची पूर्णता केवळ आध्यात्मिक गोष्टींपर्यंतच मर्यादित ठेवणे यहोवासाठी सुसंगत ठरणार नाही. अर्थात, यावरून असे म्हणायचे नाही, की आध्यात्मिक पूर्णता अर्थशून्य आहेत. जरी एक खरोखरचे परादीस स्थापण्यात आले तरी, मनोरम देखावा आणि शांतीपूर्ण प्राण्यांमध्ये राहताना आपल्या आजूबाजूला आध्यात्मिकरीत्या भ्रष्ट लोक, पशूप्रमाणे वागणारे पशूतुल्य मानव असले तर आपण समाधानी होणार नाही. (पडताळा तीत १:१२.) होय, आध्यात्मिक परादीस पहिल्यांदा आले पाहिजे कारण तेच सर्वात महत्त्वपूर्ण आहे.

२१ तरीदेखील, आपण आता ज्या आध्यात्मिक पैलूंचा आनंद लुटत आहोत व भवितव्यात लुटणार आहोत एवढ्यावरच येणारे परादीस समाप्त होत नाही. आपल्याकडे, यशयाच्या ३५ व्या अध्यायासारख्याच भविष्यवाणींच्या अक्षरशः पूर्णतांची अपेक्षा करण्याचे चांगले कारण आहे. का बरे? पहा, ६५ व्या अध्यायात यशयाने “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्याविषयी भाकीत केले. प्रेषित पेत्राने त्याच शास्त्रवचनाला यहोवाच्या दिवसानंतर काय होणार आहे त्याचे वर्णन करण्यासाठी लागू केले. (यशया ६५:१७, १८; २ पेत्र ३:१०-१३) यशयाने वर्णिलेले पैलू, “नवी पृथ्वी” एक वास्तविकता होईल तेव्हा अस्तित्वात येतील, असे पेत्र सूचित करत होता. त्यामध्ये तुम्हाला माहीत असलेले वर्णन जसे, की घरे बांधून त्यात राहणे; द्राक्षमळे लावून त्यांचा उपज खाणे; स्वतःच्या हातांनी केलेल्या कार्याचा दीर्घकाळ आनंद घेणे; लांडगा आणि कोकरे एकत्र राहणे; आणि संपूर्ण पृथ्वीवर कोणताही उपद्रव नसणे, समाविष्ट आहे. दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे, तर चिरकालिक जीवन, सुरक्षित घरे, विपुल अन्‍न, समाधान देणारे काम आणि प्राण्यांमध्ये तसेच प्राणी आणि मानवांमध्ये शांती.

२२, २३. यशयाच्या ३५ व्या अध्यायाच्या भावी पूर्णतेत आनंदासाठी कोणता आधार असेल?

२२ ह्‍या भवितव्यामुळे तुमचा आनंद उचंबळून येत नाही का? तो उचंबळून आला पाहिजे कारण देवाने आपल्याला त्याचप्रकारे जगण्याकरता निर्माण केले आहे. (उत्पत्ति २:७-९) तेव्हा, आपण विचार करत आहोत त्या यशयाच्या ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणीचा काय अर्थ होतो? त्याचा अर्थ असा होतो, की आपल्याकडे आनंदाने गजर करण्याची अधिक कारणे आहेत. खरोखरचे वाळवंट आणि निर्जल क्षेत्रे बहरतील, ज्यामुळे आपल्याला आनंद होईल. तेव्हा, निळ्या, तपकिरी, अथवा कोणतीही दुसरी आल्हाददायक छटा असलेले पण सध्या अंध असणारे डोळे पाहू लागतील. बधिर असलेले आपले सहख्रिस्ती किंवा ज्यांना ऐकण्याचा त्रास आहे अशांना स्पष्टपणे ऐकू येईल. देवाच्या वचनाचे वाचन व स्पष्टीकरण ऐकण्यास, वृक्षराजींतून झुळझुळणाऱ्‍या वाऱ्‍याचा आवाज, एखाद्या बाळाचे गोड हसणे व पक्षाचे मधुर गीत ऐकण्यासाठी त्या क्षमतेचा वापर करणे किती आनंदविणारे आहे!

२३ त्याचा अर्थ असाही होतो, की लंगडे आणि लुळे ज्यामध्ये संधिवाताने पीडित असलेल्यांचा देखील समावेश होतो, वेदनारहित चालू लागतील. केवढी ही मुक्‍तता! मग, खरोखरच्या पाण्यांचे लोंढे वाळवंटातून वाट करत खळाळून वाहतील. आपण उसळणारे पाणी पाहू व बुडबुड्यांचा आवाज ऐकू. आपण तेथे चालू शकू व हिरवेगार गवत आणि पपायरस वनस्पतींना स्पर्श करू शकू. ते खरोखर एक पुनर्स्थापित परादीस असेल. सिंह किंवा अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्याच्या शेजारी निर्धास्तपणे राहण्याच्या आनंदाबद्दल काय? आपल्याला त्याचे वर्णन देण्यास सुरवात करण्याची गरज नाही कारण आपण सर्वांनी त्या दृश्‍याची आधीच कल्पना करून आनंद लुटला आहे.

२४. तुम्ही यशया ३५:१० मधील अभिव्यक्‍तीशी सहमतात का होऊ शकता?

२४ यशया आपल्याला हमी देतो: “मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.” म्हणून, आनंदाने गजर करण्यासाठी आपल्याकडे कारण आहे हे आपण कबूल करू शकतो. आपल्या आध्यात्मिक परादीसमध्ये यहोवा आधीपासूनच त्याच्या लोकांसाठी जे काही करत आला आहे त्याबद्दल व नजीकच्या काळात खरोखरच्या परादीसमध्ये आपण कशाची अपेक्षा करू शकतो याबद्दल आनंद करू शकतो. आनंदी लोकांबद्दल—आपल्याबद्दल—यशया लिहितो: “ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.”—यशया ३५:१०.

तुम्ही याची नोंद घेतली का?

◻ यशया ३५ व्या अध्यायाची कोणती दुहेरी पूर्णता झाली?

◻ यशयाने भाकीत केलेल्या चमत्कारिक बदलांचे साम्य आध्यात्मिकरीत्या कशाशी होते?

◻ या भविष्यवाणीच्या पूर्णतेत तुम्ही कसा सहभाग घेतला आहे?

◻ यशयाचा ३५ व्या अध्यायामुळे आपल्याला भवितव्याची एक आशा मिळते असे आपण का म्हणू शकतो?

[१५ पानांवरील चित्रं]

जून १९१८ मध्ये सात प्रमुख बांधवांना ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील रेमंड स्ट्रीट जेल या कारागृहात टाकण्यात आले

[१६ पानांवरील चित्रं]

बंधू फ्रान्झच्या शेवटल्या वर्षांमध्ये ते जवळजवळ अंध झाले तरीदेखील त्यांची आध्यात्मिक दृष्टी जागृत राहिली

[१७ पानांवरील चित्रं]

आध्यात्मिक वाढ आणि प्रगती, ही आनंदाची कारणे आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा