वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १२/१५ पृ. ३-४
  • देणे अपेक्षिले जाते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देणे अपेक्षिले जाते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मिळती जुळती माहिती
  • नाताळ तो खरोखरच ख्रिस्ती आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • धार्मिक वैविध्याचे आव्हान
    यहोवाचे साक्षीदार आणि शिक्षण
  • देण्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १२/१५ पृ. ३-४

देणे अपेक्षिले जाते का?

बक्षिसे देण्याच्या प्रथेवर नेहमी रीतीरिवाजाचे प्रभुत्त्व असते, हे तुम्हाला कदाचित माहीत असेलच. अनेक संस्कृतींमध्ये असे अनेक प्रसंग असतात जेव्हा बक्षिसांची अपेक्षा केली जाते. अशा प्रकारची बक्षिसे आदर किंवा प्रेमाच्या अभिव्यक्‍ती समजल्या जातात. त्यांच्यातील पुष्कळ बक्षिसांचा उपयोग प्रापक करत नाही; इतर वास्तविक गरजा पूर्ण करण्यास मदत करतात व त्यांची मनापासून गुणग्राहकता बाळगली जाते.

डेन्मार्कमध्ये, बाळाचा जन्म होतो तेव्हा, मित्र आणि नातेवाईक बक्षिसे घेऊन भेटण्यास येतात, अशी आशा बाळगून, की ती बक्षिसे त्या बाळाच्या उपयोगी पडतील. इतर देशांमध्ये, बाळाच्या जन्माची वाट पाहण्याच्या निमित्ताने मित्रजन पार्टी देतील ज्यामध्ये बक्षिसे दिली जातात.

अनेक बाबींमध्ये, वार्षिक दिनी बक्षिसांची अपेक्षा केली जाते. अशा प्रकारचे विधी प्रारंभीच्या ख्रिश्‍चनांमध्ये नव्हते, तरीपण ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे आणि गैर ख्रिस्ती लोकांमध्ये ते खूपच रूढ झाले आहेत. इतर संस्कृतींमध्ये, मुले जसजशी मोठी होत जातात तसे वाढदिवसानिमित्त बक्षिसे देण्याची पद्धत लयास जाऊ शकते, पण ग्रीक लोकांच्या रूढी याच्याउलट करण्यास सांगतात. ग्रीसमध्ये वाढदिवसांना जास्त महत्त्व दिले जाते. ते एखाद्या व्यक्‍तीला तिच्या ‘नावाच्या दिवसानिमित्त’ देखील बक्षिसे देतात. म्हणजे काय? त्याचे असे आहे, की तेथील धार्मिक रूढी वर्षाच्या प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या ‘संताचे’ नाव देतात आणि पुष्कळ लोकांना प्रत्येक ‘संताचे’ नाव दिले जाते. त्या ‘संताचा’ दिवस येतो तेव्हा, त्या नावाच्या लोकांना बक्षिसे मिळतात.

कोरियन लोकांमध्ये, त्यांच्या मुलांच्या वाढदिवसांव्यतिरिक्‍त, राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो ज्याला बालदिन म्हटले जाते. त्यावेळेस कुटुंबे फिरायला जातात आणि मग मुलांची जन्म तारीख असो वा नसो, त्यांना बक्षिसे दिली जातात. कोरियन लोकांमध्ये पालकदिन असतो त्यावेळेस, मुले त्यांच्या पालकांना बक्षिसे देतात, शिक्षकदिन असतो तेव्हा विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचा आदर करतात आणि त्यांना बक्षिसे देतात. कोरियन रीतीनुसार एक व्यक्‍ती ६० वर्षांची होते तेव्हा एक मोठी मेजवानी दिली जाते. कौटुंबिक सदस्य आणि मित्रजन त्या व्यक्‍तीला दीर्घायुष्य व सुखाच्या शुभेच्छा देऊन बक्षिसेही देतात.

विवाहसोहळा हा आणखी एक प्रसंग आहे जेव्हा रीतीनुसार बक्षिसे द्यावी लागतात. केन्यामध्ये दांपत्याचा विवाह झाल्यानंतर वराच्या कुटुंबाने वधूच्या कुटुंबाला बक्षिसे द्यावी अशी अपेक्षा केली जाते. पाहुणे मंडळी देखील बक्षिसे घेऊन येतात. वधू आणि वर रीतीरिवाज पाळत असल्यास, ते एका व्यासपीठावर बसतात आणि पाहुणेमंडळी त्यांची बक्षिसे आणतात. प्रत्येक जण त्याचे बक्षीस आणताना, “अमुक अमुक व्यक्‍तीने दांपत्यासाठी बक्षीस आणले आहे” अशी घोषणा केली जाते. अशा प्रकारची मान्यता त्यांना न मिळाल्यास बक्षिसे आणणाऱ्‍या पुष्कळांना अपमानास्पद वाटेल.

लेबनिझ लोकांमध्ये, कोणाचा विवाह झाल्यास, मित्र, शेजारी आणि त्या दांपत्याला न ओळखणारे लोक सुद्धा विवाहानंतर काही दिवसांपर्यंत बक्षिसे घेऊन भेटावयास येत असतात. त्यांना लहानपणापासून असे शिकवले जाते की बक्षिसे देणे ही कर्ज फेडण्याप्रमाणेच एक जबाबदारी आहे. एका लेबनिझ मनुष्याने म्हटल्याप्रमाणे, “तुम्ही तसे केले नाही तर तुमचे तुम्हालाच बरे वाटत नाही. ती परंपरा आहे.”

परंतु, देण्याची अपेक्षा केली जाते अशा सर्व प्रसंगांपैकी अनेक राष्ट्रांत नाताळ सण सर्वात प्रमुख आहे. तुम्ही जेथे राहता तेथेही असेच नाही का? असा अंदाज लावला जातो, की अलीकडेच म्हणजे १९९० मध्ये अमेरिकी लोक दरवर्षी नाताळच्या बक्षिसांसाठी ४,००० कोटींपेक्षा अधिक डॉलर खर्च करतात. जपान मधील बौद्ध आणि शिंतोईष्ट लोकसुद्धा तो सुटीचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात व युरोप, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये साजरा करण्याचे विविध प्रकार दिसून येतात.

नाताळच्या हंगामात लोक आनंदी राहण्याची अपेक्षा करतात, पण पुष्कळ जण आनंदी नसतात. तसेच पुष्कळांना दिसून आले आहे, की बक्षिसांसाठी त्यांनी केलेली पिसाट खरेदी आणि घेतलेल्या पैशांची बिले भरण्याची चिंता, ते जे आनंदाचे क्षण लुटत आहेत त्याला ग्रहण लावतात.

पण, बायबल म्हणते, की देण्यामध्ये आनंद आहे. होय, कोणत्या हेतुने दिले जाते यावर देण्यामध्ये खरोखरच आनंद अवलंबून आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा