राज्य घोषकांचा वृत्तान्त
‘जगात ज्योतीसारखे चकाकणे’
रक्त संक्रमणाचा स्वीकार करत नसल्यामुळे, यहोवाचे साक्षीदार सर्वांमध्ये वेगळे असे दिसून येतात व पुष्कळ वेळा त्यांना यामुळे कुप्रसिद्धीही मिळते. तथापि, हा पावित्रा, दृढरित्या बायबलवर आधारित आहे. देवाच्या नजरेत रक्त मौल्यवान असल्यामुळे रक्तच्या दुरुपयोगाचे तो खंडण करतो, असे या पावित्र्यावरून दिसून येते. (उत्पत्ति ९:३, ४; लेवीय १७:१४) या विषयावर शास्त्रवचनांचे परीक्षण केल्याने, यहोवाचे साक्षीदार असे अनुमान काढतात, की “रक्तापासून अलिप्त राहा,” या बायबलच्या अधिकृत सुचनेमध्ये, रक्त संक्रमणाच्या आधुनिक पद्धतींचाही समावेश होऊ शकतो.—प्रेषितांची कृत्ये १५:१९, २०, २८, २९.
या विषयावर, अलीकडील वर्षांत, वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य व काही राष्ट्रांतील न्यायालये देखील, यहोवाच्या साक्षीदारांना पाठिंबा देत आले आहेत. उदाहरणार्थ, रक्ताविषयी बायबलच्या दृष्टिकोनाशी परिचित असलेल्या, डेन्मार्कमधील एका तरुण मातेचा मोटारीच्या अपघातात मृत्यू झाला. तिने रक्ताचा स्वीकार न केल्यामुळे, तिच्या डॉक्टरांनी, प्रसार माध्यमाद्वारे यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध महिनाभर शत्रुत्त्वाची मोहीम चेतवली.
या तरुण स्त्रीच्या पालकांनी चौकशीची विनंती केली व एप्रिल १९९४ मध्ये, डेन्मार्कमधील रुग्ण तक्रार मंडळाने निर्णय जाहीर केला. त्यात असे सांगितले, की रुग्णाचा मृत्यू, रक्ताचा अस्वीकार केल्यामुळे नव्हे तर, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला. हा निर्णय, न्यायवैद्यक मंडळाच्या व आरोग्य अधिकाऱ्यांच्या अन्वेषणांवर आधारित होता. डेन्मार्कमधील सर्व आरोग्य निगेच्या सुविधांना पाठवलेल्या एका परिपत्रकात, यहोवाच्या साक्षीदारांच्या रक्ताच्या अस्वीकारास विचारात घेऊन, त्यांना उत्कृष्ट प्रतीचा पर्यायी उपचार देण्याचे डॉक्टरांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रीय आरोग्य मंडळाने म्हटले.
दुसरे एक प्रकरण डॅन नावाच्या एका १५ वर्षांच्या साक्षीदाराचे आहे, ज्याचे रक्ताच्या कर्करोगामुळे निधन झाले. त्याच्या प्रकरणात, रक्त संक्रमण न घेण्याच्या त्याच्या धैर्यवान निर्णयाचा डॉक्टरांनी आदर केला. यावेळी वार्ताहारांची एक व्यापक मोहीम घेण्यात आली, ज्यात प्रसार माध्यमाने डॅनच्या मृत्यूबद्दल डॉक्टरांना दोषी ठरवले. तथापि, बहुतेकजण या नकारात्मक प्रचाराशी सहमत झाले नाहीत.
उदाहरणार्थ, डॅन ज्या शाळेत जात होता, त्या शाळेचे मुख्याध्यापक, अंत्यसंस्काराच्या भाषणासाठी राज्य सभागृहात उपस्थित होते. डॅनच्या मृत्यूचा खुलासा करणाऱ्या खोट्या वार्तांबद्दल त्यांना धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. एका साक्षीदार सहकर्मचाऱ्याला, यहोवाच्या साक्षीदारांविषयी प्रश्न विचारल्यानंतर, त्याने यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना (इंग्रजी), या व्हिडियोच्या कॅसेटचा स्वीकार केला. त्या व्हिडियोने त्यांच्यावर एवढी छाप पाडली, की शाळेतील सर्व शिक्षकांनी तो पाहावा याची त्यांनी व्यवस्था केली. नंतर हा व्हिडियो, एका वेळेस एक वर्ग, अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.
डॅनच्या डॉक्टरांना जी कुप्रसिद्धी मिळाली त्याबाबत डेन्मार्कचे आरोग्य मंत्री देखील सहमत नव्हते. डॅनच्या परिपक्व निर्णयाचा आणि भक्कम पाया असलेल्या त्याच्या विश्वासाचा आदर करून, त्याच्या डॉक्टरांनी योग्यच गोष्ट केली होती, असे त्यांनी सांगितले.
देवाच्या नियमांचे पालन करणारे लाखो राज्य उद्घोषक आहेत. त्यांच्या आज्ञाधारकतेमुळे, ‘ज्योतीसारखे जगात चकाकणारे,’ या नात्याने ते उठून दिसतात.—फिलिप्पैकर २:१२, १५.