तुम्ही न्यायासनासमोर कसे उभे राहणार?
“जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.”—मत्तय २५:३१.
१-३. न्यायाबद्दल आशावादी असण्याचे आपल्याजवळ काय कारण आहे?
‘दोषी किंवा निर्दोष?’ न्यायालयीन खटल्याचे वृत्त ऐकतात तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटते. न्यायाधीश आणि ज्यूरीचे सदस्य प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करतात, पण न्याय नेहमीच मिळतो का? न्यायिक कार्यवाहित अन्याय आणि न्यायातील विषमतेबद्दल तुम्ही ऐकले नाही का? लूक १८:१-८ मधील येशूचा दाखला आपण पाहतो, तेव्हा असा अन्याय नवीन नाही.
२ मानवी न्यायाधीशांच्या बाबतीत तुमचा कोणताही अनुभव असला तरी, येशूच्या समारोपाकडे लक्ष द्या: “देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? . . . मी तुम्हांस सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
३ होय, यहोवा आपल्या सेवकांना शेवटी न्याय मिळेल याची खात्री करील. आपण विशेषपणे आज, सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळात’ जगत असल्यामुळे येशूचा देखील यामध्ये समावेश आहे. यहोवा पृथ्वीवरून दुष्टता काढून टाकण्यासाठी, लवकरच त्याच्या शक्तिशाली पुत्राचा वापर करील. (२ तीमथ्य ३:१; २ थेस्सलनीकाकर १:७, ८; प्रकटीकरण १९:११-१६) येशूने दिलेल्या शेवटल्या दाखल्यातून म्हणजेच ज्याला मेंढरे आणि शेरडांचा दाखला असे अनेकदा म्हटले जाते त्यातून आपण येशूच्या भूमिकेची समज मिळवू शकतो.
४. आपल्याला मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या काळाबद्दल काय वाटले होते, पण आपण दाखल्याकडे आता लक्ष का देऊ? (नीतिसूत्रे ४:१८)
४ बऱ्याच काळापासून आपली अशी समज होती, की वर्णित केलेला दाखला, येशू १९१४ मध्ये राजा या नात्याने बसलेला असून तेव्हापासून न्याय करत आहे—मेंढरांसारखे शाबीत करणाऱ्या लोकांसाठी सार्वकालिक जीवन तर शेरडांसारख्यांना कायमचा मृत्यू. पण या दाखल्याचा पुनर्विचार, त्याचा कालावधी आणि तो काय स्पष्ट करतो याविषयी बदललेली समज दाखवतो. ही शुद्धता, आपले प्रचार कार्य आणि लोकांच्या प्रतिसादाची अर्थसूचकता यांच्या महत्त्वाला बळकटी देते. या दाखल्याच्या गहन समजुतीबद्दलचा आधार पाहण्यासाठी, यहोवा आणि येशू दोघेही राजे आणि न्यायाधीश असल्याबद्दल बायबल काय सांगते याचा विचार, आता आपण करू या.
यहोवा, सर्वोच्च न्यायाधीश या नात्याने
५, ६. यहोवाकडे एक राजा व न्यायाधीश या दृष्टीने पाहणे उचित का आहे?
५ यहोवा सर्व विश्वावर आधिपत्य गाजवतो व सर्वांवर त्याची सत्ता आहे. त्याला आदी आणि अंत नसल्यामुळे, तो ‘सनातन राजा’ आहे. (१ तीमथ्य १:१७; स्तोत्र ९०:२, ४; प्रकटीकरण १५:३) त्याला विधी किंवा नियम बनविण्याचा आणि ते अंमलात आणण्याचा अधिकार आहे. पण त्याच्या अधिकारात न्यायाधीश असण्याचा समावेश आहे. यशया ३३:२२ म्हणते: “यहोवा आमचा न्यायाधीश आहे, यहोवा आमचा नियमकर्ता आहे, यहोवा आमचा राजा आहे, तो आम्हाला तारील,” (पंडिता रमाबाई भाषांतर).
६ यहोवा खटले व वादविषयांचा न्यायाधीश असल्याचे देवाच्या सेवकांनी बऱ्याच काळाआधी ओळखले. उदाहरणार्थ, ‘सर्व जगाच्या न्यायाधीशाने’ सदोम व गमोरातील दुष्टतेचा पुरावा तोलल्यावर, त्याने नाशास पात्र असलेल्या लोकांचा न्याय केला आणि नीतिमान न्यायदंडाची अंमलबजावणी केली. (उत्पत्ति १८:२०-३३; ईयोब ३४:१०-१२) यहोवा नीतिमान न्यायाधीश असून तो आपले न्यायदंड सर्वदा बजावू शकतो, या गोष्टीने आपल्याला कशी हमी देण्यास हवी बरे!
७. इस्राएलासोबत व्यवहार करताना यहोवाने न्यायाधीश म्हणून कसे कार्य केले?
७ प्राचीन इस्राएलात, यहोवाने काही वेळा थेट न्यायदंड बजावला. परिपूर्ण न्यायाधीश बाबींचा निर्णय घेत होता, हे जाणल्याने त्यावेळी तुम्हाला सांत्वन मिळाले नसते का? (लेवीय २४:१०-१६; गणना १५:३२-३६; २७:१-११) देवाने “नियम” प्रदान केले, जे न्याय करण्यासाठी चांगले दर्जे होते. (लेवीय २५:१८, १९; नहेम्या ९:१३; स्तोत्र १९:९, १०; ११९:७, ७५, १६४; १४७:१९, २०) तो “सर्व जगाचा न्यायाधीश” असल्यामुळे याचा परिणाम आपल्या सर्वांवर होतो.—इब्रीयांस १२:२३.
८. दानीएलाला कोणता प्रसंगोचित्त दृष्टांत झाला?
८ आपल्याकडे या विषयाच्या बाबतीत “प्रत्यक्ष साक्षीदाराची” साक्ष आहे. दानीएल संदेष्ट्याला, सरकार किंवा सम्राटांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भीतीदायक श्वापदांचा दृष्टांत देण्यात आला होता. (दानीएल ७:१-८, १७) त्याने म्हटले: “आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला; त्याचा पेहराव बर्फासारखा पांढरा होता.” (दानीएल ७:९) दानीएलाने आसने “आणि एक पुराणपुरुष [यहोवा] आसनारुढ” झालेला पाहिला. स्वतःला विचारा, ‘दानीएल येथे, देवाला राजा होत असल्याचे पाहत होता का?’—तिरपे वळण आमचे.
९. राजासनावर ‘बसणे’ याचा एक अर्थ कोणता आहे? उदाहरणे द्या.
९ कोणी “आसनारुढ” झाला असे आपण वाचतो तेव्हा, ती व्यक्ती राजा होत असल्याचा विचार आपण करतो, कारण बायबल कधीकधी अशा भाषाशैलीचा वापर करते. उदाहरणार्थ, “[जिम्री] राज्य करू लागला, आणि गादीवर बसताच त्याने . . .” (१ राजे १६:११; २ राजे १०:३०; १५:१२; यिर्मया ३३:१७) मशीहाबद्दलची भविष्यवाणी म्हणते: ‘त्याने आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवली पाहिजे.’ या कारणास्तव, ‘सिंहासनावर बसण्याचा’ अर्थ राजा बनणे असा होऊ शकतो. (जखऱ्या ६:१२, १३) यहोवाचे वर्णन तो राजा या नात्याने राजासनावर बसलेला, असे केले आहे. (१ राजे २२:१९; यशया ६:१; प्रकटीकरण ४:१-३) तो ‘सनातन राजा’ आहे. तरीही, सार्वभौमत्वाचा नवा पैलू त्याने सांगितला तेव्हा तो राजा झाला असे म्हटले जाऊ शकते, जणू तो आपल्या राजासनावर नव्याने बसत आहे.—१ इतिहास १६:१, ३१; यशया ५२:७; प्रकटीकरण ११:१५-१७; १५:३; १९:१, २, ६.
१०. इस्राएलाच्या राजांचे प्रमुख कार्य कोणते होते? स्पष्ट करा.
१० पण प्रमुख मुद्दा असा आहे: प्राचीन काळातील राजांचे प्रमुख कार्य, खटले ऐकणे आणि न्यायनिवाडा करण्याविषयीचे होते. (नीतिसूत्रे २९:१४) जेव्हा दोन्ही स्रियांनी एकाच मुलाबद्दल, ते आपले असल्याचा दावा केला तेव्हा, शलमोनाच्या सूज्ञ न्यायाची आठवण करा. (१ राजे ३:१६-२८; २ इतिहास ९:८) त्याच्या एका सरकारी इमारतीत “न्याय करण्यासाठी दिवाणखाना” होता; यास “न्यायसभा” म्हटले जात होते. (१ राजे ७:७) जेरुसलेमचे वर्णन ‘न्यायासने मांडलेली’ जागा असे केले होते. (स्तोत्र १२२:५) ‘सिंहासनावर बसण्याचा’ अर्थ, न्यायदानाचा अधिकार बजावणे असा देखील होऊ शकतो, हे यावरून स्पष्ट होते.—निर्गम १८:१३; नीतिसूत्रे २०:८.
११, १२. (अ) दानीएल अध्याय ७ मध्ये उल्लेख करण्यात आलेले यहोवाचे बसणे याचा अर्थ काय होतो? (ब) यहोवा न्याय करण्यासाठी बसतो याला इतर शास्त्रवचने कशी पुष्टी देतात?
११ आता आपण दानीएलाने ‘पुराणपुरुष आसनारुढ झालेला पाहिला’ होता, त्या दृश्याकडे परत वळू या. दानीएल ७:१० पुढे सांगते: “न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.” होय, जगाच्या प्रभुत्वाचा न्यायनिवाडा करण्यासाठी आणि मानवपुत्र शासन करण्यास योग्य आहे याचा न्याय करण्यास पुराणपुरुष बसला होता. (दानीएल ७:१३, १४) नंतर आपण वाचतो की, “पुराणपुरुष आला तेव्हा . . . पवित्र जनांस न्याय मिळाला,” ज्यांचा न्याय केला ते मानवपुत्रासोबत राज्य करण्यासाठी योग्य होते. (तिरपे वळण आमचे.) (दानीएल ७:२२) शेवटी, ‘न्यायसभा भरवण्यात आली’ आणि शेवटल्या जागतिक साम्राज्यावर प्रतिकूल न्यायदंड बजावण्यात आला.—दानीएल ७:२६.a
१२ यास्तव, दानीएलाने देवाला ‘सिंहासनावर बसल्याचे’ पाहण्याचा अर्थ, न्याय करण्यासाठी त्याचे येणे असा होतो. दावीदाने आधी गाईले: “तू [यहोवा] माझा कैवार घेऊन न्याय केला आहे; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस.” (स्तोत्र ९:४, ७) तसेच, योएलने लिहिले: ‘राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोऱ्यांत येवोत; तेथे मी [यहोवा] न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार.’ (योएल ३:१२; पडताळा यशया १६:५.) येशू आणि पौल दोघेही न्यायालयीन परिस्थितींमध्ये होते, ज्यात एका मनुष्याने खटला ऐकला व न्याय दिला.b—योहान १९:१२-१६; प्रेषितांची कृत्ये २३:३; २५:६.
येशूचा हुद्दा
१३, १४. (अ) येशू राजा होईल याविषयी देवाच्या लोकांना काय खात्री होते? (ब) येशू आपल्या राजासनावर केव्हा बसला आणि सा. यु. ३३ पासून त्याने कोणत्या अर्थाने राज्य सुरू केले?
१३ यहोवा राजा आणि न्यायाधीश सुध्दा आहे. येशूबद्दल काय? त्याच्या जन्माची घोषणा करणाऱ्या देवदूताने म्हटले: “प्रभु देव [यहोवा] त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; . . . व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (लूक १:३२, ३३) येशू, दावीदाच्या राजत्वाचा कायम वारस असणार होता. (२ शमुवेल ७:१२-१६) तो स्वर्गातून राज्य करणार होता, म्हणून दावीदाने म्हटले: “माझ्या प्रभूला [येशू] परमेश्वर [यहोवा] म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.”—स्तोत्र ११०:१-४.
१४ ते केव्हा होईल? मनुष्य असताना येशूने राजा या नात्याने राज्य केले नाही. (योहान १८:३३-३७) सा. यु. ३३ मध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याचे पुनरुत्थान होऊन स्वर्गारोहण झाले. इब्रीयांस १०:१२ म्हणते: “पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे.” येशूला कोणता अधिकार होता? “सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा . . . त्या सर्वांहून त्याला उंच करून [देवाने त्याला] स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले . . . आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले.” (इफिसकर १:२०-२२) तेव्हा येशूचा ख्रिश्चनांवर राजकीय अधिकार असल्यामुळे, पौल असे लिहू शकला, की “आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.”—कलस्सैकर १:१३; ३:१.
१५, १६. (अ) येशू सा. यु. ३३ मध्ये देवाच्या राज्याचा राजा झाला नाही, असे आपण का म्हणतो? (ब) येशूने, देवाच्या राज्यात शासन करण्यास केव्हा सुरवात केली?
१५ तथापि, येशूने त्यावेळी राष्ट्रांवर राजा व न्यायाधीश म्हणून कार्य केले नाही. तो देवाच्या उजवीकडे बसलेला होता व देवाच्या राज्यात राजा या नात्याने कार्य करण्यासाठी थांबलेला होता. पौलाने त्याच्याविषयी लिहिले: “त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, ‘मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस’?”—इब्रीयांस १:१३.
१६ येशू अदृश्य स्वर्गात देवाच्या राज्याचा राजा बनला तेव्हा, त्याचा थांबून राहण्याचा अवधी १९१४ मध्ये संपुष्टात आला, याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांनी बराच पुरावा प्रकाशित केला आहे. प्रकटीकरण ११:१५, १८ म्हणते: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” “राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली.” होय, राष्ट्रांनी पहिल्या जागतिक युद्धादरम्यान एकमेकांवर आपला क्रोध व्यक्त केला. (लूक २१:२४) युद्धे, भूमिकंप, मऱ्या, अन्नटंचाई आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ज्या आपण १९१४ पासून पाहत आलो आहोत त्या, देवाच्या राज्यात येशू आता आधिपत्य गाजवत असल्याची व जगाचा शेवट जवळ असल्याची पुष्टी देतात.—मत्तय २४:३-१४.
१७. आपण आतापर्यंत कोणते प्रमुख मुद्दे शाबीत केले आहेत?
१७ पुढे संक्षिप्त उजळणी दिली आहे: देव, राजा या नात्याने सिंहासनावर बसला आहे, असे म्हटले जाऊ शकते. परंतु दुसऱ्या अर्थाने तो न्याय करण्यासाठी आपल्या सिंहासनावर बसू शकतो. येशू, सा. यु. ३३ मध्ये देवाच्या उजवीकडे बसला आणि आता तो देवाच्या राज्याचा राजा आहे. पण आता राजा या नात्याने राज्य करीत असलेला येशू, न्यायाधीश देखील आहे का? विशेषपणे आपण या काळात याचा विचार का केला पाहिजे?
१८. येशू न्यायाधीश देखील असेल याचा काय पुरावा आहे?
१८ न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा हक्क असणाऱ्या यहोवाने आपल्या दर्जांनुसार, येशूची एक न्यायाधीश म्हणून निवड केली आहे. लोक आध्यात्मिकरित्या जिवंत होण्याविषयी बोलत असताना येशूने हे दाखवले: “पिता कोणाचाहि न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.” (योहान ५:२२) तथापि, येशूची न्यायालयीन भूमिका त्या प्रकारचा न्याय करण्यापलीकडे जाते कारण तो सर्व जिवंतांचा व मृतांचा न्यायाधीश आहे. (प्रेषितांची कृत्ये १०:४२; २ तीमथ्य ४:१) पौलाने एकदा म्हटले: “[देवाने] असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे [येशू] जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.”—प्रेषितांची कृत्ये १७:३१; स्तोत्र ७२:२-७.
१९. येशू न्याय करण्यासाठी बसत आहे, असे बोलणे उचित का आहे?
१९ यास्तव, येशू न्यायाधीशाच्या विशिष्ट भूमिकेत गौरवी सिंहासनावर बसतो, असा निष्कर्ष काढणे योग्य आहे का? होय. येशूने प्रेषितांना म्हटले: “पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्यामागे आलेले तुम्हीहि बारा राजासनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्यायनिवाडा कराल.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय १९:२८) येशू आता त्या राज्याचा राजा असला, तरी मत्तय १९:२८ मध्ये उद्धृत केलेल्या त्याच्या पुढील कार्यांमध्ये सहस्रावधी दरम्यान राजासनावर बसून न्यायनिवाडा करण्याचा समावेश होईल. तेव्हा तो सर्व मानवजातीचा म्हणजे नीतिमान आणि अनीतिमानांचा न्यायनिवाडा करील. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) आपल्या समयाशी व जीवनांशी संबंधीत असलेल्या येशूच्या एका दाखल्याकडे आपण लक्ष देतो तसे हे लक्षात ठेवणे मदतदायक आहे.
हा दाखला काय सांगतो?
२०, २१. येशूच्या प्रेषितांनी आपल्या काळाशी संबंधीत असे त्याला काय विचारले, त्यामुळे कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे?
२० येशूचा मृत्यू होण्याच्या काही काळाआधी प्रेषितांनी त्याला विचारले: “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” (मत्तय २४:३) येशूने, ‘शेवट होण्याआधी’ पृथ्वीवरील अद्भुत विकासांचे भाकीत केले. तो शेवट होण्याच्या काही काळाआधी, राष्ट्रे “मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.”—मत्तय २४:१४, २९, ३०.
२१ तथापि, मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल तेव्हा त्या राष्ट्रांतील लोकांचा कसा निभाव लागेल? आपण शेरडे आणि मेंढरांच्या दाखल्यातून ते शोधून काढून या, त्याचा या शब्दांनी आरंभ होतो: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील.”—मत्तय २५:३१, ३२.
२२, २३. मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या पूर्णतेचा आरंभ १९१४ मध्ये झाला नाही, याला कोणते मुद्दे दर्शवतात?
२२ आपण बऱ्याच काळापासून समजत आहोत त्याप्रमाणे, येशू १९१४ मध्ये राजकीय सत्तेवर बसला तेव्हा हा दाखला लागू होतो का? मत्तय २५:३४, तो राजा असल्याविषयी सांगत असल्यामुळे, या दाखल्याचा अवलंब १९१४ मध्ये येशू राजा झाला तेव्हापासून तर्कसंगतपणे होतो. पण त्यानंतर त्याने लगेच कशाचा न्यायनिवाडा केला? तो ‘सर्व राष्ट्रांचा’ न्यायनिवाडा नव्हता. उलटपक्षी, त्याने आपले लक्ष, ‘देवाच्या घरातले’ असण्याचा दावा करणाऱ्या सर्वांवर लावला. (१ पेत्र ४:१७) मलाखी ३:१-३ च्या अनुषंगात, येशूने, यहोवाचा निरोप्या या नात्याने, पृथ्वीवरील शेष अभिषिक्त ख्रिश्चनांची न्यायिकपणे पाहणी केली. तो समय, ‘देवाच्या घरातले’ असल्याचा खोटा दावा केलेल्या ख्रिस्ती धर्मजगतावर न्यायिक शिक्षा देण्याचाही होता.c (प्रकटीकरण १७:१, २; १८:४-८) तथापि, येशू त्यावेळी किंवा तेव्हापासून सर्व राष्ट्रांतील लोकांचा शेरडे किंवा मेंढरे या नात्याने न्याय करण्यासाठी बसला, हे कोणतीही गोष्ट सुचवत नाही.
२३ आपण या दाखल्यातील येशूच्या कार्याचे परीक्षण करू लागल्यास, शेवटी सर्व राष्ट्रांचा न्याय करत असल्याचे आपण त्याचे निरिक्षण करू शकतो. मागील दशकांदरम्यान मृत्यू पावत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जणू सार्वकालिक मृत्यू किंवा सार्वकालिक जीवनासाठी न्याय करण्यात आला याबद्दल हा दाखला, अनेक वर्षांच्या विस्तारित काळात अशा रितीने न्याय करणे चालू राहील याबद्दल काही प्रकट करत नाही. असे दिसते, की अलीकडे मरण पावलेले अधिकांश जण मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेत गेले आहेत. (प्रकटीकरण ६:८; २०:१३) तथापि, हा दाखला, त्यावेळी जिवंत असलेल्या आणि न्यायिक शिक्षेच्या अंमलबजावणीला तोंड देत असलेल्या ‘सर्व राष्ट्रांतील’ लोकांचा न्यायनिवाडा येशू करील त्या काळाचे वर्णन करतो.
२४. मेंढरे आणि शेरडे यांच्या दाखल्याची पूर्णता केव्हा होईल?
२४ दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर हा दाखला, मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवासहित येईल त्या भविष्यातील समयाकडे अंगुली दर्शवतो. तेव्हा राहत असलेल्या लोकांचा न्याय करण्यासाठी तो बसेल. त्यांनी स्वतःला जे प्रदर्शित केले यावर न्यायनिवाडा आधारित असेल. त्यावेळी, ‘धार्मिक व दुष्ट यांच्यातला भेद’ स्पष्टपणे सिद्ध झालेला असेल. (मलाखी ३:१८) वास्तविक अधिघोषणा करणे आणि न्यायदंड बजावणे, एका मर्यादित काळात पूर्ण केले जाईल. येशू वैयक्तिकांबद्दल जे प्रकट झाले आहे यावर आधारित नीतिमान निर्णय बजावील.—२ करिंथकर ५:१० देखील पाहा.
२५. मनुष्याचा पुत्र वैभवी राजासनावर बसत असल्याचे सांगताना मत्तय २५:३१ काय वर्णन करते?
२५ तर मग याचा अर्थ, न्यायनिवाडा करण्यासाठी मत्तय २५:३१ मध्ये उद्धृत करण्यात आलेले येशूचे ‘आपल्या वैभवशाली राजासनावर बसणे,’ हा शक्तिशाली राजा, राष्ट्रांवर अधिघोषणा करण्यासाठी आणि आपला न्यायदंड बजावण्यासाठी बसेल त्या भविष्य काळाला लागू होते. होय, मत्तय २५:३१-३३, ४६ मधील येशूचा समावेश असलेले न्यायनिवाड्याचे हे दृश्य दानीएल अध्याय ७ च्या तुल्य आहे, जेथे राज्य करीत असलेला राजा, पुराणपुरुष आपली भूमिका न्यायाधीश या नात्याने बजावण्यासाठी बसला.
२६. दाखल्याचे कोणते नवे स्पष्टीकरण प्रकट होते?
२६ या रितीने, मेंढरे आणि शेरडे या दाखल्याची समज, मेंढरे आणि शेरडे यांचा न्यायनिवाडा करणे भविष्यात होईल असे सूचित करते. तो न्यायनिवाडा, मत्तय २४:२९, ३० मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या ‘संकटाची’ अचानक सुरवात झाल्यावर आणि मनुष्याचा पुत्र ‘आपल्या वैभवाने आल्यावर’ होईल. (पडताळा मार्क १३:२४-२६.) तेव्हा येशू, संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटी, न्यायालय भरवील आणि न्याय देऊन त्याची अंमलबजावणी करील.—योहान ५:३०; २ थेस्सलनीकाकर १:७-१०.
२७. येशूच्या शेवटल्या दाखल्याविषयी कोणती माहिती जाणण्यास आपण आस्थेवाईक असले पाहिजे?
२७ ही गोष्ट, मेंढरे आणि शेरडे यांचा न्याय केला जाईल त्या येशूच्या दाखल्याच्या कालमर्यादेबद्दल आपली समज स्पष्ट करते. पण आवेशाने राज्य सुवार्तेचा प्रचार करत असलेल्या आपणांवर याचा कसा प्रभाव पडतो? (मत्तय २४:१४) ते आपले काम क्षुल्लक बनवते किंवा आपल्यावर जबाबदारीचे अधिक ओझे आणते का? आपल्यावर कसा प्रभाव पडतो याबद्दल पुढचा लेख आपण पाहू या.
[तळटीपा]
a दानीएल ७:१०, २६ मध्ये अनुवाद करण्यात आलेला “न्यायसभा” हा शब्द एज्रा ७:२६ आणि दानीएल ४:३७; ७:२२ मध्ये देखील आढळतो.
b ख्रिश्चनांनी एकमेकांना न्यायालयात नेण्याबद्दल पौलाने विचारले: ‘मंडळीत जे हिशेबात नाहीत अशा मनुष्यांस तुम्ही न्यायाधीश म्हणून नेमता [शब्दशः “तुम्ही बसवता”] काय?’—१ करिंथकर ६:४.
c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंका. द्वारे प्रकाशित केलेले प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, पृष्ठे ५६, ७३, २३५-४५, २६० पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवा राजा व न्यायाधीश या नात्याने कसा कार्य करतो?
◻ ‘राजासनावर बसणे’ याचे कोणते दोन अर्थ असू शकतात?
◻ आपण मत्तय २५:३१ च्या काळाबद्दल पूर्वी काय सांगितले होते, पण सुधारित दृष्टिकोनासाठी काय आधार आहे?
◻ मत्तय २५:३१ मध्ये सूचित केल्यानुसार, मनुष्याचा पुत्र आपल्या राजासनावर केव्हा बसतो?